रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - Respiratory Distress Syndrome in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 06, 2019

March 06, 2020

रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम
रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम

रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम काय आहे?

निओनेटल रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) हा एक विकार आहे ज्यामध्ये श्वास घेणे कठीण होते आणि हा प्रामुख्याने मुदतपूर्व जन्मलेले बाळ आणि नवजात बालकांमध्ये झालेला दिसतो. प्रौढांना हा विकार क्वचितच होतो आणि झाल्यास अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम  (एआरडीएस)म्हटल्या जातो. हा प्रामुख्याने मूळ आजार किंवा दुखापतीनंतर 24 ते 48 तासांच्या आत होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

नवजात मुलांमध्ये कधीकधी काही मिनिटांच्या आत किंवा जन्माच्या काही तासांमध्ये आरडीएसचे लक्षणं दिसून येतात आणि त्यात खालील बाबींचा समावेश असू शकतो :

  • वेगवान आणि / किंवा वरचेवर श्वासोच्छवास.
  • श्वासोच्छवास करण्यात त्रास किंवा थांबूनथांबून श्वास घेणे (श्वास घेण्यात थोडा वेळ थांबणे).
  • श्वास घेताना आवाज करणे.
  • असामान्य श्वासाच्या हालचाली.
  • नाकपुड्या रुंदावणे.  
  • कमी मूत्रविसर्जन.
  • त्वचा आणि श्लेष्मल पडद्यावर यांचा रंग बदलून निळसरपणा येणे (रक्तातील प्राणवायूचे प्रमाण अपुरे पडल्यामुळे).

याची मुख्य कारणं काय आहेत?

आरडीएस हा विकार अपूर्णपणे विकसित फुफ्फुसांमुळे  निओनेट्सला होतो आणि मुख्यत: कमी प्रमाणात सर्फॅक्टंटमुळे  (प्रौढ आणि विकसित फुफ्फुसातील एक फिसकट पदार्थ) होतो, ज्यामुळे फुफ्फुसात पुरेशी हवा भरली जाऊ शकत नाही. अनुवांशिक दोषामुळे देखील फुफ्फुसांच्या विकासादरम्यान आरडीएस होऊ शकतो. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये हे प्रमाण वेळेवर जन्मलेल्या बाळांपेक्षा अधिक दिसते. मेकॉनियमचा निश्वास, म्हणजे, गर्भाशयात असताना बाळ गर्भाशयात आकस्मिक त्याचे मल गिळल्याने आरडीएस होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर संपूर्ण तपासणी करतात आणि पुढील तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातात:

  • संसर्गाची शक्यता फेटाळण्यासाठी रक्त तपासणी.
  • छातीचा एक्स-रे, फुफ्फुसातील ग्राउंड ग्लासचे स्वरूप ओळखण्यासाठी, जे सामान्यतः जन्मानंतर  6 ते 12 तासांनी दिसून येते.
  • शरीराच्या द्रवपदार्थात असामान्य ऑक्सिजन पातळी आणि ॲसिड पातळी बघण्यासाठी ब्लड गॅस विश्लेषण.

या समस्येमुळे पीडित किंवा धोका असलेल्या नवजात मुलांना गंभीर काळजीची आवश्यकता असते आणि तज्ञांच्या देखरेखीची आवश्यकता असते. शरीराचे आदर्श तापमान राखून ठेवण्यासाठी मुलांना हलक्या रीतीने हाताळण्याशिवाय शांत सेटिंगची आवश्यकता असते. त्यांचे द्रवपदार्थ आणि पोषण व्यवस्थापित केले पाहिजे आणि संसर्ग असल्यास, त्यावर त्वरित उपचार केले जाणे आवश्यक आहे. विविध व्यवस्थापन पद्धतींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • काळजीपूर्वक देखरेख आणि सतत देखरेखीखाली नवजात बाळांसाठी उबदार, आर्द्र ऑक्सिजन प्रदान करणे.
  • अतिरिक्त किंवा कृत्रिम सर्फॅक्टंटचे व्यवस्थापन करणे, जे सामान्यपणे बाळाच्या वातनलिकेद्वारे थेट दिले जाते.
  • खालील परिस्थिती असेल तेव्हा व्हेंटिलेटर वापरण्याचा सल्ला दिला जातो :
    • रक्तातील कार्बन डायऑक्साइड पातळी अधिक आणि ऑक्सिजन पातळी कमी आहे.
    • कमी रक्त पीएच (अम्लता).
    • श्वास घेण्यामध्ये वारंवार विराम घेतला जातो.
  • सतत सकारात्मक वायुमार्गाचा दाब (सीपीएपी) हा व्हेंटिलेटर किंवा सीपीएपी यंत्राद्वारे उपचारांचा एक अन्य प्रकार आहे, ज्यामध्ये हवा नाकात सोडली जाते, ज्याला सहाय्यक व्हेंटिलेशनची आवश्यक नसते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Neonatal respiratory distress syndrome.
  2. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Respiratory Distress Syndrome.
  3. American Thoracic Society [Internet]. New York,United States of America; Respiratory Distress Syndrome of the Newborn.
  4. Victorian Agency for Health: Government of Victoria [Internet]; Respiratory distress syndrome (RDS) in neonates.
  5. Manthous CA. A practical approach to adult acute respiratory distress syndrome. Indian J Crit Care Med. 2010 Oct-Dec;14(4):196-201. PMID: 21572751
  6. National Organization for Rare Disorders [Internet]; Acute Respiratory Distress Syndrome.

रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम साठी औषधे

Medicines listed below are available for रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.