स्पास्मोडिक डिस्फोनिया - Spasmodic Dysphonia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

स्पास्मोडिक डिस्फोनिया
स्पास्मोडिक डिस्फोनिया

स्पास्मोडिक डिस्फोनिया काय आहे?

स्पॅस्मोडिक डिस्फोनियाला लॅरिन्गल डायस्टोनिया असेही म्हटले जाते. ही एक न्यूरोलॉजिकल विकृती आहे ज्यामुळे लॅरेन्क्स (व्हॉईस बॉक्स) च्या स्नायूंच्या अयोग्य हालचाली होतात. यामुळे आवाज बदलतो आणि खराब होतो. या विकाराचे तीन प्रकार आहेत :

  • ॲडक्टर/ योजक स्पास्मोडिक डिस्फोनिया ज्यामध्ये व्होकल कॉर्ड्स बंद होतात आणि ताठरतात, ज्यामुळे आवाज खराब होतो.
  • अब्डक्टर/अपवर्तनी स्नायूचा स्पास्मोडिक डिस्फोनिया, ज्यामध्ये व्होकल कॉर्ड्स खुल्या राहतात, परिणामी कमकुवत आणि हळू आवाज येतो.
  • मिक्स्ड/मिश्रित स्पास्मोडिक डिसफोनिया, जिथे व्होकल कॉर्ड्स अयोग्यरीत्या उघडतात आणि बंद होतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

स्पास्मोडिक डिस्फोनिया एक दुर्मिळ विकार आहे जो कोणालाही प्रभावित करु शकतो. यामुळे पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रभावित होतात. सामान्यपणे, हळूहळू सौम्य लक्षणांसह विकार वाढतो.

  • ॲडक्टर/ योजक स्पास्मोडिक डिस्फोनियामुळे स्नायूंच्या अखडण्यामुळे बोलतांना आवाज त्रासदायक जाणवतो.
  • तर, अब्डक्टर/अपवर्तनी स्नायूचा स्पास्मोडिक डिस्फोनियामुळे आवाज कमकुवत आणि धाप लागल्यासारखा येतो. हसणे, रडणे किंवा ओरडणे करताना झटके येत नाहीत.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या विकाराचे अचूक कारण अस्पष्ट आहे परंतु बहुतेकदा हे मेंदूच्या विशिष्ट भाग - बेसल गॅंग्लियामधील रासायनिक बदलामुळे असल्याचे मानले जाते. बेसल गॅंग्लियामध्ये मेंदूच्या आत खोलवर चेता पेशींचे अनेक समूह असतात. ते शरीरातील स्नायूंच्या हालचालींचे समन्वय करतात. स्पास्मोडिक डिस्फोनिया तणाव, व्हॉईस बॉक्सला दुखापत किंवा आजारांमुळे होऊ शकतो. आनुवांशिक घटक देखील स्पास्मोडिक डिस्फोनियाचा धोका वाढवतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

स्पास्मोडिक डिस्फोनियाची लक्षणे इतर व्होकल कॉर्डच्या विकारांसारखेच असतात, त्याचे निदान करणे कठीण आहे. म्हणून, स्पास्मोडिक डिस्फोनियाच्या व्यवस्थापनात अनुभवी स्पीच पॅथोलॉजिस्ट, कान नाक घसा(ENT) तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट च्या संघाने अचूक निदान करणे आवश्यक आहे.

कान नाक घसा(ENT) तज्ज्ञ तपशीलवार लॅरिन्गल परिक्षण करतील. स्पीच पॅथोलॉजिस्ट व्हॉइसच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करतील आणि विकार अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी माहिती, प्रोत्साहन आणि कल्पना देतील. तणाव लक्षणे वाढवण्यासाठी कारणीभूत असल्यामुळे, तणावाचे व्यवस्थापन  किंवा विश्रांती या लक्षणांचा सामना करण्यास मदत करू शकतात.

न्यूरोलॉजिस्ट रुग्णांना इतर हालचालींच्या विकारांसाठी मूल्यांकन करतात आणि योग्य वेळी विशिष्ट औषधांच्या  वापराचा करू शकतात. व्होकल कॉर्ड स्नायूंमध्ये बोट्युलिनमचे स्थानिक इंजेक्शन लक्षणांपासून तात्पुरता आराम देऊ शकतात. स्पीच थेरपी हा देखील उपचार योजनाचा एक भाग आहे . जेव्हा पारंपरिक उपाय अप्रभावी ठरतात तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.



संदर्भ

  1. National Center for Advancing and Translational Sciences. Spasmodic dysphonia. Genetic and Rare Diseases Information Center
  2. National Institute on Deafness and Other Communication Disorders. [Internet]: Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Spasmodic Dysphonia
  3. National Spasmodic Dysphonia Association. [Internet]: Illinois; Diagnosis
  4. Brain Foundation [Internet]: Australia. SPASMODIC DYSPHONIA.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Spasmodic dysphonia
  6. Mor N, Simonyan K, Blitzer A. Central voice production and pathophysiology of spasmodic dysphonia. Laryngoscope. 2018 Jan;128(1):177-183. PMID: 28543038
  7. Christy L. Ludlow. Treatment for spasmodic dysphonia: limitations of current approaches . Curr Opin Otolaryngol Head Neck Surg. 2009 Jun; 17(3): 160–165. PMID: 19337127

स्पास्मोडिक डिस्फोनिया साठी औषधे

Medicines listed below are available for स्पास्मोडिक डिस्फोनिया. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.