त्वचेची ॲलर्जी - Skin Allergy in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

त्वचेची ॲलर्जी
त्वचेची ॲलर्जी

त्वचेची ॲलर्जी म्हणजे काय?

हानीकारक नसणाऱ्या घटकांना शरीराची रोगप्रतिकार शक्ती जेव्हा प्रतिकार करते तेव्हा ॲलर्जी उद्भवते. साधारणतः, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा, आपले धोकादायक आजारांपासून संरक्षण करते; मात्र, त्वचेच्या ॲलर्जी असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अतिसंवेदनशील असते. एक्झिमा, पित्ताच्या गाठी, कॉन्टॅक्ट डर्माटायटीस आणि अँजियोएडिमा ही ॲलर्जीक त्वचेची सामान्य प्रतिक्रिया आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्यपणे दिसणारी चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

  • लालसरपणा.
  • खाज.
  • सूज.
  • रॅशेस.
  • गाठी होणे.
  • त्वचेवर खपल्या.
  • त्वचेला तडे.

एक्झिमा आणि पित्ताच्या गाठी हे त्वचेच्या ॲलर्जीचे सामान्य प्रकार आहेत. त्यांची लक्षणे दोघांमधील फरक करण्यास मदत करतात. एक्झिमा साधारणतः चेहऱ्यावर दिसतो ज्यात  खाज, लालसरपणा किंवा कोरडी त्वचा दिसते, ओरखडल्यास त्वचेतून द्रव गळतो आणि खपली पडते. पित्ताच्या गाठीत लाल आणि पांढऱ्या रंगाचे उंचवटे शरीरावर कुठेही दिसू शकतात जे काही आठवड्यांतच अदृश्य होतात. अँजियोडेमा (द्रव संचय झाल्यामुळे सूज येणे) डोळे, गाल किंवा ओठांच्या बाजूला चेहऱ्यावर असतो. तसेच, ॲलर्जन्सच्या थेट संपर्कात आल्यास प्रतिक्रिया म्हणून त्वचेवर खाज सुटते आणि लालसरपणा येतो, ज्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माटायटीस होतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

ॲलर्जी सामान्यतः खालीलपैकी कोणत्याही ॲलर्जन्सच्या संपर्कात आल्याने होते :

  • लॅटेक्स.
  • विषारी वेल.
  • थंड आणि गरम तापमान.
  • परागकण.
  • शेंगदाणे, शेलफिश इ. सारखे खाद्य पदार्थ.
  • पाणी.
  • कीटक.
  • औषधे.
  • सूर्यप्रकाश.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर तुमचा वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहास विचारू शकतात आणि शारीरिक तपासणी करू शकतात. आपल्या ॲलर्जीचे निर्धारण करण्यासाठी डॉक्टर त्वचा चाचणी, पॅच चाचणी किंवा रक्त चाचणी यांचा देखील सल्ला देऊ शकतात. निदान पुष्टी करण्यासाठी स्किन प्रिक चाचणी किंवा इंटर्डर्मल चाचणी केली जाऊ शकते. आणखी एक निर्णायक चाचणी म्हणजे डॉक्टर-पर्यवेक्षी आव्हान चाचणी ज्यात तुम्ही काही हुंगतात किंवा तोंडाद्वारे ॲलर्जी असलेली वस्तू ग्रहण करता.

ॲलर्जीसाठी उपचार तुमचा वैद्यकीय इतिहास, ॲलर्जन चाचणीचे परिणाम आणि लक्षणांची तीव्रता यावर अवलंबून असतात. सलाइनद्वारे नाक आतून स्वच्छ धुतल्याने वातावरणातील ॲलर्जन्सची लक्षणे कमी होतात. ॲलर्जीच्या प्रतिक्रियेच्या तीव्रतेच्या आधारे डॉक्टर कॉर्टिकोस्टिरॉईड्स, मास्ट सेल इनहिबिटर, डिकॉन्गस्टेंट्स आणि एपिनेफ्राइन सारखी औषधे लिहून देतील. स्टेरॉईड्स, मौखिक अँटीहिस्टामाइन आणि अँटीबायोटिक्स असलेले टॉपिकल क्रीम देखील लक्षणांच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकतात.

तुम्ही रॅशेसवर ओरखडणे टाळले पाहिजे कारण यामुळे खाज वाढेल. जळजळ शांत करण्यासाठी हळूवारपणे सूती कापड फोडावर लावा. कोमट पाण्याने आंघोळ करून, प्रभावित त्वचेला मॉइस्चराइज करा, ब्लीच, कठोर डिटर्जेंट किंवा साबणाचा संपर्क टाळल्याने त्वचेच्या ॲलर्जीची  लक्षणे कमी करण्यास मदत मिळू शकते.



संदर्भ

  1. Asthma and Allergy Foundation of America. [Internet]. Arlington, VA. Allergy Diagnosis.
  2. American Academy of Allergy, Asthma & Immunology. [Internet]. Milwaukee, WI; Skin Allergy.
  3. American College of Allergy, Asthma & Immunology. [Internet]. Illinois, United States; Eczema (Atopic Dermatitis).
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Allergies - overview.
  5. Healthdirect Australia. Contact dermatitis. Australian government: Department of Health

त्वचेची ॲलर्जी साठी औषधे

Medicines listed below are available for त्वचेची ॲलर्जी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.