ग्रीन टी

पूर्वी जनतेला माहीत नसलेली ग्रीन टी आज लाखो लोकांसाठी आवश्यक सकाळच्या सवयींपैकी एक बनली आहे. ज्या सटीकतेने ती आमच्या जीवनात बसते, त्याने सौंदर्यमूल्यापेक्षा आरोग्यास वाव देणारे पेय म्हणून तिला स्थान दिले आहे. मी तुम्हाला आव्हान देऊ शकतो की, मला त्याच्या फायद्यांची माहिती असून ही मी ते का घेत नाही, अशी भावना तुमच्यात नक्कीच असेल. तुम्हाला जरी तिची चव आवडत नसली, तरी तुम्ही नकार देऊ शकत नाही, की हा चहा, जवळपास प्रत्येक घरात या पेयाला जागा मिळालेली आहे.

तुम्हाला माहीत होते का?

या चहाचे मूळ प्राचीन चीनमध्ये सहस्त्रो वर्षे जुने आहे. पौराणिक सम्राट शेन्नोंग यांनी  “अपघाताने” आणि घटनांच्या एका रुचिकर शृंखलेमध्ये त्याचे शोध लावलेले असल्याचे सांगितले जाते. अजून रोचक बाब म्हणजे, शेन्नोंगला "चीनी औषधाचा जनक" ही मानले जाते. मग, हा वास्तविक अपघात होता की योग्यप्रकारे विचार केलेला सूत्र? याचे उत्तर शोधण्यासाठी कुठेतरी चहाप्रेमींना इतिहास खंगाळावा लागणार आहे. चीनमधून, चहा संस्कृती जपानमध्ये पसरली आणि लगेच ती संपूर्ण विश्वाचा फेरा मारण्यासाठी निघाली. भारतामध्ये, चहाचा वास्तविक इतिहास तेवढा स्पष्ट नाही. माहिती असल्यापासून, जंगली चहा (ग्रीन टी) ब्रिटिश ईस्ट इंडिआ कंपनीद्वारे व्यवसायीकरण झाल्यापूर्वी भारतात घेतले जात होते.

  1. ग्रीन टीचे प्रकार आणि वापर - Green tea types and use in Marathi
  2. ग्रीन टी कशी बनवावी - How to make green tea in Marathi
  3. ग्रीन टीचे फायदे - Benefits of green tea in Marathi
  4. ग्रीन टीचे सहप्रभाव - Green Tea Side Effects in Marathi
  5. आपण एका दिवसात किती कप ग्रीन टी घेऊ शकता? - How many cups of green tea can be taken per day in Marathi?
ग्रीन टीचे फायदे, सहप्रभाव आणि वापर चे डॉक्टर

आम्हा सर्वांना ग्रीन टीबद्दल हे प्रश्न असेल की आपल्याला हा चहा कुठून मिळतो? ग्रीन टी काय आहे? इतर चहा ग्रीन टीपेक्षा वेगळा कसा असतो? तो तुमच्या नियमित चहापेक्षा बेहत्तर असतो का? जर बरोबर आहे, तर कसे? चला एक एक करून तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सर्व प्रकारचा चहा कॅमिलिआ सिनेसिस किंवा सामान्यरीत्या “टी प्लांट” नांवाच्या वनस्पतीपासून बनवला जातो. हे अंतर कच्चे चहाची पाने झालेलय ऑक्सिडेशनच्या स्तरापासून उमटतो. आदर्श काळा चहा ऑक्सिडाइझ्ड असतो आणि ग्रीन टी अनऑक्सिडाइझ्ड असते. प्रसिद्ध ओलोंग चहा आंशिकरीत्या ऑक्सिडाइझ्ड असतो, तर चहाच्या काही प्रजाती फर्मेंट असतात, पण नेहमी ऑक्सिडाइझ्ड (प्युअर टी) असते.

आता, ऑक्सिडेशन ही जीवशास्त्रीय संज्ञा चहाला समजून घेण्यास आड येत आहे का? चला समजून घेऊ. ऑक्सिडेशन म्हणजे खाद्यपदार्थाद्वारे प्राणवायूचे अवशोषण आहे, ज्याद्वारे खाद्यपदार्थाची, या प्रसंगात कच्च्या चहाच्या पानांचे जैवरसायनशास्त्र बदलते। कापून सोडल्यानंतर सफरचंद तपकिरी का पडतात, याकडे कधी लक्ष दिले आहे का? तरीही, चहा बनवण्याच्या बाबतीत, ऑक्सिडेशन आंशिकपणें नैसर्गिक होतो आणि आंशिकपणें खोल्यांचे तापमान आणि आर्द्रता यांचे पर्यवेक्षण करून नियंत्रित स्थितींमध्ये केले जाते. एकदा ही पाने एका ठराविक ऑक्सिडेशन पातळीपर्यंत पोचली की, ही प्रक्रिया विशिष्ट तापन कार्यपद्धतीद्वारे बंद केली जाते. तरीही, ऑक्सिडेशन एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि पूर्णपणें ती थांबवता येत नाही, पण तिची गती कमी करून चहाचा साठवणूक अवधी वाढवता येऊ शकतो.

तुमचा नियमित चहा सामान्यपणें काळा चहा असतो, ज्यामध्ये दूध आणि साखर टाकलेले असतात. असे काही लोक आहेत, ज्यांचा दावा आहे की दूध आणि साखर टाकल्याने तुमच्या आरोग्याल काही नुकसान पोचत नाही, पण त्यापलीकडे विपरीत दावासुद्धा विद्यमान आहे. म्हणून, शास्त्रीय पुराव्यांच्या अभावी, आम्ही पोषणतज्ञाला तपासू शकतो की तुमच्या शरिराच्या प्रकाराशी अधिक साजेसे काय असेल.

वनस्पती चहा चहाच्या रोपाऐवजी हिबिस्कस, जॅस्मिन, कॅमोमाइलसारख्या वनस्पतींनी तयार केल्या जातात. म्हणून, त्यांना ग्रीन टी म्हणता येत नाही. तथापी, बाजारात अनेक ग्रीन टी फ्लेवर उपलब्ध आहेत उदा. मिंट ग्रीन टी, जॅस्मिन ग्रीन टी, लेमन ग्रीन टी इ. म्हणून उत्पादनाच्या प्रामाणिकतेसाठी लेबल चेक करणें नेहमीच चांगले असेल.

सुटी ग्रीन टी अनेक चहाच्या ब्रॅंड्ससोबत व्यावसायिकरीत्या उपलब्ध आहे. तथापी, तुम्ही चहावर जिवापाड प्रेम करणारे असल्यास आणि विशिष्ट प्रकारचा चहा शोधत असल्यास, तुम्ही सहजरीत्या ते टी बॅग्स, ग्रीन टी पाऊडर, कॅप्स्युल आणि टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

कॅफीनरहित ग्रीन टी एक प्रकारचा ग्रीन टी आहे, ज्यावर उपचार करून त्याचा कॅफीन काढण्यात येतो. कॅफीन सहन न होणार्र्या लोकांसाठी ते बेहत्तर पर्याय समजले जात असले, तरी ते चहामधील एंटीऑक्सिडेंट्सची संख्या कमी करते. पण, डिकॅफ ग्रीन टी आणि सामान्य ग्रीनटीमधील अंतर शोधून काढण्यासाठी कोणतेही अभ्यास झालेले नाहीत.

ग्रीन टीचे प्रकार

चहाच्या जगामध्ये पाय ठेवत असतांना, आपल्याला जाणीव होते की ते खूप मोठे आहे. जपान चहाच्या कमीत कमी 10 प्रसिद्ध प्रजाती पिकवतो. आपण चहाच्या प्रजातींची सूची करायला घेतली, तर बहुतेक एक नवीन लेख लिहावा लागेल आणि कुणास ठाऊक त्यापेक्षा मोठेही असू शकते. तरी माहितीपुरते, आपण बाजारात उपलब्ध ग्रीन टीच्या काही ज्ञात प्रजातींना पाहू या.

  • सेंचा ग्रीन टी:
    सेंचा जापानी ग्रीन टीचे सर्वांत सामान्य प्रकार आहे आणि ते तयार करण्यास अतिशय सोपे आहे. कच्ची पाने ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी स्टीम, रोल आणि सुकवले जातात आणि त्यांना पारंपरिक आकार दिला जातो. या पानांना कपभर पाण्यामध्ये उकळून वापरले जाते.

  • ग्योकुरो ग्रीन टी:
    चहाची ही प्रजाती प्रक्रियेमध्ये सेंचा चहापेक्षा वेगळी आहे. या रोपांना पिकवण्यापूर्वी कमीत कमी 20 दिवस अगोदर कपड्याने झाकले जाते. याने पानांमधील कॅचिनची संख्या कमी केली जाते, ज्याने चहा अजून सुगंधमय होतो. काबुसेचा चहाची अजून एक प्रजाती आहे, जी त्याच पद्धतीने पिकवली जाते, पण चहाच्या रोपाला केवळ एक आठवडा झाकून ठेवले जाते.

  • माचा ग्रीन टी:
    माचा ग्रीन टी ग्रीन टीचे अजून एक दळलेले ( पूड केलेले) प्रकार आहे, ज्याला तेंचा म्हणतात. तेंचा ग्योकुरोसारखेच शेडमध्ये पिकवले जाते, पण झाकण्याचा अवधी 20 दिवसांपेक्षा खूप जास्त असतो आणि याची पानेन गुंडाळता सुकवली जातात. तेंचा चहा, वापरास पाठवण्याच्या थोडे अगोदर दळले जाते.

  • चाइनीझ गनपाउडर टी:
    चाइनीझ ग्रीन टीचे नाव त्याच्या अपूर्व आकारामुळे मिळालेले आहे. त्याची पाने प्रक्रिया केल्यानंतर आणि स्टीम केल्यानंतर गुंडाळली आणि सुकवली जातात. त्याचे अपूर्व धूर असलेले रंग आहे, जे त्याच्या नावासारखेच आहे.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

अचूकपणें कपभर चहा ब्रू करणें:

चहाप्रेमींची आपला आवडता चहा ब्रू करण्याच्या आपल्या विशिष्ट पद्धती असतात, पण एक कपभर गरम ग्रीन टी बनवण्याची सामान्य पद्धत याप्रमाणें आहे:

  1. पॅन/टीपॉटमध्ये 2-3ग्रॅम चहाची पाने टाका.
  2. पॅनमध्ये उकळत्या पाण्याचे आवश्यक प्रमाण टाका (चहा आणि तुमच्या वांछित फ्लेवरवर अवलंबून असलेले 20-100 मि. ली. ) .
  3. ते एक ते दोन मिनिटे भिजू द्या. (काही लोकांना चवीप्रमाणें अधिक वेळ भिजून ठेवलेला चहा आवडतो)
  4. छाननी करा आणि गरमगरम वाढा.

तुम्हाला खूप आळस येत असल्यास, एक कपभर टी बॅग वापरून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता आणि शांतपणें तुमचा चहा घेऊ शकता.

वापरलेले ग्रीन टी बॅग्स स्थानिकरीत्या लावून फुगलेल्या डोळ्यांवर उपचार करता येतो.

माचा ग्रीन टी फेस मास्क वापरण्यात सर्वांत प्रसिद्धपणें वापरले जाते. चहाचा1 चमचा ग्रीन टी पाऊडर ½ चहाचा चमचा मधाबरोबर मिसळून ताजेतवाणे करणारे फेस मास्क बनवता येते.

ग्रीन टीची सवय करून घेण्यापूर्वी आपल्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे: ग्रीन टी निरोगी आहे का? का केवळ तरुण वयोगटाला झालेली एखादी भ्रांती आहे? बरं, चांगली बातमी ही की चवीत थोडे कडवट असल्याशिवाय इतर विभिन्न फ्लेवरमध्येही ग्रीन टी उपलब्ध आहे. वास्तविक पाहता, ग्रीन टीचे अधिकतर गुण चहाच्या पानांमध्ये उपस्थित विशेष जैविक यौगिकांना दिले जाऊ शकतात, ज्यांना कॅटेचिन म्हणतात आणि ते पाण्यात विरघळून ब्रू तयार करतात. चला, गरम ग्रीन टीच्या कपाचा आस्वाद घेतांना काही फायदे आपण जाणून घेऊ.

  • मेंदूचे आरोग्य सुधारते: अभ्यासाच्या शॄंखलेमध्ये, ग्रीन टी कॅटेचिन मुळे मेंदूच्या कोशिकांना संप्रेरणा मिळाल्याचे दिसून आले आहे, ज्याने स्मरणशक्ती आणि संज्ञान सुधारतात. अल्झायमर्ससारख्या न्युरोडिजनरेटिव्ह  रोगांन दूर ठेवण्यातही ते लाभदायक आहे.
  • कार्डिओव्हॅस्कुलर प्रणालीसाठी चांगले: ग्रीन टी चयापचय सुधारते आणि आर्टरीमधील प्लाक होणें टाळते, जे हृदयगतीचा झटका आणि स्ट्रोक यांसाठी प्रमुख धोक्याच्या घटकांपैकी एक आहे. ते तुमच्या हृदयाच्या मांसपेशींना बळकट करतात, ज्यामुळे हृदयाचे कार्यही सुधारते.
  • त्वचेसाठी लाभकारक: ग्रीन टी बॅग्स डार्क सर्कल आणि सुजलेल्या डोळ्यांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यांचे दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म सुनिश्चित करतात की तुमची त्वचा निरोगी दिसेल आणि तेजस्वीपणें चकाकणारही.
  • वजन कमी करण्यास वाव देते: ग्रीन टी कॅटेचिन आणि कॅफीन मध्ये समृद्ध आहे , जे बीएमआय वाढवतात आणि सुधारित बीएमआय वसा कमी करणें आणि वजन कमी करणें यांच्याशी थेट संबंधित आहे.
  • मौखिक आरोग्य सुधारते: जिवाणूरोधी असल्याशिवाय, ग्रीन टीमधील कॅटेचिन तुमच्या तोंडातील जिवाणूंना मारून टाकते आणि याप्रकारे हिरडे आणि दातातील संक्रमण टाळतात. ग्रीन टी नियमितपणें पिल्याने श्वासात आल्याच्या वासाला दूर ठेवते .

प्रभावी सूक्ष्मजीवरोधी म्हणून ग्रीन टी - Green tea is an effective antimicrobial in Marathi

संशोधनात प्रगती झाल्यामुळे, माणसांनी अधिकतर रोगांच्या विरोधात प्रतिजैविके विकसित केली आहेत. अधिकतर रोग पूर्वी घातक समजले जात होते आणि आता सतत विकसित होणार्र्या तंत्रज्ञानामुळे उपचारयोग्य आहेत. पण या यशामुळे औषधप्रतिरोधक सूक्ष्म जिवांच्या रूपात पूर्णपणें भिन्न आव्हान आमच्यासमोर आले आहे. अशा वेळेस, अधिक नैसर्गिक उत्पादनांची गरज आहे, जे अधिक व्यापक पातळीवर काम करतील आणि त्यांविरोधात प्रतिरोध विकसित करण्यास सूक्ष्म जिवांना कठिन जाईल. अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की ग्रीन टी फंगल, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य संक्रमणांना सामोरे जाण्यात खूप प्रभावी आहे. ग्रीन टीच्या या गुणधर्माचे कारण तिच्यात असलेले कॅटेचिन आहे, ज्यांनी अधिकतर सूक्ष्म जिवांच्या विकासाला नियंत्रण करण्याचा दावा केला आहे आणि प्रभावीपणें रोगाच्या कारक जिवाणूंना मारू शकते. तसेच, ग्रीन टीचे सूक्ष्मजीवरोधी प्रभाव एमआरएसए ( मेथेसिलिन प्रतिरोधक स्टॅफिलोकॉकस ऑरस) वर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापी, औषधीय उपचारामध्ये ग्रीनटीच्या सूक्ष्मजीवरोधी पैलूचे उपयोग करून घेण्याच्या अचूक पद्धतीबद्दल अजूनही संशोधन चालू आहे.

ग्रीन टीमधील कर्करोगरोधी संभावना - Green tea anti cancer potential in Marathi

स्तनाचे कर्करोग जगभरातील महिलांमध्ये मर्त्यतेच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. अनेक औषधे असतांनाही, या सतत वाढत असलेल्या समस्येला हाताळणें खूप कठिण राहिले आहे, विशेषकरून अतिशय धोका असलेल्या लोकांमध्ये (त्यांच्य कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचे इतिहास असलेल्या लोकांमध्ये) . हल्लीचे अभ्यास सुचवतात की ग्रीन टी सार देणें स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वांत सामान्यपणें वापरले जाणारे औषध आणि कर्करोग कोशिका मारण्यात खूप शक्तिशाली आहे आणि कर्करोगाच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. हे पुढे सुचवले गेले की ग्रीन टीमधील कॅटेचिन कर्करोगरोधी वाहक असू शकतो. तसेच, ग्रीन टीचा अभ्यास त्याच्या अमाशय व फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये कर्करोगरोधी गतिविधींसाठी केला जात आहे, जिथे असा दावा केला गेला की ते विकिरणामधील जळजळीचे प्रभाव कमी करण्यात सहायक आहे. तथापी, कर्करोग कोशिकांवर त्याच्या वास्तविक कार्यपद्धतीबद्दल काही प्रमाण उपलब्ध नाही, आणि योग्य पुराव्याअभावी अजून संशोधन आजही गरजेचे आहे.

स्वयंप्रतिकार रोगांसाठी ग्रीन टी - Green tea for autoimmune diseases in Marathi

स्वयंप्रतिकार रोग म्हणजे ती स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रतिकार प्रणाली स्वतःच्या कोशिकांविरुद्ध प्रतिजैविके तयार करते. अशक्त झालेले शरीर आणि प्रतिकार प्रणालीला अनेक संक्रमणांचा धोका असतो. याची नोंद घ्यावी की प्रतिकार प्रणाली शिथिल झालेल्या व्यक्तीवर उपचार करणें सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक कठिण आहे, कारण त्यांचे स्वतःची प्रतिकार प्रणाली त्यांच्याविरुद्ध कार्य करत असते. ओरेगॉन राज्य विद्यापिठाद्वारे प्रकाशित झालेल्या लेखानुसार, ग्रीन टी प्रतिकार सशक्त करण्यात खूप उपयोगी आहे. हे लेख सुचवते की ग्रीन टीमधील काही यौगिके नियाम्क टी कोशिका ( शरिराच्या स्वतःच्या कोशिकांवर आक्रमण करण्यापासून प्रतिकार प्रणालीला रोखणार्र्या प्रतिकार प्रणालीतील काही कोशिका) चे स्तर वाढवते. नियामक टी कोशिकांची संख्या वाढल्यास, शरिराच्या सामान्य कोशिकांवर हल्ला करण्यापासून प्रतिकार प्रणाली दूर जाते आणि स्वयंप्रतिकार रोगांची तीव्रता कमी होते.

अल्झायमर्समध्ये ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits in alzheimer's in Marathi

अल्झायमर्स आणि पार्किसंससारखे रोग आज खूप सामान्य न्युरोडिजनरेटिव्ह रोग (मेंदूच्या कोशिकांना नष्ट करणारे रोग) आहेत. मेंदूच्या कोशिकांच्या या रोगांमुळे झालेल्या ह्रासांमुळे माणसांमध्ये डिमेंशिआ आणि संज्ञानात्मक कार्याची हानी होऊ शकते. हल्लीचे अभ्यास सुचवतात की ग्रीन टीच्या सारामध्ये अशा अधिकतम न्युरोडेजेनेरेटिव्ह रोगांमधील लक्षणे कमी करण्यात खूप उपचारात्मक मूल्य आहे. हे अभ्यास पुढे सुचवतात की ग्रीन टीचे एंटीऑक्सिडेंट गुणधर्म ग्रीन टीच्या मज्जारक्षक ( मेंदूच्या कोशिकांना सुरक्षा देणारे आणि न्युरॉनची क्षती टाळणारे) फायद्यांसाठी जवाबदार आहेत.

आर्थरायटिसमध्ये ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits in arthritis in Marathi

अनेक अभ्यासांनुसार, ग्रीन टी संधिवाताच्या उपचारामध्ये खूप उपयोगी आहे. हे अभ्यास सुचवतात की ग्रीन टीमध्ये पॉलिफॅनॉल्स म्हणून जीवशास्त्रीय यौगिकांचे, विशेषकरून ईजीसीजी ( एपिगॅलोकॅटेचिन-3 गॅलॅट) . विशेष वर्ग असते जे एक शक्तिशाली दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट आहे. ती सांध्यांमधील वेदना आणि सूज कमी करते, आणि संधिवाताच्या दोन असह्य समस्यांपासून आराम देते. अमेरिकेत झालेले पुढील अभ्यास पुष्टी करते की संधिवाताच्या उपचारामध्ये ईजीसीजीचे उपचारात्मक मूल्य असतात. ईजीसीजीच्या हाड सुरक्षित ठेवण्याच्या गुणवत्तांसह ऑस्टिओपोरोसिस्सारख्या हाडांच्या रोगांची लक्षणे कमी करण्यात ग्रीन टीमधील स्थित फ्लोराइडच्या प्रभावावरही व्यापक अभ्यास झाले आहे. तथापी, या औषधाची मात्रा आणि उपचाराबद्दल किंवा मानवी आरोग्यावरील त्याच्या संभाव्य प्रभावांवर पर्याप्त प्रमाण उपलब्ध नाही. म्हणून, संधिवाताच्या रुग्णांनी ग्रीन टीच्या संभाव्य संधिवातरोधी प्रभावांबद्दल डॉक्टरांना विचारून घ्यावे

मधुमेह रुग्णांसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for diabetes patients in Marathi

हल्लीच्या अभ्यासांचा दावा आहे की ग्रीन टी शरिरातील इंसुलिन संवेदनशीलता वाढवते. नियमितपणें ग्रीन टी वापरल्याने हे हॉर्मोन (इंसुलिन) रक्तातील अधिक ग्लूकोझ घेते आणि याद्वारे शरिरातील रक्तशर्करा कमी होते. जपानी जनतेवर झालेल्या पुढील अभ्यासामध्ये, असा दावा केला गेला होता की रोज ग्रीन टी पिणार्र्या लोकांना मधुमेह होण्याची खूप कमी शक्यता असते.

केसांसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for hair in Marathi

ग्रीन टी विटामिनचे एक चांगले स्त्रोत आहे, विशेषकरून विटामिन बी, सी, डी आणि ई सह, हे विटामिन हेअर फॉलिकलला पोषित करतात आणि केसांच्या वाढीला वाव देतात. तसेच, विटामिन सी एक शक्तिशाली एंटीऑक्सिडेंट आहे, जे ग्रीन टीमध्ये स्थित कॅटेचिनसह केसांना झालेल्या ऑक्सिडेटिव्ह क्षती (तणाव आणि प्रदूषणाद्वारे झालेली) मुळे झालेल्या केस गळतीविरुद्ध झगडतात. प्राण्यांवर केलेल्या आणि प्रयोगशाळा अभ्यासही सुचवतात की ग्रीन टी स्थानिकरित्या लावणें स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये टेस्टस्टरोनमुळे झालेल्या केसगळती आणि टक्कल पडण्याविरुद्ध खूप प्रभावी आहे. तरीही, मानवी प्रमाणाच्या अभावामध्ये, तुमच्या केसांसाठी रिंस किंवा पेस्ट म्हणून ग्रीन टी वापरण्यापूर्वी तुमच्या डॉकटरांशी चर्चा केली पाहिजे.

त्वचेसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for skin in Marathi

हे तुम्ही चकाकत आहात की हा चहा आहे? एक कोडे आहे न हा. पण नियमितपणें ग्रीन टी घेतल्याने हा स्वप्न वास्तवामध्ये परिवर्तित होऊ शकतो. अभ्यास सुचवतात की ग्रीन टीचे एंटीऑक्सिडेंट आणि दाहशामक गुणधर्मांमुळे ते आदर्श वयवाढरोधी खाद्य बनते. ग्रीन टी नियमित घेतल्याने शरिरातील एंटीऑक्सिडेंट्ची संख्या वाढते, जे चेहर्र्यावरील सुरकुती, बारीक रेषा आणि वेळेपूर्वी वयवाढीच्या इतर चिन्हांविरुद्ध सुरक्षेची पहिली रेषा आहे. तसेच, वापरलेले ग्रीन टी बॅग्स स्थानिकरित्या लावणें डोळे सुजण्यासाठी एक ज्ञात उपाय आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनुसार, ग्रीन टीमधील कॅफीन डोळ्यांच्या भोवतीच्या नसांना संकुचित करतात, जे डोळ्याच्या क्षेत्रातील रक्ताभिसरण वाढवून  डोळ्यांच्या भोवतीची सूज कमी  करतात. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही खूप वेळ काम केल्याने, ग्रीन टीचे वापरलेल्या बॅगद्वारे तुमच्या तणाव झालेल्या डोळ्यांना आराम देतात.

श्वासातून दुर्गंधीसाठी ग्रीन टी - Green tea for bad breath in Marathi

तुमच्या श्वासातून दुर्गंधी येते का? तुम्हालाही हिरड्याच्या समस्यांचा त्रास आहे का? आनंदाची बाब ही आहे की ग्रीनटीचे जिवाणूरोधी गुणधर्म तुमच्या मदतीला येऊ शकतात. डॉक्टर सुचवतात की हिरड्याच्या किंवा दाताचे संक्रमण श्वासातून दुर्गंधी येण्याचे प्राथमिक कारण आहे. संशोधनाप्रमाणें, ग्रीन टीमधील कॅटेचिन तुमच्या तोंडातील हानिकारक जिवाणूंना मारतात आणि श्वासाच्या दुर्गंधीची समस्या कमी करतात. तसेच, ग्रीन टीचे सुगंधकारक प्रभाव श्वासातून दुर्गंधींच्या समस्येला हाताळण्यास मदत करतात, जे आंतरिकपणें सल्फर अधिक असलेल्या कांदे किंवा लसूणसारखे विभिन्न खाद्यपदार्थ खाण्यामुळे होऊ शकतात.

हृदयासाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for heart in Marathi

हल्लीच्या शतकात कार्डिओव्हॅस्कुलर ( हृदय आणि रक्ताभिसरणप्रणालीशी संबंधित) रोग खूपच अधिक प्रचलन पावले आहेत. प्रदूषण, लठ्ठपणा आणि तणाव वाढल्यास, वयस्कर लोकांचे रोग आता त्याच प्रमाणात तरुण मंडळीला प्रभावित करत आहेत. अभ्यास सुचवतात की ग्रीन ती हृदयाच्या समस्यांना कमी करण्यात खूप मदतशीर सिद्ध होऊ शकतात. संशोधकांप्रमाणें, फ्री रॅडिकल ( शरिराचे स्वतःचे चयापचय कार्य आणि तणाव किंवा प्रदूषणाचे प्रभाव म्हणून आपल्या शरिरात निर्माण झालेले एक प्रकारचा प्राणवायू) आपल्या शरिरातील एलडीएल (कमी घनत्त्वाचे कॉलेस्टरॉल) किंवा खराब कॉलेस्टरॉल आणि रक्तनलिकांमध्ये प्लाक (वसा संचय) बनण्यास कारणीभूत होतो. प्लाकमुळे रक्तनलिका आंकुचन पावतात आणि स्ट्रोक व हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या होतात. एंटीऑक्सिडेंट म्हणून ग्रीन टी फ्री रॅडिकलला मुक्त करतात आणि ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवतातम ज्याने सर्वांत सामान्य आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी - Green tea for weight loss in Marathi

तुम्ही हल्ली वजन कमी करण्याबद्दल ग्रीन टीच्या प्रभावांबद्दल ऐकले आहे का? तुम्हाला कुणी सांगितले आहे का की हे पूरक तत्त्व त्यांच्यासाठी किती आश्चर्यकारक राहिले आहे? तुम्हाला त्याच्याबद्दल चांगले प्रत्युत्तर अजूनही मिळालेले नसल्यास, त्याचा तुम्ही शोध घेतला, तर तुम्हाला स्वतःच त्याच्या फायद्यांबद्दल माहीत पडेल. वजन कमी करण्याबद्दल लोकांची मदत करण्यात ग्रीन टीच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक संशोधन झालेले आहेत आणि ते सुचवतात की ग्रीन टी नक्कीच वजन कमी करण्यात प्रभावी आहे. हे अजून जोडण्यात आले की ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि कॅफीन असते, जे एकत्रितपणें शरिराच्या चयापचयाला वाढवतात. आणि सैद्धांतिकरीत्या, वाढीव चयापचय आपल्या शरिराला ऊर्जा अधिक गतीने जाळून अधिक वसा तोडण्यात मदत करतात. पण, यापैकी अधिकतर अभ्यासांचा दावा आहे की अधिक प्रमाणात कॅटेचिन आणि कॅफीन सामान्यपणें एक कप ग्रीन टीमध्ये उपस्थित असतात. डॉक्टरांप्रमाणें, ग्रीन टी नियमित व्यायाम आणि निरोगी आहारपद्धतीच्या लाभांमध्ये भर घालते. पण त्याच्या प्रचाराच्या अगदी उलट, तुम्ही जंक फूड घेत असल्यास आणि स्वच्छंद जीवनशैली असल्यास, ग्रीन टी काही जादूची छडी नाही. वजन प्रभावीपणें कमी करण्यासाठी, ग्रीन टीसह व्यायाम आणि निरोगी जेवण करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

मेंदूसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for brain in Marathi

तुम्हाला माहीत आहे का की रोज एक कप चहा पिल्याने तुमचा मेंदू तीव्र होतो? आयुर्वेदिक वैद्यांनुसार, ग्रीन टीमध्ये प्रचुर कॅफीन असतो, ज्याचे मेंदूच्या कोशिकांवर प्रत्यक्ष संप्रेरक प्रभाव होतो. आमच्या मेंदूवर कॅफीनचे प्रभाव होण्याच्या नेमक्या पद्धतींच्या अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी अधिकांश सुचवतात की कॅफीन आमच्या मेंदूमधील रसायनाचे (एडोनेसिन) कार्य अडवून टाकते. एडोनेसिन स्तर कमी झाल्याने मेंदूंच्या कोशिकांची गतिविधी वाढते. अभ्यास सुचवतत की कॅफीन कमी घेतल्यास ते न केवल मेंदूसाठी संप्रेरक आहे, तर ते स्मरणशक्ती आणि मेंदूमधील समन्वयही सुधारते.

माफक प्रमाणात ग्रीन टी घेतलेले सुरक्षित आहे, पण अधिक घेतल्याने अनेक सहप्रभाव होऊ शकतात:

  1. ग्रीन टीचे प्रमुख घटक कॅफीने आहे, आयुष्यात खूप काळ चहा घेतलेल्या लोकांमध्ये चिंता, निद्रानाश आणि अस्वस्थता यांसारखी परिहारात्मक लक्षणे आणि निर्भरता दिसून आली आहे.
  2. काही प्रसंगांमध्ये, यकृताच्या क्षतीचे संबंध अत्यधिक ग्रीन टी घेण्याशी जोडण्यात आले आहे. तथापी, यूएस फार्माकोपिआद्वारे प्रकाशित अहवालामध्ये, हे दिसून आले आहे की ग्रीन टीचे सार केवळ रिकाम्या पोटी घेतल्यासच विषारी असतात. आणि काही इतर संशोधक सुचवतात की ग्रीन टी यकृतासाठी अजिबात विषारी नाही. म्हणून, ही खूप विरोधाभासी माहिती आहे. पण तुमचे यकृत आधीच अशक्त असल्यास, ग्रीन टी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणें उत्तम राहील.
  3. ग्रीन टी ठराविक उपचारात्मक औषधे आणि वनस्पतिजन्य उपायांच्या कार्याशी हस्तक्षेप करत असल्याची माहिती आहे. म्हणून, तुम्ही आधीच विहित औषधावर असल्यास, ग्रीन टी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणें उत्तम राहील.
  4. तुम्हाला रक्तक्षय असल्यास, ग्रीन टी घेणें योग्य नव्हे, कारण त्याने तुमच्या अन्नातील लौहाचे अवशोषण कमी झाल्याचे ऐकिवात आहे.
  5. ग्रीन टीमुळे तुमच्या शरिरातील रक्तशर्करा कमी होण्याचे समजते. म्हणून, विहित मधुमेहरोधी औषधांवरील मधुमेहग्रस्त लोकांना तुमच्यासाठी ग्रीन टीची योग्य मात्रा निर्धारित करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  6.  2 कपपेक्षा अधिक ग्रीन टी घेतल्याने तुमच्या शरिरातील कॅल्शिअम बाहेर पडते आणि हाडे अशक्त होतात. म्हणून ग्रीन टी माफक घेणेंच बरोबर राहील.
  7. ग्रीन टी गरोदरपणादरम्यान असुरक्षित समजले जात असले, तरी ते कॅफीनचे स्त्रोत आहे आणि माफकच घेतले गेले पाहिजे. म्हणून, तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्यासाठी ग्रीन टीची योग्य मात्रा जाणण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेंच चांगले राहील.
  8. ग्रीन टीमध्ये प्रचुर कॅफीन असते, म्हणून, मुलांना ते देणें योग्य नव्हे.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹799  ₹850  6% OFF
BUY NOW

दिवसात 1-2 कप घेतल्यास ग्रीन टी घेणें सुरक्षित समजले जाते. तथापी, वास्तविक मात्रा वैय्यक्तिक शरीर प्रकार, भौतिकी आणि मोसमाप्रमाणे वेगळी असू शकते. म्हणून, तुमच्या आरोग्य काळजीमध्ये ग्रीन टी जोडण्यापूर्वी पोषणतज्ञाचा सल्ला घेणें उत्तम राहील.

Dr. Dhanamjaya D

Dr. Dhanamjaya D

Nutritionist
16 Years of Experience

Dt. Surbhi Upadhyay

Dt. Surbhi Upadhyay

Nutritionist
3 Years of Experience

Dt. Manjari Purwar

Dt. Manjari Purwar

Nutritionist
11 Years of Experience

Dt. Akanksha Mishra

Dt. Akanksha Mishra

Nutritionist
8 Years of Experience


Medicines / Products that contain Green tea

संदर्भ

  1. Sabu M Chacko. Beneficial effects of green tea: A literature review. Chin Med. 2010; 5: 13. PMID: 20370896
  2. Nehlig A1, Daval JL, Debry G. Caffeine and the central nervous system: mechanisms of action, biochemical, metabolic and psychostimulant effects.. Brain Res Brain Res Rev. 1992 May-Aug;17(2):139-70. PMID: 1356551
  3. Dietz C1, Dekker M1. Effect of Green Tea Phytochemicals on Mood and Cognition. Curr Pharm Des. 2017;23(19):2876-2905. PMID: 28056735
  4. Nobre AC1, Rao A, Owen GN. L-theanine, a natural constituent in tea, and its effect on mental state. Asia Pac J Clin Nutr. 2008;17 Suppl 1:167-8. PMID: 18296328
  5. Yiannakopoulou ECh. Green tea catechins: Proposed mechanisms of action in breast cancer focusing on the interplay between survival and apoptosis. Anticancer Agents Med Chem. 2014 Feb;14(2):290-5. PMID: 24069935
  6. Miyata Y. Anticancer Effects of Green Tea and the Underlying Molecular Mechanisms in Bladder Cancer. Medicines (Basel). 2018 Aug 10;5(3). pii: E87. PMID: 30103466
  7. Fritz H. Green tea and lung cancer: a systematic review. Integr Cancer Ther. 2013 Jan;12(1):7-24. PMID: 22532034
  8. Sueoka N. A new function of green tea: prevention of lifestyle-related diseases. Ann N Y Acad Sci. 2001 Apr;928:274-80. PMID: 11795518
  9. Liu K. Effect of green tea on glucose control and insulin sensitivity: a meta-analysis of 17 randomized controlled trials. Am J Clin Nutr. 2013 Aug;98(2):340-8. PMID: 23803878
  10. Haqqi TM. Prevention of collagen-induced arthritis in mice by a polyphenolic fraction from green tea. Proc Natl Acad Sci U S A. 1999 Apr 13;96(8):4524-9. PMID: 10200295
  11. Chwan-Li Shen, James K. Yeh, Jay Cao, Jia-Sheng Wang4. Green Tea and Bone metabolism. Nutr Res. 2009 Jul; 29(7): 437–456. PMID: 19700031
  12. Steinmann J1, Buer J, Pietschmann T, Steinmann E. Anti-infective properties of epigallocatechin-3-gallate (EGCG), a component of green tea. Br J Pharmacol. 2013 Mar;168(5):1059-73. PMID: 23072320
  13. Lodhia P. Effect of green tea on volatile sulfur compounds in mouth air. J Nutr Sci Vitaminol (Tokyo). 2008 Feb;54(1):89-94. PMID: 18388413
  14. Weinreb O1, Mandel S, Amit T, Youdim MB. Neurological mechanisms of green tea polyphenols in Alzheimer's and Parkinson's diseases. J Nutr Biochem. 2004 Sep;15(9):506-16. PMID: 15350981
  15. Zong-mao Chen, Zhi Lin. Tea and human health: biomedical functions of tea active components and current issues. J Zhejiang Univ Sci B. 2015 Feb; 16(2): 87–102. PMID: 25644464
  16. Kim YY. Effects of topical application of EGCG on testosterone-induced hair loss in a mouse model.. Exp Dermatol. 2011 Dec;20(12):1015-7. PMID: 21951062
  17. Kwon OS et al. Human hair growth enhancement in vitro by green tea epigallocatechin-3-gallate (EGCG).. Phytomedicine. 2007 Aug;14(7-8):551-5. Epub 2006 Nov 7. PMID: 17092697
Read on app