हात थरथरणे - Hand Tremors in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

हात थरथरणे
हात थरथरणे

हात थरथरणे म्हणजे काय?

थरथरणे म्हणजे स्नायूंच्या अनैच्छिक, तालबद्ध हालचाली होणे. हाताची थरथर ही हाताच्या स्नायूंच्या अनैच्छिक हालचालींमुळे होते (मनगट, बोट अगठा) याला कंपन होणारा हात असेही म्हणतात. या अवस्थेत वयस्कर व्यक्ती किंवा सर्व साधारण व्यक्तीला नेहमीचे काम नीट करणे त्रासदायक होते. हा एक विकार नसला तरी हा मेंदूच्या पेशीची हानी दर्शवू शकतो.

याची मुख्य चिन्हे व लक्षणे काय आहेत?

हात थरथरण्याची लक्षणं साधी असून हाताची अनैच्छिक हालचाल दिसून येते. पण,हात थरथरण्याचे लक्षण खालील प्रमाणे असू शकतात:

  • एका हाताची थरथर हळूहळू वाढत जाते व दुसऱ्या हातावर परिणाम जाणवू शकतो.
  • हाताची हालचाल केल्यावर थरथर वाढते.
  • तणाव, थकवा, उत्तेजनामुळे थरथर वाढत जाते.
  • अटॅक्सिया ची (असामान्य पोश्चर) साधारण लक्षणे.

या वेदना सहन होत नाही त्या वेळी रोजची काम करणे त्रासदायक होते जसे कपडे घालणे, कप किंवा पेला उचलणे, जेवण करणे, दाढी करणे. अगदी लिहणे पण अवघड होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हात थरथरणे ही साधारणपणे इशेंशियल ट्रेमर्स (चेतना संस्थेचा विकार) किंवा पार्किंसन रोगामुळे होते. हे दोन्हीही अनुवांशिक रोग आहेत जे जीन्सच्या उत्परिवतनामुळे होतात.

याची इतर कारणं अशी आहेत:

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

या आजाराचे निदान संपूर्ण वैद्यकीय इतिहास जाणून, कौटुंबिक इतिहास जाणून आणि  योग्य क्लिनिकल परिक्षण जाणून केले जाते. काही रक्त तपासण्या जसे संपूर्ण रक्त गणना (सीबीसी) , व्हिटॅमिन बी12 चे स्तर तपासणी, मेंदूचे सिटी स्कॅन करुन इतर कारणीभूत रोगांची शक्यता तपासता येते.

हात थरथरण्यासाठी उपचार पद्धती अशा आहेत:

हात थरथरणे पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण पुढील निश्चित उपचार पद्धती त्याची लक्षणे कमी करतात:

  • औषधे - तोंडावाटे घेण्याच औषधे म्हणजे बिटा ब्लॉकर्स(प्रोपानोल प्रिमीडोन),अँटी सीझर औषधे, बोटॉक्स, चिंते च्या उपचाराचीे औषधे सहाय्यक ठरतात.
  • सर्जिकल उपचार - मेंदूत खोलवर उत्तेजन आणि थलामोटोमी हाताची थरथर किंवा कंप येण्याची तीव्रता कमी करतात.
  • शारीरिक उपचार - मनगटावर आपल्याला झेपेल एवढ्या वजनाची पट्टी बांधणे आणि स्ट्रेस बॉल ने व्यायाम केला तर थरथरण्याची तीव्रता कमी होते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tremor
  2. National Institute of Neurological Disorders and Stroke. [Internet]. U.S. Department of Health and Human Services; Tremor Fact Sheet.
  3. Ibáñez J. et al. PLoS One. 2014 Mar 25;9(3):e93159. doi: 10.1371/journal.pone.0093159. eCollection 2014. PMID: 24667763
  4. Wissel J, Masuhr F, Schelosky L, Ebersback G, Poewe W. Quantitative Assessment of Botulinum Toxin Treatment in 43 Patients with Head Tremor. Mov Disord 1997; 12:722–726.
  5. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Tremor or shaking hands

Lab Tests recommended for हात थरथरणे

Number of tests are available for हात थरथरणे. We have listed commonly prescribed tests below: