ह्रदयाचा लय नसणे(एरिथिमिया) - Arrhythmia in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 27, 2018

March 06, 2020

ह्रदयाचा लय नसणे
ह्रदयाचा लय नसणे

हृदयाचा लय नसणे (एरिथिमिया) म्हणजे काय?

हृदयाचा लय नसणे हा एक हृदयासंबंधित आजार आहे, ज्यामध्ये हृदयाचा ठोका अनियमित स्वरुपाचा असतो. प्रौढांमध्ये, सामान्य विश्रांतीचा हार्ट रेट  60 ते 100 बीट्स प्रति मिनिट दरम्यान असतो. हृदयाचा लय नसणे आजारात, हृदयाचा ठोका सामान्य हार्ट रेट पेक्षा कमी किंवा जास्त किंवा अनियमित असतो. हृदयाचा लय नसण्याचे विविध प्रकार आहेत, सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे ॲट्रियल फिब्रिलेशन ज्यात हार्ट बीट्स अनियमित आणि सामान्यपेक्षा जलद असतात.

जर सामान्यपेक्षा जलद हार्ट बीट्स असतील तर त्याला टॅकीकार्डिया म्हणतात (> दर मिनीटाला 100 बीट्स). आणि जर सामान्यपेक्षा कमी हार्ट बीट्स असतील तर त्याला ब्रॅडकार्डिया म्हणतात (< दर मिनीटाला 60 बीट्स).

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वेगवेगळ्या प्रकारचे  एरिथिमियाचे लक्षणे एकाच वेळी पाहिली जाऊ शकतात.

टॅकीकार्डियामधील एरिथिमियाचे लक्षणे:

ब्रॅडकार्डियामधील हृदयाचा लय नसण्याचे लक्षणे:

  • गोंधळणे.
  • पालपीटेशन्स.
  • घाम येणे.
  • थकवा.
  • व्यायाम करताना त्रास होणे.
  • धाप लागणे.

हृदयाचा लय नसल्याचे मुख्य कारण काय आहेत?

हृदयातील ऊतकांमध्ये असामान्य बदल झाल्याने हृदयाचा लय नसण्याचा विकार होतो. हा आजार सहसा काही कारणामुळे सुरु होतो, तर काही व्यक्तींमध्ये कारण अज्ञात असू शकते. एरिथिमियाचे मुख्य कारणं पुढील प्रमाणे आहेत:

  • हृदयाच्या ऊतकांमधील असाधारण बदल जसे हृदयातील रक्त प्रवाह कमी होणे, हृदयाच्या ऊतकांचे कडक होणे किंवा त्यावर जखम होणे.
  • परिश्रम आणि भावनात्मक तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि स्ट्रेस हार्मोन्स सोडण्यासाठी कारणीभूत ठरते, हे देखील हृदयाचा लय नसल्याचे कारण होऊ शकते.
  • रक्तप्रवाहात इलेक्ट्रोलाइट्स, हार्मोन्स किंवा द्रवपदार्थांच्या असंतुलनामुळे देखील हृदयाच्या गतीवर वर परिणाम होऊ शकतो.
  • हायपरटेन्शनच्या औषधांसारख्या औषधोपचारामुळे सुद्धा एरिथिमिया होऊ शकतो.

वाढते वय, कौटुंबिक इतिहास, आणि अनुवंशिकता यासारख्या घटकांमुळे हृदयाचा लय नसण्याचा धोका वाढू शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

एरिथिमियाचे निदान करण्यासाठी, डॉक्टर रुग्णाच्या कौटुंबिक इतिहासाविषयी, शारीरिक दिनचर्येबद्दल आणि इतर कारणाविषयी विचारपूस करतात.

याव्यतिरिक्त, एक शारीरिक चाचणी केली जाते. यात डॉक्टर नाडी, हृदयाची गती आणि इतर आजारांची लक्षणे तपासतात.

इतर निदान तपासणी खालीलप्रमाणे आहेत:

  • रक्त तपासणी - इलेक्ट्रोलाइट्स, लिपिड्स, हार्मोन्सच्या स्तरांचे मूल्यांकन करण्यासाठी.
  • इलेक्ट्रोकर्डियोग्राम (ईसीजी) - हृदयाचा ठोका, त्याचा रेट, लय इत्यादींचे मूल्यांकन करण्यासाठी.
  • इकोकार्डियोग्राफी (हृदयाचा अल्ट्रासाऊंड स्कॅन).
  • शरीराच्या विविध भागांचे अल्ट्रासाऊंड - इतर रोग वगळण्यासाठी.

हृदयाचा लय नसण्याच्या उपचारांमध्ये परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. डॉक्टर हार्ट रेट स्थिर करण्यासाठी ब्लड थिनर्स, बिटा ब्लॉकर्स किंवा एडेनोसाइन्स सारखे औषध देऊ शकतात.काही गंभीर प्रकरणांमध्ये, हृदयाचा ठोका नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर आणि इम्प्लांटेबल कार्डियोव्हर्टर डिफायब्रिलेटर सारख्या प्रत्यारोपित उपकरणांचा उपयोग केला जातो.



संदर्भ

  1. merican Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: Common Tests for Arrhythmia
  2. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Arrhythmia
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Arrhythmia
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Arrhythmias
  5. Health On The Net. Heart arrhythmias. Australia; [internet]

ह्रदयाचा लय नसणे(एरिथिमिया) साठी औषधे

Medicines listed below are available for ह्रदयाचा लय नसणे(एरिथिमिया). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.