सोडियमची कमतरता - Sodium deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 04, 2019

March 06, 2020

सोडियमची कमतरता
सोडियमची कमतरता

सोडियमची कमतरता म्हणजे काय?

सोडियमची कमतरता, हाइपोनॅट्रीमिया म्हणूनही ओळखली जाते, ज्यात सामान्यच्या तुलनेत रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी असते. जेव्हा सोडियमची पातळी 135-145 मिलीइक्विव्हलेन्ट्स/लीटरपेक्षा कमी असते तेव्हा हा आजार होतो. सोडियम हा पेशींच्या बाहेरील द्रवपदार्थातील प्रमुख आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक घटक आहे आणि द्रव-इलेक्ट्रोलाइट राखण्यात मदत करतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सोडियमची कमतरता सौम्य असते तेव्हा लक्षणे अस्पष्ट असतात. आजाराची तीव्रता वाढते तसे खालील गोष्टी लक्षात येऊ लागतात

याची मुख्य कारणं काय आहेत?

शरीरात मोठ्या प्रमाणात वाढलेले पाणी सोडियम पातळी कमी करते असे आढळते. सोडियमचे कमी प्रमाण एकतर फक्त सोडियम विसर्जित झाल्यामुळे किंवा शरीरातील पाण्याबरोबर विसर्जित नुकसान असू शकते.

काही इतर कारणे खालीलप्रमाणे असू शकतात

  • किडनीची अपूर्ण कार्यक्षमता.
  • शरीरात द्रवाची झालेली वाढ.
  • सोडियमच्या नुकसानास कारणीभूत असलेल्या औषधांचा वापर.
  • मूत्र विसर्जनात वाढ करणारी उदासीनता किंवा वेदना शामक औषधे.
  • जास्त उलट्या आणि अतिसार.
  • वाढलेली तहान.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

शरीरातील द्रवपदार्थांमध्ये सोडियमच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही चाचण्यांचा करण्याचा सल्ला देऊ शकतात. सर्वात आधी मूल्यांकन म्हणून शारीरिक तपासणी केली जाते. इतर आजारांची शक्यता फेटाळण्यासाठी लक्षणांची चौकशी केली जाऊ शकते. सोडियमच्या पातळीच्या तपासणीसाठी रक्त आणि मूत्र सारख्या शरीरातील द्रवांचे विश्लेषण केले जाते. शिवाय खाली दिलेल्या चाचण्या केल्या जाऊ शकतात

  • सेरम सोडियम.
  • ओस्मॉलीटी चाचणी.
  • मूत्रा मध्ये सोडियम.
  • मूत्राची ओस्मॉलीटी.

सामान्यत:, उपचार कारण आणि आजाराच्या तीव्रतेनुसार केले जातात. मुख्य उपचारात खालील बाबींचा समावेश होतो

  • इंट्राव्हेनस द्रव.
  • लक्षणांपासून मुक्तता मिळण्यासाठी औषधे.
  • कमी पाणी पिणे.

सोडियमची पातळी वाढविणारी काही औषधे आहेत परंतु ती वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सोडियम आणि मीठाची पातळी सुधारण्यासाठी इतर पद्धतींमध्ये इलेक्ट्रोलाइट्स पिणे समाविष्ट आहे. किडनी निकामी झाली असल्यास अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी डायलिसिस फायदेशीर ठरते.

सोडियमची कमतरता सुधारली जाऊ शकते आणि हा एक गंभीर आजार नाही, परंतु तुमच्या महत्वाच्या अवयवांची तडजोड केली जाऊ शकत नाही.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Low sodium level
  2. Michael M. Braun et al. Diagnosis and Management of Sodium Disorders: Hyponatremia and Hypernatremia. Am Fam Physician. 2015 Mar 1;91(5):299-307. American Academy of Family Physicians.
  3. Oregon State University. [Internet] Corvallis, Oregon; Sodium (Chloride)
  4. National Kidney Foundation [Internet] New York; Hyponatremia
  5. Harvard School of Public Health. The Nutrition Source. The President and Fellows of Harvard College [Internet]

सोडियमची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

सोडियमची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for सोडियमची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.