मूत्रपिंडाचा कर्करोग - Kidney Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 05, 2018

July 31, 2020

मूत्रपिंडाचा कर्करोग
मूत्रपिंडाचा कर्करोग

मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?

मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. जवळपास 90-95% मूत्रपिंडाचे कर्करोग रिनल सेल कार्सिनोमाचा प्रकार असतात. हा आजार प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळतो पण काही अनुवांशिक घटकांमुळे तरुणांमध्येही हा कर्करोग आढळतो. लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग फार क्वचितच आढळतो. सुरवातीला या आजराचे लक्षणे दिसून येत नाहीत त्यामुळे त्याचे निदान व उपचार करण्यात अडचण येते.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हा आजार अधिक प्रगत टप्प्यात जाईपर्यंत अस्पष्ट स्वरूपात असतो. त्यामुळे अनेक रूग्ण अजाण असतात.पुढील लक्षणे जाणवत असल्यास त्यास चेतावणी चिन्ह समजावे:

  • लघवीतून रक्त जाणे.
  • पाठीच्या खालच्या एका किंवा दोन्ही बाजूस दुखणे किंवा पोटाशी संबंधित दुखणे (पाठदुखीचे आणखी कारणे वाचा).
  • पोटामध्ये स्पष्ट द्रव्य जाणवणे.

इतर लक्षणांमध्ये अचानक आणि अनपेक्षितपणे वजन कमी होणे, भूक कमी होणे, सुस्तपणा आणि ताप यांचा समावेश होतो. याव्यतिरिकत या कर्करोगाचे कोणतेही लक्षणे नसतात आणि हा आजार इतर काही कारणास्तव केलेल्या इमेजिंग टेस्ट द्वारे निर्देशनात येतो.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची मुख्य करणे काय आहेत?

या कर्करोगासाठी कोणतेही एक विशिष्ट कारण जबाबदार नाही आहे. अनेक कारणे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्यास व वाढण्यास जबाबदार आहेत. ती अशी आहेत :

  1. धूम्रपान ज्यामुळे धोका दुप्पट होतो.
  2. लठ्ठपणा ज्यात बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) 30 पेक्षा जास्त असतो.
  3. अतितणाव.
  4. बेन्झीन सारख्या सुगंधित रसायनांचा संपर्क.
  5. दीर्घ काळ डायलिसिस.
  6. मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या निदान व उपचार कसे केले जातात?

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे कमी आहेत.  पण रिनल कार्सिनोमा ही कर्करोग अधिक प्रमाणात कॅल्शिअम आणि वाढलेल्या लाल रक्तपेशी असलेल्या पारानिओप्लास्टीक सिन्ड्रोम च्या संख्यांशी शी संबंधित आहे. अनेकदा चाचण्यांची सुरुवात रूग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि परिक्षणापासून होते. मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या संशय असल्यास रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. कर्करोगाची शक्यता आढळल्यास किंवा पोटच्या भागात द्रवसदृश्य पदार्थ सापडल्यास एम आर आय आणि सी टी स्कॅन सारख्या इमेजिंग टेस्ट ची आवश्यकता असते. तसेच अल्ट्रासाऊंड, पीइटी स्कॅन आणि छाती व हाडांचे एक्स रे घेऊन रोगसंक्रमणाचे प्रमाण तपासले जाते.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या गंभीरतेनुसार उपचारपद्दती बदलतात. या उपचारांमध्ये शस्त्रक्रियाही केली जाते ज्यामध्ये मूत्रपिंडाचा विशिष्ट भाग किंवा पूर्ण मूत्रपिंड काढून टाकले जाते आणि हा उपचार रोगाच्या गाठीवर (ट्युमर) अवलंबून असतो . हा उपचार रासायनिक थेरपी (किमोथेरपी) च्या सहयोगाने केला जातो.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Overview - Kidney cancer
  2. American Cancer Society. Risk Factors for Kidney Cancer. [Internet]
  3. Seth P Lerner et al. Kidney Cancer. Urol Oncol. Author manuscript; available in PMC 2015 May 5. PMID: 23218074
  4. Garfield K, LaGrange CA. Cancer, Renal Cell. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Kidney Cancer

मूत्रपिंडाचा कर्करोग साठी औषधे

Medicines listed below are available for मूत्रपिंडाचा कर्करोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.