व्हिटॅमिन डीची कमतरता - Vitamin D Deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 02, 2019

July 31, 2020

व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डीची कमतरता

व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणजे काय?

व्हिटॅमिन डीची कमतरता, हायपोव्हिटॅमिनोसिस डी म्हणूनही ओळखली जाते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात असते. कॅल्शियमचे शोषण नियंत्रित करणारे व्हिटॅमिन डी हे एक अत्यंत महत्वाचे जीवनसत्व आहे आणि हे पॅराथायरायड ग्रंथीपासून हार्मोन्स मुक्त करण्यात मदत करते.असा अंदाज आहे की भारतातील लोकसंख्येपैकी सुमारे 70% -100% लोकसंख्या ह्याने ग्रस्त आहेत.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ह्या आजाराचे लक्षणे नसतात त्यामुळे बहुतेक व्यक्तींमध्ये पहिल्यांदा निदान केले जात नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या गंभीर घटनांमध्ये खालील चिन्हे दिसून येतात:

  • लहान मुलांना रिकेट्स होतात.
  • प्रौढांमध्ये ऑस्टियोमलाशिया होतो.
  • स्नायूंचे थकणे.
  • नाजूकपणा.
  • हाडांमध्ये खोलवर दुखणे.
  • शरीराची ठेवण राखण्यात अडचण.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

व्हिटॅमिन डी हे अन्न पदार्थांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात आढळते. आणि सूर्यप्रकाश ह्या व्हिटॅमिनचा मुख्य स्त्रोत आहे. सूर्यप्रकाशातील यूव्ही किरणं त्वचेतील निष्क्रिय रूपातील व्हिटॅमिनला सक्रिय रूपात बदलतात. शरीरात कॅल्शियमचे नियमन करण्यापूर्वी हे यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये सक्रिय होते.

असे अनेक कारण आहेत ज्यामुळे  व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. त्यापैकी काही हे आहेत,

  • आहारात व्हिटॅमिन डी चा अभाव.
  • आहारात चरबीचा अभाव असल्यामुळे शरीरात अपर्याप्त व्हिटॅमिन डी अवशोषण.
  • सूर्यप्रकाशात पुरेसे न  वावरणे.
  • मूत्रपिंड किंवा यकृताच्या ज्या रोगात ज्यात व्हिटॅमिन डी ची प्रक्रियहोते,त्यात, व्हिटॅमिन डीच्या. सक्रिय स्वरूपात असंतुलन निर्माण होते.
  • व्हिटॅमिन डी च्या रुपांतरण आणि शोषणात व्यत्यय निर्माण करणारी औषधे.

या कारणामुळे हाडाची डेन्सीटी कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात आणि लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी मोजून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे निदान केले जाऊ शकते. त्यापूर्वी, डॉक्टर शारीरिक तपासणी करू शकतात आणि इतिहासाबद्दल विचारू शकतात. खनिज,विशेषतः कॅल्शियम, फॉस्फरस आणि पॅराथायरायड हार्मोनची, पातळी तपासायला विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात.

प्रौढांना आहारतून दररोज 15 एमसीजी व्हिटॅमिन डी (आरडीए) घेणे आवश्यक असते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढायला अनेक सप्लिमेंट्स आहेत. हे सप्लिमेंट्स दोन स्वरूपात उपलब्ध असतात - व्हिटॅमिन डी 2 आणि डी 3 चे मौखिक आणि इनजेक्टेबल. व्हिटॅमिन डीची कमतरता व्यवस्थापित करण्यासाठी आहारविषयक बदल महत्वाचे आहेत. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे. उदाहरणार्थ लिव्हर, अंड्यांची जर्दी आणि चीज. सकाळच्या सूर्यप्रकाशात चालणे किंवा कोणताही शारीरिक व्यायाम करणे लाभदायक ठरते. यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि त्वचेत व्हिटॅमिन डी चे सक्रिय स्वरूपात रूपांतर होते. त्वचेला सकाळच्या उन्हाचा त्रास कमी होतो. आणि उणीव भरुन काढण्यात मदत होते. वेळेवर निदान केल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता सहजतेने हाताळली जाऊ शकते.

 



संदर्भ

  1. G,Ritu & Gupta, Ajay. (2014). Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions. Nutrients. 6. 729-75. 10.3390/nu6020729.
  2. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Vitamin D & Vitamin D Deficiency.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vitamin D Deficiency.
  4. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Vitamin D and Health. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  5. Linus Pauling Institute [Internet]. Corvallis: Oregon State University; Vitamin D.
  6. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Vitamin D.
  7. American Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: On the Possible Link Between Vitamin D Deficiency and Cardiovascular Disease.

व्हिटॅमिन डीची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

व्हिटॅमिन डीची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for व्हिटॅमिन डीची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for व्हिटॅमिन डीची कमतरता

Number of tests are available for व्हिटॅमिन डीची कमतरता. We have listed commonly prescribed tests below: