शतावरी (एस्पॅरॅगस रेसेमोस) काय आहे?

हिमालयीन क्षेत्र निसर्गाच्या अंतहीन उपहारांनी नटले आहे. आभूषणात्मक यापासून उपचारात्मक आणि विशिष्ट उपचारक पदार्थ असल्यामुळे, इथे जवळपास प्रत्येक मानवी आवश्यकतेसाठी नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत. शतावरी हिमालयाच्या वने आणि हिमालयीन क्षेत्रांच्या पायथ्यामध्ये आढळणारी अशी एक वनस्पती आहे, ती आयुर्वेदातील प्राचीनतम वनस्पतींपैकी एक आहे आणि त्याचे उल्लेख भारतीय औषधशास्त्राच्या प्राचीनतम पुस्तकांमध्ये आढळतात. चरकसंहिता आणि अष्टांगहृदयममध्ये त्याला “महिलांचे टॉनिक” असे नांव दिले गेले आहे. वास्तविक पाहता, तुम्हाला जाणून घेण्यास आश्चर्य होईल की शतावरी म्हणजे “शंभर पती असलेली” असे आहे. शतावरी महिला प्रजननतंत्राच्या सर्वांगीण आरोग्यामधील लाभांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हेच सगळे आहे, तर तुमच्या हे ही आश्चर्य असेल की शतावरीला आयुर्वदामध्ये “शंभर रोगांवर उपचार ” असे म्हटले आहे. तसेच, एडॅप्टोजेनिक (तणावरोधी) आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म त्याला अधिकतम तणावरोधी आणि वयसंबंधी समस्या कमी करण्यासाठी खूप प्रभावी वनस्पती आहे. या वनस्पतीचे असे महत्त्व आहे की आयुर्वेद त्याला “वनस्पतींची राणी” असे म्हटले आहे.

शतावरीबद्दल काही मूळभूत तथ्य:

 • वनस्पतिशास्त्रीय नांव: एस्पॅरॅगस रेसेमोस  
 • कुटुंब: लिलिएसॅस/ एस्पॅरागॅस
 • सामान्य नांव:  शतावरी, एस्पॅरॅगस मूळ, इंडिअन एस्पॅरॅगस
 • संस्कृत नांव: शतावरी, शतमूली/शतामुली
 • वापरले जाणारे भाग: मूळ आणि पाने
 • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: शतावरी भारतीय उपमहाद्वीपाच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांतील स्थानिक आहे, पण ती हिमालयीन क्षेत्रांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते, शतावरी श्रीलंका आणि नेपाळमधील काही भागांमध्येही आढळते.
 • तासीर: थंड करणें आणि आर्द्रता प्रदान करणें. आयुर्वेदामध्ये, ते वात आणि पित्त दोषांचे संतुलन करते, असे म्हटले जाते.
 1. शतावरीचे आरोग्य फायदे - Health benefits of shatavari in Marathi
 2. शतावरीचे रोप आणि शतावरी कशी वापरली जाते - Asparagus plant and how is Shatavari used in Marathi
 3. शतावरीची मात्रा - Shatavari dosage in Marathi
 4. शतावरीचे सहप्रभाव - Shatavari side effects in Marathi
Advertisement' height='1px' width='1px' ALT='Advertisement'/>

शतावरी प्रजननक्षमतेसाठी आणि महिलांच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप उत्कृष्ट वनस्पती आहे, पण काही कारणांमुळे तिला अनेक उपाय असलेली वनस्पती असे म्हटले जाते.

 • महिला आरोग्यात पुरोधा: शतावरी महिलांसाठीच्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. ती त्यांची लैंगिक क्षमता वाढवते, हार्मोन्सला संतुलित करते आणि प्रजननक्षमता सुधारते. शतावरी घेतल्याने मासिक धर्मातील वेदना कमी होते आणि मासिक धर्म नियमित झाल्याचे आढळले आहे.
 • पीसीओएस मध्ये लाभकारक आहे: संशोधन अभ्यास सुचवतात की शतावरीचे शरिरावर एस्ट्रोजेनसारखे प्रभाव होते, जे महिलांमधील हार्मोन कार्याला सुसज्ज करतो आणि ऊसाइट्सच्या योग्य विकासामध्ये साहाय्य करतो, ज्याने पीसीओएससाठी सर्व धोका घटक सांभाळले जातात. तरी पीसीओएस निवारणासाठी त्याची कार्यक्षमता आणि मात्रेची पुष्टी करण्यासाठी अजून अभ्यासांची गरज आहे.
 • पुरुषांमधील लैंगिक इच्छा सुधारते: शतावरी न केवळ महिलांसाठी, तर पुरुषांसाठीही लाभकारक आहे. नियमित शतावरी घेतल्याने शरिरावर एफ्रोडिझिअक कार्य दिसून आल्याचा दावा केला गेला आहे. तरीही, वैद्यकीय अभ्यासाच्या अभावामध्ये, या लाभाबद्दल डॉक्टराशी बोलून अजून जाणून घेणें बेहतर राहील.
 • संगोपक मातांसाठीचे लाभ: शतावरी आयुर्वेदिक औषधांमध्ये एक दुग्धवर्धक म्हणून वापरले जाते. वैद्यकीयपूर्व पुराव्यांना या लाभाची पुष्टी केली असली, तरी शतावरीचे दुधवर्धक कार्य सिद्ध करण्यात मानवी अभ्यास अजून अपुराच ठरला आहे.
 • तणाव कमी करते: शतावरीचे वैद्यकीयपूर्व परिस्थितींमध्ये प्रभावी तणावरोधक म्हणून कार्य आढळले आहे. एडॅप्टोजेनिक वनस्पती म्हणून, ते तुमच्या शरिरामधील तणाव हार्मोन कमी करतो आणि तुमचे मन तणावमुक्त होते.
 • नैसर्गिक एंटीऑक्सिडेंट: प्रयोगशाळा अभ्यास सुचवतात की शतावरी एंटीऑक्सिडेंट यौगिकांचे भंडार आहे, जे फ्री रॅडिकल हानीशी झगडते आणि रोगांशी झुंज देण्याची तुमची नैसर्गिक क्षमता सुधारते. ती वयवाढ प्रलंबित करते आणि अवयवांचे कार्यही सुधारते.
 • पेप्टिक अल्सर कमी करते: वैद्यकीय अभ्यासात आढळले आहे की, नियमित 3 ग्रॅम शतावरी दुधासह घेणें वय किंवा लिंग याचे विचार न करता पेप्टिक अल्सरचे गांभीर्य कमी करण्यात प्रभावी आहे. तथापी, त्यावर काही आहारात्मक निर्बंधाची गरज आहे आणि डॉक्टरांच्या पर्यवेक्षणाखाली घेतली पाहिजे.
 • एंटीबॉयटिक म्हणून कार्य करते: अभ्यासांच्या शृंखलेतून पुष्टी झाली आहे की शतावरी वनस्पतीच्या पानांचे सार अनेक रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ प्रतिबंधित करू शकते आणि संक्रामक रोगांवरील उपचारासाठी नैसर्गिक एंटीबॉयटिक म्हणून तिच्यामध्ये काही क्षमता असते.
 • संधिवाताच्या लक्षणांमधून आराम मिळते: शतावरी संशोधन अभ्यासात कार्यक्षम दाहशामक वनस्पती म्हणून असल्याचे सुचवले जाते. नियमित घेतल्याने संधिवाताशी निगडीत सूज आणि वेदना कमी होऊ शकते. एंटीऑक्सिडेंट वनस्पती असल्याने, ती फ्री रॅडिकल हानी कमी करते, जे संधिवातात्मक दाहाच्या काही प्रमुख कारणांपैकी एक आहे.
 • अतिसारामधून आराम मिळते: आयुर्वेदिक वैद्य अतिसाराची लक्षणे कमी करण्यासाठी शतावरी विहित करतात. प्रयोगशाळेतील अभ्यास या पारंपरिक वापराची पुष्टी करतात, पण मानव आधारित अभ्यास शतावरीचे अतिसारविरोधी शक्तीची पुष्टी करण्यासाठी अजून पूर्ण झालेले नाहीत.
 • केसांसाठी चांगली: शतावरी एक नैसर्गिक जिवाणूरोधी आणि बुरशीरोधी पदार्थ आहे. ती डोक्याच्या कातडींचे बुरशीजन्य संक्रमण रोखण्यास मदत करते. दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट असून, ती सुनिश्चित करते की तुम्हाला एक्झेमा आणि सॉरिअसिससारख्या डोक्याच्या कातडीच्या समस्या होत नाहीत. तिच्यामुळे केसगळती आणि वेळेपूर्वी केस पांढरे होणें ही कमी होते.
 • रक्तशर्करा कमी करणें: प्राणि-आधारित अभ्यास सुचवतात की शतावरी तुमच्या शरिरातील इंसुलिनचे प्रमाण वाढवते, ज्याने अतिरिक्त रक्तशर्करा साफ होणें सुलभ होते.
 • प्रतिकार वाढवते: वैज्ञानिक अभ्यासांद्वारे सिद्ध झाले आहे की, शतावरी वापरल्याने प्रतिकार सशक्त होतो आणि तुमच्या प्रतिकारप्रणालीची क्षमता वाढवून रोगकारक पदार्थ स्वच्छ होतात. ती शस्त्रक्रियानंतरच्या संक्रमणांची संभाविता कमी करण्यासाठीही उपयोगी आहे.
 • डासांद्वारे वहन होणारे रोग टाळते: शतावरीच्या मुळाचे सार डासांची लार्वा, अंडी आणि वयस्करांसाठी विषारी असल्याचे दिसून आले आहे. असा अंदाज आहे की ती वनस्पती असल्याने, तिचा उद्भव डासांपासून झाला आहे आणि म्हणून ती या रोगाच्या संवाहकांविरुद्ध अनेक पद्धतींनी काम करू शकते आणि प्रतिकाराचा धोका उभा राहत नाही.
 • इम्युनोएड्जुव्हॅंट: शतावरी मुलाचे सार, लसाबरोबर ऍड्जुव्हॅंट (संप्रेरक) म्हणून दिल्याने केवळ लस दिल्यापेक्षा बेहतर प्रतिकार प्रतिसाद देते. याचे कारण म्हणजे शतावरी चे प्रतिकार संप्रेरक गुणधर्म, ज्याचे अंतर्निहित कारण प्रचुर सॅपॉनिन घटक आहे.
 • कर्करोग टाळते: इन व्हिट्रो (प्रयोगशाळा-आधारित) अभ्यास दर्शवतात की शतावरीचे मूळ आणि पानांच्या सारांमध्ये कर्करोगरोधी शक्ती आहे. असे आढळले आहे की, या रोपात उपस्थित असलेल्या सक्रिय यौगिक शतावरिन, कर्करोग कोशिकांची वाढ आणि पसार दाबून ठेवते. तथापी, या लाभाची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय परीक्षणांची अजूनही गरज आहे.

अल्सरसाठी शतावरी - Shatavari for ulcers in Marathi

तुम्हाला आम्लीयता आणि हार्टबर्नचा खूप त्रास आहे का? तुमची जीवनशैली खूप तणावपूर्ण आहे का आणि तुमच्या आहारामध्ये अधिकतम फास्ट फूड किंवा ऐरवी खूप मसालेदार पदार्थ सामील आहेत का? हे जाणून अधिक आश्चर्य वाटू नये, कारण वर दिल्यापैकी काहीही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. डॉक्टरांप्रमाणें, आपल्या पोटाचे खूप पातळ सुरक्षात्मक थर आहे, जे तुमच्या शरिरात निर्माण होणार्र्या पचनसंबंधी आम्लांच्या हानिकारक प्रभावांपासून आम्हाला वाचवते. हे आम्ल सामान्यपणें आपल्या पोटाला अन्न सहजपणें पचवण्याकरिता मदत करण्यासाठी आणि पोटातील जिवाणूंची वाढ कमी करण्यासाठी बनलेले असतात, ज्यामुळे ते निरोगी राहतत पण सामान्यपणें मसालेदार जेवण अधिक खाल्ल्याने किंवा जीवनशैली सवयींमुळे, पोटातील आम्ल अधिक गळती होणें असे होऊ शकते. पचनात्मक रसांच्या प्रभावापासून स्वतःला वाचवण्यास पोट आता सक्षम नसल्याने, तो स्वतः पोटाची आतील किनार जाळू लागतो आणि यामुळेचे पोटात अल्सर बनतात.  पेप्टिक अल्सर एक वैद्यकीय संज्ञा आहे ज्याचे अर्थ आहे आम्लांच्या अतीउत्पादनामुळे पोटात बनणारे एक प्रकारचे अल्सर. भारतात 30 रुग्णांच्य समूहामध्ये पेप्टीक अल्सरच्या लक्षणांपासून आराम देण्यात शतावरीच्या मुळाच्या कार्यक्षमतेचे परीक्षण केले गेले, जिथे 3 ग्रॅम शतावरी मुळाचे पूड सर्व प्रयुक्तांना 6 आठवडे देऊन त्यांचे आहार ही अनुशासित ठेवण्यात आले. 6 आठवड्यांनंतर असे आढळले की शतावरी मुळाच्या पुडाचे महिला व पुरुष दोघांमध्ये पेप्टिक अल्सरच्या प्रकरणांवर उपचार करण्यात उत्कृष्ट प्रभाव आहे. पण, यामध्ये खूप घटक सामील होते, उदा. आहार योजना आणि नियमित पर्यवेक्षण. म्हणून या वनस्पतीच्या फायद्यांचा सुरक्षितपणें व सर्वांगीणपणें आनंद घेण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टराचा सल्ला घेणें बेहतर असते.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long time capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

डासांद्वारे वहन केलेले आजार टाळण्यात शतावरीची क्षमता - Shatavari potential in preventing mosquito borne diseases in Marathi

डासांद्वारे वहन होणारे रोग रोगराई आणि मॄत्यूदराच्या भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सर्वांत सामान्य कारण आहे. अस्वच्छतामय परिस्थिती आणि माहितीचे अभाव आजार अनुपाताला वास्तविकपेक्षा अधिक गंभीर बनवण्यास प्रमुख घटक आहे. सुरक्षितता उपायांबद्दल जिज्ञासा आणि ज्ञान विकसित करण्यासाठी खूप कार्यक्रम आहेत, तरी आपण या किड्यांचे मोसमी प्रजनन पूर्णपणें थांबवू शकत नाही. सामान्यपणें वापरल्या जाणार्र्या अधिकतर रसायन आधारित पूर्वकाळजींचे एक किंवा अधिक सहप्रभाव असतात आणि आपण नवीन प्रतिरोधक प्रजातींच्या विकासाला नकारू शकत नाही, ज्यांवर सांप्रत वापरल्या जाणार्र्या रसायनांचे प्रभाव होते. म्हणून, प्रजनन आणि एवढ्या सहजरित्या रोग पसरण्यापासून डासांना मुक्त ठेवण्यासाठी काही कडक उपायांची गरज आहे. हल्लीच्या काही अभ्यास सुचवतात की शतावरीच्या मॅथनॉल मुळाचे सार किड्यांचा लार्वा, अंडी आणि वयस्कांना मारण्यासाठी उत्कृष्ट आहे. याचे अर्थ असे की आपण या रोपाच्या मुळाचे सार डेंगू, मलेरिआ आणि चिकनगुन्यासारखे आजार पर्यावरण पूरक पद्धतीने टाळण्यात वापरू शकतो. हे पुढे सुचवले गेले की ती वनस्पती असल्याने डासांसह निर्माण झालेली आहे, ती विविध पद्धतीत काम करते आणि मुळाच्या साराच्या कार्याविरुद्ध प्रतिरोध मिळणें कठिण आहे.

इम्युनोएड्जुव्हॅंट म्हणून शतावरी - Shatavari as immunoadjuvant in Marathi

इम्युनोएड्जुव्हॅंट ते पदार्थ असतात, जे लसाची कार्यक्षमता आणि कार्य सुधारण्यासाठी लस म्हणून दिले जाऊ शकते. इम्युनोएड्जुव्हॅंट म्हणून हॅपिटायटिस, डीपीटी लस इत्यादी रोगांच्या लसांविरुद्ध शतावरीच्या मुळाच्या साराचे कार्य अभ्यासण्यासाठी अनेक अभ्यास केले जात आहेत आणि सगळे सुचवतात की शतावरी एड्जुव्हॅंट म्हणून जोडल्याने याचे एड्जुव्हॅंट म्हणून निश्चित प्रभाव असते. पुढील अभ्यास सुचवतात की सॅपॉनिन ( शतावरीमध्ये उपस्थित नैसर्गिक रासायनिक यौगिक) वनस्पतीच्या या गुणधर्मासाठी जवाबदार असतात. पुढे हा दावा केला गेला की ही वनस्पती शरिराचे कोशिका आधारित प्रतिकार संप्रेरित करून शरिरामध्ये कार्य करते (टी कोशिका सक्रियीकरण) , जे शेवटी मानवी शरिरामध्ये पांढर्र्या रक्तकोशिका आणि प्रतिजैविके सक्रिय करण्यासाठी जवाबदार आहे. याप्रकारे शतावरीच्या मुळाचे अधिकतम लसांसह एड्जुव्हॅंट म्हणून संभाव्य उपचारात्मक वापर आहेत. 

प्रतिकार सुधारण्यासाठी शतावरी - Shatavari for improving immunity in Marathi

इम्युनोमॉड्युलेटर ती औषधे, वनस्पती किंवा यौगिक असतात, जे शरिराच्या प्रतिकारप्रणालीला संप्रेरित करतात आणि संक्रमणाशी झगडण्यात मद्त करतात. विज्ञानाच्या प्रगतीमुळे, बाजारात अनेक एंटीबॉयटिक व्यावसायिकरीत्या उपलब्ध आहेत. अनेक असाध्य आजार आज योग्य उपचार व शस्त्रक्रियेमुळे साध्य झाले आहेत, जर ते आत्यंतिक झाले तर. पण दुय्यम संक्रमणांच्या मॄत्यूदरांना नाकारले जाऊ शकते नाही. दुय्यम संक्रमण म्हणजे ते संक्रमण असतात, जे अधिक मात्रेमध्ये औषधे नियमितपणें वापरल्याने प्राप्त होतात आणि व्यक्तीचे प्रतिकार कमी होते. परिणामी, वैद्यकीय उपचाराची गरज असते आणि हे एक कुचक्र होऊन बसते. मग पर्याय काय आहे? शरिराचे नैसर्गिक आढळणार्र्या पदार्थांसह अधिक सर्वांगीण उपचार, जे तुम्हाला न केवळ दुय्यम संक्रमणातून बरे करण्यास मदत करतात, तर तुमच्या प्रतिकार प्रणालीला पुढील समस्याच्या शक्यता कमी करण्यातही मदत करतत. अभ्यास दाखवतात की शतावरी कॅंडिडा आणि स्टॅफिलोकॉकससारख्या दुय्यम संक्रमनांविरुद्ध उत्कृष्ट पदार्थ आहे. असे सुचवले गेले की शतावरी मौखिकरीत्या दिल्याने प्रतिकारप्रणालीला संप्रेरणा मिळून संक्रमण अधिक प्रभावीपणें नष्ट केले जाते.

 (अधिक पहा: प्रतिकार कसे सुधारावे)

शक्तिशाली कर्करोगरोधी पदार्थ म्हणून शतावरी - Shatavari as a potent anti-cancer agent in Marathi

अभ्यास दाखवतात की शतावरी मुळ आणि पानांचे सारामध्ये शक्तिशाली कर्करोगरोधी गतिविधी होतात. शास्त्रज्ञांचा दावा आहे की शतावरी मूळ आणि पानांच्या सारामध्ये आढळणारे शतावरिन, एक रासायनिक यौगिकामध्ये कर्करोग कोशिकांना नष्ट करण्याची क्षमता असते. तथापी, मानवी अभ्यास अजून करायचे शिल्लक् आहेत आणि म्हणून कर्करोगरोधी एजेंट म्हणून शतावरीच्या संभाव्य फायद्यांसाठी आयुर्वेदिक वैद्याशी बोलणें बरे असते.

 (अधिक पहा: कर्करोगावरील उपचार)

मधुमेहामध्ये शतावरीचे फायदे - Shatavari benefits in diabetes in Marathi

शतावरीचे मूळ एक उत्कृष्ट मधुमेहरोधी पदार्थ आहे, जी तुमच्या शरिरातील इंसुलिमचे प्रमाण वाढवून शरिरातील रक्तशर्करेचे स्तर कमी करण्यात साहाय्य करते. प्राण्यांवर झालेले अभ्यास मधुमेहरोधी उपचारामध्ये या वनस्पतीच्या क्षमतेचे समर्थन करतात, पण मानवी मॉडेलचा अभाव असल्यामुळे, मधुमेहग्रस्त लोकांना कोणत्याही रूपात शतावरी घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

केस आणि डोक्याच्या कातडीसाठी शतावरीचे फायदे - Shatavari benefits for hair and scalp in Marathi

तुम्हाला डॅंड्रफचा त्रास आहे का? डोक्याच्या कातडीच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कधीही एकटे वाटत नाही का? हे त्वचा आधारित संक्रमणाचे चिन्ह असू शकते. हल्लीचे अभ्यास दाखवतात की शतावरीचे एथनॉलिक सार सामान्य डोक्याच्या कातडीतील बुरशीविरुद्ध खूप उत्कृष्ट एंटीबॉयटिक आहे आणि डॅंड्रफ व सॅबोरिक डॅर्माटायटिस (एक्झेमा आणि सॉरिअसिसला खूप समान डोक्याच्या कातडीची समस्या ज्यामध्ये चट्टे आणि खाज होते) सारख्या डोक्याच्या कातडीच्या समस्यांवरील उपचारासाठी खूप उपयोगी असते. आयुर्वेदामध्ये, शतावरीला खूप वेळ दाहशामक म्हणून ओळखले जाते, ज्याचे अर्थ असे की तुम्हाला चट्टे आणि खाजपासून आराम मिळण्यास मदत होते, जी डोक्याच्या कातडींची समस्या किंवा डॅंड्रफबरोबर सहयोगी असू शकते. पण डोक्याच्या कातडींची ही समस्यांवर उपचार करण्यात शतावरीची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी मानवी अभ्यास झालेले नाहीत. म्हणून, तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी शतावरी वापरण्यापूर्वी तुमच्या आयुर्वेदिक वैद्याशी बोलण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

डाययुरेटिक म्हणून शतावरी - Shatavari as a diuretic in Marathi

डाययुरेटिक वनस्पती किंवा यौगिक आहेत, ज्याच्या परिणामी शरिरातून अधिक पाणी उत्सर्ग झाल्याने होते आणि शतावरी तुम्ही नैसर्गिक डिटॉक्सिफाइंग पदार्थ शोधत असल्यास विशेष उपयोगी आहे. ती शरिरातून अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकून शरिराचे कार्य सुधारते. तसेच, शरिरातून अतिरिक्त लवण आणि पाणी काढून टाकल्याने मूत्रपिंडही साफ होतात. प्राणिआधारित अभ्यास दाखवतात की शतावरी मुळांचे सार तोंडावाटे घेतल्याने मूत्रपिंडाचे खडे तुटतात.

अतिसारावर उपचार म्हणून शतावरी - Shatavari for treating diarrhea in Marathi

आयुर्वेदिक वैद्य अतिसाराच्या उपचारामध्ये शतावरीचे वापर करत आहेत, पण जिज्ञासेमुळे शास्त्रज्ञांनी सर्वांत सामान्यतम आरोग्य समस्यांच्या उपचारामध्ये या वनस्पतीची कार्यक्षमतेचे परीक्षण केले आणि कमीत कमी प्रयोगशाळा अभ्यासांमध्ये आयुर्वेदिक दावे योग्य असल्याचे आढळून आले आहे. अतिसार आणि डायसेंट्रीच्या उपचारामध्ये या वनस्पतीची मात्रा आणि कार्याचे परीक्षण अजूनही व्हायचे आहेत.

दाहशामक म्हणून संधिवातासाठी शतावरी - Shatavari for arthritis as an anti-inflammatory in Marathi

आधुनिक जीवनाच्या दैनंदिन तणावाकरिता रोग आणि आरोग्याचे मुद्दे पर्याप्त नव्हते आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या आहारात वापरामुळे माणसांसाठी जीवनाची गुणवत्ता खूप निकृष्ट बनली आहे. संधिवात हल्ली अनेक उद्भवशील हाडसंबंधी समस्यांपैकी एक आहे, जी तरुण पिढीलाही प्रभावित करत आहे. बाजारात उपलब्ध असलेली अधिकतम व्यावसायिक औषधे रसायन आधारित आहे आणि त्यांचे खूप सहप्रभाव असतात. फ्री रॅडिकल क्षती आणि ऑक्सिडेटिव्ह क्षती या समस्येच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. शतावरी एक एंटीऑक्सिडेंट म्हणून शरिरातील फ्री रॅडिकल्सना कमी करण्यास मदत करतात आणि विशेषकर तरुण लोकांमध्ये संधिवातासारख्या रोगांच्या शक्यता कमी होतात. तसेच, अभ्यास शतावरीला एक उत्कृष्ट दाहशामक म्हणून सुचवतात, जेणेकरून ती सांध्यांतील सूज आणि वेदनेला हाताळण्यात मदत करते.

एंटीबॉयटिक म्हणून शतावरीचे फायदे - Shatavari benefits as an antibiotic in Marathi

शतावरीच्या सूक्ष्मजीवरोधी गुणधर्मांच्या परीक्षणासाठी अनेक संशोधन झाले आहे आणि जवळपास प्रत्येक संशोधनाचा दावा आहे की या वनस्पतीच्या मूळ आणि पानांचे सार विविध सूक्ष्म जीव उदा. ई. कोली, बॅसिलस सब्टिलस, स्टॅफिलोकॉकस, साल्मोनेला आणि स्युडोमॅनॅस आणि कॅंडिडासारख्या बुरशींविरोधात खूप प्रभावी आहे. म्हणून, हे सांगण्यात धोका नाही की शतावरीचे मूळ अधिकतम जिवाणूरोधी आणि बुरशीजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि, आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये नैसर्गिकरीत्या होणार्र्या विविध एंटीबॉयटिक म्हणून खूप संभावना आहेत.

शतावरी एंटीऑक्सेडेंट - Shatavari antioxidant in Marathi

एंटिऑक्सिडेंट फ्री रॅडिकलच्या क्षतीविरुद्ध शरिराची नैसर्गिक संरक्षणयंत्रणा आहे. तुम्हाला असे वाटत असल्यास की फ्री रॅडिकल्स काय आहेत, ते शरिराच्या दैनंदिन कार्यासाठी शरिरामध्ये बनलेले रेणू असतात, पण शेवटी, शरिराच्या स्वतःच्या कोशिकांना नष्ट करण्यासाठी शरिराकरिता संभाव्य विषारी पदार्थ बनतात. मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल्स जमा झाल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो, जे अशक्त झालेल्या शरीरकार्य आणि वेळेपूर्वी वयवाढीसाठी प्रमुख कारणांपैकी एक आहे. अभ्यासांचा दावा आहे की शतावरीचे कमीत कमी तीन खूप शक्तिशाली एंटीऑक्सिडेंट यौगिक असतात (रॅसमॉफ्युरन, अस्पॅरॅजामिन, रेसमॉस्युल) , जे तुमच्या प्रणालीमधील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात. म्हणून तुमच्या आहारात शतावरी घेतल्याने खूप अंशामध्ये चयापचय हानीला सामोरे जाण्यात आणि तुमच्या शरिराला खूप वेळ निरोगी ठेवण्यात मदत होते.

 (अधिक पहा: एंटीऑक्सिडेंट प्रचुर खाद्यपदार्थ)

शतावरी तणाव कमी करण्यात मदत करते - Shatavari helps in reducing stress in Marathi

आयुर्वेदामध्ये, शतावरी वरच्या दर्जाच्या एडॅप्टोजेन म्हणून ओळखले जाते, ज्याचे अर्थ आहे की त्यामध्ये संभाव्य तणावरोधी गतिविधी आहेत. हल्लीचे अभ्यास सुचवतात की ही वनस्पती घेतल्याने मेंदूतील विशिष्ट मार्गिकेवर प्रभाव होते, जी शरिरातील तणाव हार्मोन्सचे प्रमाण करते आणि तणावरोधी मन प्राप्त होते. पण अशा अभ्यासांचे यशस्वी प्राण्यांच्या मॉडलवर परीक्षण सुरू आहे आणि अद्याप माणसांवर त्याच्या कार्यक्षमतेला सिद्ध करण्यासाठी कोणतेही मानवी परीक्षण झालेले नाही. म्हणून, शतावरीला तणावासाठीचा औषध म्हणून घेण्यापूर्वी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेणें उचित असते.

संगोपक मातांसाठी शतावरीचे फायदे - Shatavari benefits for nursing mothers in Marathi

आयुर्वेदामध्ये, शतावरीला दुग्धवर्धक असे म्हटले आहे, जिचा अर्थ असा की ती संगोपक मातांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत करते आणि आयुर्वेदिक वैद्य महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी ही वनस्पती घेण्याचा सल्ला देतात. आधुनिक वैद्यकीय विज्ञान औषधामध्येही नैसर्गिक वनस्पतींच्या वापराकडे वेगाने वळत आहे. या अनुषंगाने, दुग्धवर्धक म्हणून शतावरीच्या मुळांच्या प्रभावाचे परीक्षण करण्यासाठी या शॄंखलेत एक संशोधन केले गेले आणि असे आढळून आले की तोंडाद्वारे ही वनस्पती घेतल्याने स्तनधारी प्राण्यांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे नक्कीच प्रभावी होऊ शकते. तथापी, मानवी परीक्षण मानवांवरील वास्तविक कार्य सिद्ध करण्यासाठी उपलब्ध नव्हे, म्हणून संगोपक महिलांसाठी या वनस्पतीच्या लाभांबद्दल अजून घेण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याशी बोललेले बरे.

पुरुषांसाठी शतावरीचे फायदे - Shatavari benefits for men in Marathi

शतावरी महिलांसाठी सर्वात प्रसिद्ध वनस्पतींपैकी एक आहे, पण तिची कार्यक्षमता केवळ एका लिंगापर्यंत थांबत नाही. अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की शतावरीचे जल-अल्कोहलीय आणि जलमय सार एफ्रोडिझिअक म्हणून खूप प्रभावी आहे. एफ्रोडिझिअक एक यौगिक किंवा वनस्पती (आयुर्वेदामध्ये) असते, जी माणसांमधील लैंगिक प्रदर्शन आणि कामेच्छा सुधारण्यासाठी वापरली जाते. तथापी, कोणत्याही मानवी अभ्यासाच्या अभावामध्ये, पुरुषांसाठी मानवी कामवर्धक म्हणून शतावरीच्या कार्यक्षमतेबद्दल कसलाच दावा केला जाऊ शकत नाही.

पीसीओएससाठी शतावरी - Shatavari for PCOS in Marathi

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम महिला अंडाशयामध्ये वळू बनण्याचे कारण आहे. या समस्येमागे मासिक धर्मामधील अनियमितता, प्रजननक्षमता कमी होणें, पाठदुखी आणि गर्भधारणा किंवा शिशुजन्मात कठिनतेसारखी लक्षणे निर्माण होतील. असंतुलित महिला हार्मोंसमुळे अनियंत्रित केसगळती, पुरळ आणि इतर त्वचा परिस्थिती आणि मज्जातंत्रीय समस्या उदा. निराशा आणि अवसद होऊ शकतात. या समस्येवर कुठलेही ज्ञात उपचार नाही, पण वैद्यकशास्त्र या टप्प्यानेटप्प्याने वाढत असलेल्या महिला समस्येकरिता एस्पॅरॅगस रॅसेमोसच्या वापराबद्दल विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय वनस्पतिजन्य औषध पत्रिकेत प्रकाशित हल्लीच्या लेखामध्ये शतावरीच्या मुळाचे एस्ट्रोजन (महिला हार्मोन) सारखे प्रभाव आणि या रोगावर भविष्यकालीन उपचारांमध्ये त्याच्या संभावनांची चर्चा झाली आहे. हेच लेख पुढे सुचवते की शतावरी महिला अंडाशयात ऊसाइट्सच्या योग्य विकासामध्ये मदत करून अशी करते. तथापी, तुमच्या शरिराच्या प्रकाराप्रमाणें योग्य मात्रेबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणें नेहमीच उचित राहील.

महिलांसाठी शतावरीचे फायदे - Shatavari benefits for women in Marathi

बाकी काहीही नसले, तरी शतावरी महिला आरोग्यासाठी एक वरदान आहे. त्याने ने केवळ कामेच्छा वाढते, तर गर्भाशयाच्या एकूण आरोग्यामध्ये सुधारणा होते, महिला लैंगिक हार्मोंसचे संतुलन होण्यात शरिराला मदत मिळते आणि महिलांची प्रजननक्षमता सुधारते. हल्लीच्या वैद्यकीय अभ्यासांचा दावा आहे की शतावरीचे हे सर्व लाभ या वनस्पतीच्या गुणधर्माबरोबर सत्य असल्याने महिला प्रजनन कोशिकांची (ऊसाइट्स) गुणवत्ता सुधारते. हेच नाही, महिलांमधील अजून संतुलित हार्मोन प्रणालीमुळे परिणामी कमी क्रॅंप्स आणि अधिक वेदनामुक्त मासिक धर्म संभवू शकतो.

शतावरी एक बारमाही वनस्पती (अनेक वर्षे जगते) आहे, जी त्याच्या लाकडी देठाच्या मदतीने जवळपास 1-2 मी. उंची प्राप्त करते. तिची पाने पातळ आणि सूईसारख्या असतात आणि तिला लहान काट्यांसह पांढरी फुले लागतात. शतावरीच्या रोपाचे मूळ ट्युबर असलेले असते आणि ते तिच्या सर्व औषधीय फायद्यांचे स्त्रोत आहे. प्राचीन ग्रंथ ताजेतवाणी स्वरूपात शतावरी घेण्याचा सल्ला देत असले, तरी तिला सामान्यपणें पूडच्या रूपात घेतले जाते, जे आंशिकपणें मुळाच्या कडू चवीमुळे किंवा केवळ सोयीच्या कारणामुळे. शतावरी कॅप्स्युल, टॅवलेट आणि ग्रॅन्युल म्हणूनही ते व्यावसायिकरीत्या उपलब्ध आहे. शतावरीला दैनंदिन आहारात सामील करण्यापूर्वी एक ख्यातनाम आयुर्वेदिक वैद्याकडून मात्रा आणि वारंवारतेची पुष्टी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

हल्लीच, एस्पॅरॅगस रॅसेमोसचा खाद्य बायोफिल्म्सच्या उत्पादनामध्ये वापराचा दावा केला जातो, जे व्यावसायिक मांस उत्पादने गुंडाळतांना वापरले जाऊ शकते. हे फिल्म न केवळ खाद्य उत्पादनाला खूप अवधीसाठी ताजे ठेवतात, तर त्यामध्ये सामान्य पॉलिफिल्मचे काही सहप्रभावही नसतात. याचे कारण आहे शतावरीचे एंटीऑक्सिडेंट आणि जिवाणूरोधी गुणधर्म. संशोधक या नैसर्गिक उत्पादनामध्ये खूप संभावना पाहत आहेत, ज्यामागे पर्यावरण पूरक बायोफिल्म्स आणि बाजारातील खाद्य उत्पादनांच्या अधिक वेळ साठवणूक अवधीचा विचार केला जातो.

आयुर्वेदिक वैद्य सुचवतात की एक चहाचा चमचाभर शतावरी पूड चहा म्हणून दिवसांतून दोनदा घेतल जाऊ शकतो.

प्रजननक्षमता समस्यांसाठी, गर्भ धारण करण्यास निश्चय करण्यापूर्वी काही महिने नियमितपणें शतावरी घेतलेले बरे असते. याने न केवळ तुमची प्रजननक्षमता वाढेल, तर तुमच्या अंडाशयाची परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही गर्भ धारण करण्यासाठी अधिक योग्य व्हाल. महिलांमधील प्रजननक्षमता आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यांनी दररोज दोनदा 2 चहाचा चमचा शतावरी पूड घेऊन घेण्यासाठी सल्ला दिलेला आहे.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj hair oil
₹425  ₹850  50% OFF
BUY NOW

गरोदरपणात शतावरी वापरणें असुरक्षित आहे, कारण त्याच्यामुळे प्रयोगशाळा अभ्यासांमध्ये गर्भपात आणि जन्मजात दोष होण्याचे दिसून आले आहे आणि माणसांमधील या प्रभावाचे विरोध करण्यासाठी कोणतेही मानवी संशोधन झालेले नाही. म्हणून,  गरोदर महिलांनी शतावरी कोणत्याही स्वरूपात घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नेहमी घेतला पाहिजे.

शतावरीच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांची नकोशी असलेल्या लोकांना शतावरीचीही नकोशी असू शकते .

या वनस्पतीच्या औषधीय व्यवहारांबद्दल बरेच काही माहीत नही, म्हणून तुम्हाला आधीच औषधे विहित केलेली असल्यास आणि आहारात हे वनस्पती जोडल्यास तुम्ही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेतला पाहिजे.


Medicines / Products that contain Shatavari

संदर्भ

 1. Shashi Alok et al. Plant profile, phytochemistry and pharmacology of Asparagus racemosus (Shatavari): A review. Asian Pac J Trop Dis. 2013 Jun; 3(3): 242–251.
 2. Noor S1, Bhat ZF2, Kumar S1, Mudiyanselage RJ. Preservative effect of Asparagus racemosus: A novel additive for bioactive edible films for improved lipid oxidative stability and storage quality of meat products. Meat Sci. 2018 May;139:207-212. PMID: 29459296
 3. Wiboonpun N1, Phuwapraisirisan P, Tip-pyang S. Identification of antioxidant compound from Asparagus racemosus. Phytother Res. 2004 Sep;18(9):771-3. PMID: 15478181
 4. Krishnamurthy S1, Garabadu D, Reddy NR. Asparagus racemosus modulates the hypothalamic-pituitary-adrenal axis and brain monoaminergic systems in rats.. Nutr Neurosci. 2013 Nov;16(6):255-61. PMID: 23485433
 5. Govindarajan M1, Sivakumar R. Ovicidal, larvicidal and adulticidal properties of Asparagus racemosus (Willd.) (Family: Asparagaceae) root extracts against filariasis (Culex quinquefasciatus), dengue (Aedes aegypti) and malaria (Anopheles stephensi) vector mosquitoes (Diptera: Culicida. Parasitol Res. 2014 Apr;113(4):1435-49. PMID: 24488078
 6. Onlom C1,2, Khanthawong S3, Waranuch N2, Ingkaninan K. In vitro anti-Malassezia activity and potential use in anti-dandruff formulation of Asparagus racemosus.. Int J Cosmet Sci. 2014 Feb;36(1):74-8. PMID: 24117781
 7. Pandey AK et al. Impact of stress on female reproductive health disorders: Possible beneficial effects of shatavari (Asparagus racemosus).. Biomed Pharmacother. 2018 Jul;103:46-49. PMID: 29635127
 8. S. A. Dayani Siriwardene et al. Clinical efficacy of Ayurveda treatment regimen on Subfertility with Poly Cystic Ovarian Syndrome (PCOS). Ayu. 2010 Jan-Mar; 31(1): 24–27. PMID: 22131680
 9. Pandey SK, Sahay A, Pandey RS, Tripathi YB. Effect of Asparagus racemosus rhizome (Shatavari) on mammary gland and genital organs of pregnant rat.. Phytother Res. 2005 Aug;19(8):721-4. PMID: 16177978
 10. Bhatnagar M1, Sisodia SS. Antisecretory and antiulcer activity of Asparagus racemosus Willd. against indomethacin plus phyloric ligation-induced gastric ulcer in rats.. J Herb Pharmacother. 2006;6(1):13-20. PMID: 17135157
 11. Kaur P et al. Immunopotentiating significance of conventionally used plant adaptogens as modulators in biochemical and molecular signalling pathways in cell mediated processes.. Biomed Pharmacother. 2017 Nov;95:1815-1829. PMID: 28968926
 12. Gautam M et al. Immunomodulatory activity of Asparagus racemosus on systemic Th1/Th2 immunity: implications for immunoadjuvant potential. J Ethnopharmacol. 2009 Jan 21;121(2):241-7. PMID: 19038322
 13. Tiwari N et al. Adjuvant effect of Asparagus racemosus Willd. derived saponins in antibody production, allergic response and pro-inflammatory cytokine modulation.. Biomed Pharmacother. 2017 Feb;86:555-561. PMID: 28024292
Read on app