स्तनामधील गाठी स्तनांच्या असामान्य तंतू वाढी असतात. त्या गोल किंवा अनियमित, वेदनायुक्त किंवा वेदनाहीन, अल्सरसह किंवा त्याशिवाय, मऊ किंवा कठीण आणि कर्करोगयुक्त किंवा कर्करोगपूर्ण असू शकतात. अधिकतर स्तनातील गाठी हानिकारक नसतात. म्हणून, तुम्हाला स्तनामधील गाठ ओळखायला आल्यास किंवा तसे निदान झाल्यास, काळजी करू नका. म्हणून, डॉक्टराच्या मदतीशिवाय त्यांचा निदान करता येत नाही.

म्हणून, तुमच्या स्तनामध्ये गाठीचे संशय असल्यास तुम्ही वैद्यकीय मदत घेण्यात कधी विलंब करू नये. स्तनामधील गाठीची उपेक्षा करणें हे योग्य नव्हे, कारण ते वाढू शकतात आणि त्यांमुळे तुम्हाला गैरसोय होऊ शकते. त्याचे उपचार न झाल्यास, तुम्हाला गंभीर गुंतागुंती होऊ शकतात आणि तुमचे स्तन काढावे लागण्याची गरज पडू शकते.

 1. कर्करोगरहित स्तनामधील गाठी - Non cancerous breast lumps in Marathi
 2. कर्करोगयुक्त गाठी - Cancerous lumps in Marathi
 3. घरी स्तनातील गाठींची तपासणी कशी करावी - How to check for breast lumps at home in Marathi
 4. स्तनाच्या गाठीची लक्षणे - Breast lump symptoms in Marathi
 5. स्तनाच्या गाठीची कारणे आणि धोक्यातील घटक - Breast lump causes and risk factors in Marathi
 6. स्तनामधील गाठीसाठी निदान - Diagnosis for lump in breast in Marathi
 7. स्तनातील गाठीचे उपचार - Breast lump treatment in Marathi

कर्करोगरहित स्तनामधील गाठी स्तनामधील असामान्य वाढी असतत, ज्यांमध्ये कर्करोग कोशिका नसतात. त्या स्तनातील तंतूच्या बाहेर पसरत नाहीत आणि जीवनास घातक नसतात.

 • फायब्रोएडेनेमा
  ही स्त्रियांमध्ये होणारी सर्वांत सामान्य स्तनामधील गाठ असते. फायब्रोएडेनॉमामध्ये, स्तनाचे तंतूयुक्त आणि ग्रंथीतील तंतू दोघांचीच असामान्य वाढ होते. या गाठी सामान्यपणें मऊ ते कडक असतात आणि स्तनातील हालचाल करू शकतात, त्या भोवतीच्या त्या भोवतीच्या स्तनातील तंतूशी जोडलेल्या नसतात.
   
 • वळू
  वळू मऊ, तरळ पदार्थाने भरलेल्या पिशवीसारख्या वाढी असतात, ज्या अधिकतम संरचनेत गोल असतात. त्याने स्तनांमध्ये थोडीशी वेदनाही होऊ शकते.
   
 • फायब्रोसिस्टिक रोग
  स्तनांच्या फायब्रोसिस्टिक रोगामध्ये तीन प्रकारचे तंतू असतात, ज्यांमध्ये वळू बनणें, फायब्रोसिस ( तंतूमय ऊतकाची असामान्य वाढ) आणि स्तनामधील ग्रंथीच्या तंतूची गरजेपेक्षा अधिक वाढ होते.
   
 • एब्सेस
  एब्सेस स्तनाच्या संक्रमणामुळे होतात. कधी-कधी स्तनाच्या कातडीतील अल्सरेशनशी त्या निगडीत असू शकतात. त्या वेदनामय आणि गैरसोयीच्या असतात. एब्सेस सर्वांत सामान्यपणें स्तनपान करवणार्र्या स्त्रियांमध्ये होतात.
   
 • एडेनॉमा
  स्तनामधील आतील किनार किंवा ग्रंथीतील एपिथॅलिअम असामान्यपणें वाढायला लागल्यास होणार्र्या गाठी म्हणजे एडॅनॉमा.
   
 • पॅपिलॉमा
  पॅपिलॉंआ म्हणजे दुधाच्या डक्टच्या आत आणि बाहेर वाढणार्र्या छोट्या बोटासारख्या संरचना असतात. त्या स्तनाग्रांमधील गळतीशी संबंधित असू शकतात. या गळतीमुळे रक्ताची लक्षणेही दिसू शकतात.
   
 • लिपॉमा आणि फॅट नेक्रॉसिस
  लिपॉमा स्तनातील वसायुक्त तंतूची असामान्य वाढ असते. स्तनाच्या वसा कोशिकांची मृत्यू आणि डिसॉल्यूशन झाल्यास फॅट नेक्रॉसिस होते.
Women Health Supplements
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

कर्करोगयुक्त गाठी आधी वेदनामय नसल्यास त्या झपाट्याने वाढतात. त्यामध्ये सुपरिभाषित सीमा असतात. या वाढींमुळे शेजारील तंतू वाढतात आणि नष्ट होऊ शकतात. त्या सामान्यपणें कडक आणि भोवतीची किंवा अंतर्निहित स्तनातील ऊतकांशी जोडलेल्या असतात. उपचार न केल्यास, काही कर्करोग कोशिका तुटू शकतात आणि शरिराच्या विभिन्न भागांमध्ये प्रवास करून तिथे कर्करोग होऊ शकतो. याला कर्करोगाचे मॅस्टॅसिस म्हणतात.

 (अधिक वाचा: स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे)

स्तनाचे स्वपरीक्षण हे जाणून घेण्याची एक चांगली पद्धत आहे की तुमची स्तने कशी दिसतात. म्हणून, हे दररोज केल्याने तुमच्या स्तनांमध्ये एखादी असामान्यता असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या मासिक धर्मानंतर तुमच्या स्तनाचे परीक्षण दर तीन ते पाच दिवसांनी करा. तुम्ही स्वतः तुमच्या स्तनांचे परीक्षण केल्यास तुम्ही या टप्प्यांचे पालन करू शकता:

पडून राहणें

पडून राहिल्याने तुमच्या स्तनांचे बेहत्तर परीक्षण होईल आणि त्याच्यात गाठ असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही खाली पडून तुमच्या डोक्यामागे तुमचा डावा हात ठेवू शकता. उजव्या हाताने, तुमच्या डाव्या स्तनाचे परीक्षण करायला सुरू करू शकता. असे करण्यासाठी, तुमच्या स्तनाची तपासणी करण्यासाठी छोटे, हळुवार पण दृढ आणि वृत्ताकार हालचाली कराव्यात. तुमच्या स्तनाच्या खालील भागापासून सुरू करा आणि वरच्या दिशेने चला. तुमच्या उजव्या स्तनाचे परीक्षण करण्यासाठी त्याच पद्धतीचा अवलंब करा आणि तुमच्या डोक्यामागे तुमचा उजवा हात ठेवा.

बसणें

पडून राहिल्यानंतर तुमचे परीक्षण करून झाल्यास, तुम्ही उठून बसू शकता आणि तुमच्या काखांचे परीक्षण करण्याची सुरवात करू शकता, कारण तुमच्या स्तनातील ऊतकसुद्धा तुमच्या काखेपर्यंत पोचतात. कोणतीही असामान्य वाढ किंवा गाठ याकरिता तुम्ही तुमच्या काखांमधील अधिक गहन तंतूंना स्पर्श करण्यासाठी त्याच वृत्ताकार हालचालींचा वापर करू शकता.

उभा राहणें

तुम्ही दोन पद्धतींमध्ये परीक्षण करू शकता; एक म्हणजे तुमच्या कंबरेवर हात टिकवून आणि दुसरे म्हणजे तुमच्या डोक्याच्या वरती त्यांना उचलून धरून. हे करत असतांना, आरशात तुमच्या स्तनांकडे पहा आणि खालील बाबींची तपासणी करा:

 • दोन्ही स्तनांची रूपरेषा जवळपास एकच असली पाहिजे.
 • दोन्ही स्तनांची त्वचा सामान्य असल्याचे आणि तुमच्या शरिराच्या बाकीच्या त्वचेसारखे असल्याची तपासणी करा.
 • स्तनांपैकी कशामध्येही पुरळ किंवा संत्र्याच्या सालीसारखी संरचना असल्याचे तपासून घ्या. असे असल्यास, तुम्ही डॉक्टरांना संपर्क केले पाहिजे.
 • दोन्ही स्तनांचे आकार एकच असले पाहिजे.
 • दोन्ही स्तनाग्रांची स्थिती एकाच स्तरावर असली पाहिजे.
 • या स्तनाग्रांच्या आतील डिपिंग किंवा संकुचन पावणें होत आहे का ते पहा.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Prajnas Fertility Booster by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors for lakhs of male and female infertility problems with good results.
Fertility Booster
₹899  ₹999  10% OFF
BUY NOW

स्तनाच्या गाठींच्या खालील लक्षणांपैकी एकाचे तुम्ही अनुभव घेऊ शकता:

 • दुसर्र्याच्या तुलनेत एका स्तनाचे अचानक आकार वाढणें.
 • स्तनाग्र आणि स्तनाच्या भागाच्या भोवती त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसणें.
 • एक किंवा दोन्ही स्तनांग्रांच्या स्थितीमध्ये असामान्य अंतरण.
 • स्तनाग्रांमधून गळती जी जलमय, पांढरी छटा घेऊन पिवळी, हिरवीसर, तपकिरी आणि लालसर असू शकते. खूप वेळा लालसर गळती प्रकृतीमध्ये रक्ताच्या रंगाच्या असतात आणि त्यांची माहिती लगेच डॉक्टरांना दिली पाहिजे.
 • एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये स्तनाच्या ऊतकामध्ये पुरळ किंवा खालच्या दिशेने जाणें.
 • एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये वेदना किंवा जडपणा तुम्हाला जाणवू शकतो.
 • वजन किंवा भूक कमी होणें.
 • तुमच्या स्तनात गोल पिंड किंवा अनियमित मऊ ते कडक गाठ दिसणें किंवा जाणवणें.

कारणे

स्तनाची गाठ होण्याच्या कारणांमध्ये हे सामील आहेत:

 • संक्रमण
  स्तनातील ऊतकाचे संक्रमण स्तनाग्रांमार्फत होऊन किंवा रक्ताभिसरणामध्ये आधीच असलेल्या संक्रमणामुळेही होऊनही गाठ बनू शकते. काखेच्या संक्रमणांमुळेही तुमच्या स्तनांमध्ये संक्रमण होऊ शकते.
   
 • दाह
  स्तनातील ऊतकामधील सुजेमुळे वेदना किंवा गैरसोय होऊ शकते.
   
 • हृदयाघात
  स्तनांना आकस्मिक घात किंवा दुखण्यामुळे स्तनातील ऊतकामध्ये संक्रमण किंवा सूज किंवा एखादे पिंड निर्मित होऊ शकते.
   
 • विकिरण
  तुमच्या शरिरात रोगासाठी तुम्हाला रेडिओथेरपी मिळत असल्यास, तुमच्या स्तनातील कोशिकांमध्ये विकिरणाद्वारे क्षती झाल्यानंतर असामान्य अत्यधिक वाढ होऊ शकते.
   
 • कर्करोग होणारे विषाणू
  काही विषाणू आणि जिवाणू आहेत, जे स्तनातील कोशिकांना बदलून परिणामी त्यांची असामान्य वाढ होऊ शकते. यामध्ये ह्युमन पॅपिलोमॅव्हायरस (एचपीव्ही), एप्स्टाइन-बार विषाणू, बोवीन ल्युकेमिआ विषाणू इ. सामील असतात.
   

धोक्यातील घटक
काही विशिष्ट घटकांमुळे स्तनातील गाठी आणि स्तनाचे कर्करोग होण्याचा अधिक धोका होऊ शकतो. हे आहेत:

 • लिंग
   “स्त्री व पुरुष स्तनाचे कर्करोग होण्याच्या शक्यतांच्या दराचे आंतरराष्ट्रीय तुलना” याप्रमाणें, स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत स्तनातील गाठी विकसित होण्याची अधिक शक्यता असते, ज्याचे कारण शरिरात अधिक प्रमाणात एस्ट्रोजेन होणें असे असते.
   
 • लठ्ठपणा
  वजन अधिक असल्याने न केवळ स्तनातील गाठ होण्याचा धोका वाढतो, तर हृदयरोग होण्याचा अधिक धोका होण्याशीही ते संबंधित आहे.
   
 • वय
  “सामान्य स्तनरोग अभिजन्यता: ऐतिहासिक रोगशास्त्र, वय आणि आनुवंशिकतेशी संबंध” हा अभ्यास सुचवतो की 56 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या स्त्रियांना कमी वयाच्या स्त्रियांच्या तुलनेत कर्करोगयुक्त आणि कर्करोगरहित गाठी होण्याचा कमी धोका असतो. याचे कारण असे की स्तनांवर लैंगिक हार्मोनचे प्रभाव रजोनिवृत्ती (मासिक धर्म संपणें) यानंतर कमी होतो. तसेच, या वयानंतर स्तनातील ऊतके मागे येण्यास सुरवात होऊन कोशिका वाढींची खूप कमी दर होते.
   
 • स्तनातील गाठी किंवा कर्करोगाचा संक्षिप्त इतिहास
  पैतृक किंवा माताच्या बाजूने किंवा लगेचच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला स्तनाची गाठ किंवा कर्करोग असल्यास, तुम्हालाही असे रोग होण्याचा धोका होईल. या गाठींना आनुवंशिक क्रम असल्याचेही आढळले आह.
   
 • स्तनावरील आधीच्या शस्त्रक्रिया
  तुमच्या स्तनातील ऊतकाची आधीची शस्त्रक्रिया झालेली असल्यास, त्या शस्त्रक्रियेवरील चट्ट्याच्या ऊतकाच्या संबंधात तुम्हाला स्तनातील गाठ होऊ शकते.
   
 • हार्मोन अंतरण थेरपी
  “स्त्रियांमधील सामान्य स्तनरोग” याचे अवलोकन सुचवते की रजोनिवृत्तीनंतर हार्मोन प्रत्यंतरण थेरपी होणार्र्या स्त्रियांना स्तनातील गाठ होण्याचा अधिक धोका असतो, विशेष करून जे रजोनिवृत्तीनंतर थोड्याच वेळात असे होणें सुरू होते.
   
 • धूम्रपान आणि अल्कोहल

“स्तनाच्या कर्करोगासाठी जीवनशैलीतील धोक्याचे घटक म्हणून सिगारेट ओढण्यात हल्लीची माहिती” यानुसार, धूम्रपान आणि अल्कोहल माफकपेक्षा अधिक प्रमाणात घेणार्र्या स्त्रियांमध्ये स्तनाचे रोग व कर्करोगाचा धोका वाढवणार्र्या घटकांपैकी आहे.

 • जीन म्युटेशन
  बीआरसीए1 किंवा बीआरसीए 2 अशी प्रथिने निर्माण करण्याशी संबद्ध आहे, जी स्तने व अंडाशयांमध्ये गाठ दाबण्यात मदत करतात. ते डीएनए संशोधित करण्यात मदत करतात आणि म्हणून जनुकीय सामग्रीच्या स्थिरतेला सांभाळतात. या जनुकांमधील कोणतेही म्युटेशन स्त्रियांमध्ये स्तन व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात.

स्तनाच्या गाठीच्या निदानांमध्ये सामान्यपणें तीन चरणे म्हणतात, ज्याला “ट्रिपल एसेसमेंट” म्हणतात. या चरणांना वैद्यकीय आकलन, इमेजिंग आणि शस्त्रक्रिया असे म्हणतात.

वैद्यकीय आकलन

हे निदानाचे पहिले चरण आहे, ज्यामध्ये अर्हताप्राप्त डॉक्टर स्तनातील गाठींशी निगडीत अवधी आणि लक्षणांबद्दल विचारेल. तुमचा चिकित्सक तुम्हाला इतर गोष्टी उदा. मासिक धर्म सुरू होण्याचे वय, रजोनिवृत्तीचे वय, तुम्हाला असलेली मुले, स्तनाचे कर्करोग किंवा इतर कर्करोग असलेले कुटुंबातील इतर सदस्य याबद्दलही विचारेल. यानंतर, तुमचे डॉक्टर तुमच्या स्तनांचे विस्तृत शारीरिक चाचणी करेल व गाठीचे स्वरूप, आकार आणि विस्तार याबद्दल जाणून घेतील. तुमचे डॉक्टर पुरुष असल्यास, स्त्री सहचारिका किंवा परिचारिका परीक्षणादरम्यान तिथे उपस्थित असेल.

इमेजिंग

वैद्यकीय चाचणीनंतर, तुमचे चिकित्सक तुम्हाला खालीलपैकी काही अन्वेषक प्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देऊ शकतात:

 • मॅमोग्राफी
  आंतरिक आणि बाह्य स्तनातील ऊतकांचे चित्र मिळणयसाठी कमी मात्रेत क्ष किरणे देणारी ही एक पद्धत आहे. लपव्या कर्करोगयुक्त वाढी व गाठी ओळखण्यात ती खूप मदतशीर असते. या प्रक्रियेचे वापर स्क्रीनिंग पद्धत म्हणून केले जाते, ज्यामध्ये 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या स्त्रियांना अज्ञात आणि लक्षणरहित स्तनातील गाठींचे अन्वेषण करण्यासाठी केले जाते.
 • अल्ट्रासाउंड
  हे सामान्यपणें 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या स्त्रियांमध्ये केले जाते. या पद्धतीमध्ये, ध्वनी लहरी स्तनातील ऊतकांमार्फत पास केल्या जातात आणि चित्र संगणकाच्या पडद्यावर दिसतात.
 • एमआरआय (मॅग्नेटिक रेसॉनॅंस इमेजिंग)
  एमआरआय स्तनाचे कर्करोग ओळखण्यात खूप संवेदनशील आहे. ती स्तनातील गाठींचे व्यापक आणि बिगरव्यापक दोन्ही प्रकार ओळखू शकते.

शस्त्रक्रिया

हे तिसरे चरण असते आणि ती स्तनातील गाठीचे निदान करण्यात नेमकी व प्रभावीही असते. यामध्ये, तुमच्या स्तनातील ऊतकाला घेतले जाते आणि तुमच्या स्तनांतील असामान्यतेचे प्रकार जाणून घेण्यासाठी अन्वेषण केले जाते. शस्त्रक्रिया एक बारीक सूई, कोर निडल किंवा एक्झिसन वापरून केली जाते.

 • फाइन नीडल एस्पिरेशन साइटॉलॉजी (एफनॅक)
  यामध्ये, कोशिका काढण्यासाठी खूप बारीक सूई वापरली जाते आणि तुमच्या स्तनाच्या प्रभावित क्षेत्रातील तरळ पदार्थ आणि सूक्ष्मदर्शीखाली (कोशिकांचे अभ्यास करण्यासाठी मोठी लेंस असलेली टेलिस्कोपसारखे यंत्र) त्यांचे परीक्षण केले जाते
 • कोर निडल बायोप्सी
  ही पद्धत फाइन निडल बायोप्सीसारखीच असते. यामधील एकमेव बदल म्हणजे वापरली जाणारी सूई एफनॅकमध्ये वापरल्या जाणार्र्या सूईपेक्षा थोडी मोठी असते.
 • एसिझनल बायोप्सी
  या उपचारपद्धतीमध्ये, छोट्या प्रमाणात प्रभावित ऊतकाला तुमच्या स्तनामधून जर्म-फ्री ब्लेड वापरून कापले जाते. या ऊतकाला त्यानंतर प्रक्रियेसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाते, जिथे याला एका तज्ञाद्वारे तुमच्या स्तनात असू शकलेल्या गाठीच्या प्रकाराचे निदान करण्यासाठी चाचणी केली जाते.

मेटास्टेसेससाठी इमेजिंग
कर्करोगाचे शरिराचे इतर भाग किंवा मेटास्टेसेस यामध्ये पसाराचे संशय असल्यास या चाचणी केल्या जातात. छातीची क्षकिरण तपासणी केल्यास फुफ्फुसांमधील मेस्टाटेस्टेस निर्धारित करण्यास सक्षम असते. यकृत व पोटाचे सीटी स्कॅन सहायक असू शकते, जर या भागांना मेस्टास्टेटेसचे संशय असले तर.

Ashokarishta
₹360  ₹400  10% OFF
BUY NOW

औषधे

तुमच्या स्तनाच्या गाठीच्या कारणावर अवलंबून असल्यानुसार, तुमचे चिकित्सक तुमच्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी औषधे विहित करू शकतात.

 • प्रतिजैविके आणि दाहशामक औषधे
  तुमच्या स्तनातील गाठीचे अंतर्निहित कारण तुमच्या स्तनांमधील संक्रमण किंवा दाह (सूज) असल्यास तुमचे चिकित्सक ही औषधे विहित करू शकतात.
   
 • कीमोथेरपी
  कीमोथेरपी औषधे वापरून एखादे रोग किंवा विकार यावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी एक व्यापक संज्ञा आहे. तरीही, ही संज्ञा औषधे वापरून गाठींच्या उपचाराकडे इंगित करण्यासाठी सामान्यपणें वापरली जाते. म्हणून, तुमच्या स्तनांमध्ये गाठी असल्यास, ही औषधे एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी तिला विरघळणें किंवा तिचे आकार कमी करण्यासाठी वापरल्या जातात.

रेडिओथेरपी

रेडिओथेरपी गाठ विरघळण्यासाठी गाठीच्या कोशिका नष्ट करणें किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी तिचा आकार कमी करण्यासाठी विकिरणाचे वापर करते.

शस्त्रक्रिया

वरील पद्धती तुमच्या स्तनातील गाठ पूर्वीसारखी करू शकत नाहीत, किंवा जेव्हा कर्करोगाचे निदान होते, तुम्हाला तुमच्या स्तनांतून गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, संपूर्ण स्तन काढण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

 • लंपॅक्टॉमी
  या प्रक्रियेमध्ये, शल्यचिकित्सक पुढे वाढणें आणि बाकीचे स्तनातील ऊतक नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी स्तनामधील गाठ काढून टाकेल.
   
 • मॅसॅक्टॉमी
  मॅसॅक्टॉमी अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमचे स्तन एकतर आंशिकरीत्या किंवा संपूर्णपणें काढण्यात येईल, जेव्हा कोणतीही इतर पद्धती तुमच्या परिस्थितीच्या उपचार करण्यात मदत होत नसेल. काही वेळा, ती गाठ तुमची काख किंवा आतील स्नायूंपर्यंतही पोचू शकते. अशा वेळेस, या ऊतकांचे काही भाग स्तनाबरोबर काढावे लागू शकत असते.

संदर्भ

 1. Toomey A, Le JK. Abscess, Breast. [Updated 2019 Jan 11]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Breast self-exam
 3. Colin B Seymour, Carmel Mothersill. Breast cancer causes and treatment: where are we going wrong? Breast Cancer (Dove Med Press). 2013; 5: 111–119. PMID: 24648764
 4. Diana Ly, David Forman, Jacques Ferlay, Louise A. Brinton, Michael B. Cook. An International Comparison of Male and Female Breast Cancer Incidence Rates. Int J Cancer. 2013 Apr 15; 132(8): 1918–1926. PMID: 22987302
 5. Shannon Kispert, Jane McHowat. Recent insights into cigarette smoking as a lifestyle risk factor for breast cancer. Breast Cancer (Dove Med Press). 2017; 9: 127–132. PMID: 28331363
 6. Jingfang Cheng, Shijing Qiu, Usha Raju, Sandra R. Wolman, Maria J. Worsham. Benign Breast Disease Heterogeneity: Association with histopathology, age, and ethnicity. Breast Cancer Res Treat. 2008 Sep; 111(2): 289–296. PMID: 17917807
 7. Shannon Kispert, Jane McHowat. Recent insights into cigarette smoking as a lifestyle risk factor for breast cancer. Breast Cancer (Dove Med Press). 2017; 9: 127–132. PMID: 28331363
 8. Santen RJ. Benign Breast Disease in Women. [Updated 2018 May 25]. In: Feingold KR, Anawalt B, Boyce A, et al., editors. Endotext [Internet]. South Dartmouth (MA): MDText.com, Inc.; 2000-.
 9. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; BRCA Mutations: Cancer Risk and Genetic Testing
Read on app