धाप लागणे - Shortness of Breath in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

December 26, 2018

March 06, 2020

धाप लागणे
धाप लागणे

सारांश

श्वास छोटे पडणें, ज्याला वैद्यकीय भाषेत डायस्प्निआ  असे देखील म्हणतात. श्वास छोटे पडणें ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. या अवस्थेत प्रभावित व्यक्तीला अनेक प्रकारच्या समजुती असतात, आणि काही अनुभव व्यक्तीच्या भावनात्मक स्थितीद्वारे प्रभावित असतात. श्वास कमी होण्याची अनेक प्रकारची कारणे असल्यामुळे, वास्तविक कारणाचे निदान डॉक्टरांसाठी एक आव्हान असते. शीघ्र परीक्षण व तसेच वेळी निदान प्रभावी उपचारासाठी खूप आवश्यक आहेत. काही वेळा, डायस्प्निआ या आजारामागील  वास्तविक कारणाचे निदान निश्चित करणे खूप कठीण असते, कारण यामागे एकापेक्षा अधिक अंतर्निहित रोग असतात. श्वासहीनतेचे कारण असणारी विविघ घटके असतात उदा. फुफ्फुसे आणि हॄदयाचे रोग, न्युमोनिआ, हृदयघात, तीव्र कोरोनरी सिंड्रोम आणि इतर परिस्थिती जसे की रक्तक्षय, लठ्ठपणा आणि मानसिक आजार.

धाप लागणे ची लक्षणे - Symptoms of Shortness of Breath in Marathi

डायस्प्निआची लक्षणे अचानक (तीव्र) किंवा प्रगतिशील (घातक) असू शकतात. तीव्र श्वासहीनता काही मिनिटांपासून काही तासांत सुरू होते. त्यासह खोकला, ताप, ओरखडा किंवा छातीदुखी यांसारखी सहकारी लक्षणे असू शकतात. घातक डायस्प्निआ रोगामध्ये, व्यक्तीला दैनंदिन कामे करतांना श्वासहीनता जाणवतें उदा. एका खोलीतून दुसर्र्या खोलीत चालत जाणें किंवा बसलेल्या अवस्थेतून उठून उभा राहणें. काही परिस्थितींमध्ये, रुग्णाला अचानक जलद श्वास पडू लागतो किंवा शरिराच्या स्थितीत बदलतांना ही अवस्था अजून त्रासजनक होते. इतर लक्षणांमध्ये पुढील जाणिवा सामील आहेत:

  • श्वास गेल्याची जाणीव होणें.
  • छातीत घट्टपणा जाणवणें.
  • श्वास घेण्याची आच (हवेची भूक)
  • गहन श्वास घेण्यात असामर्थ्य.
  • श्वास घेतांना गोंगाट होणें.
  • जलद उथळ श्वास
  • व्हीझिंग
  • पिवळी आणि थंड त्वचा
  • घसा आणि छातीच्या वरील भागातील स्नायू वापरून श्वास घेणें.
  • चिंता किंवा ताणाचे झटके
  •  

धाप लागणे चा उपचार - Treatment of Shortness of Breath in Marathi

उपचार सामान्यपणें डायस्प्निआच्या कारणावर अवलंबून असते. काही वेळा, अंतर्निहित कारण पूर्णपणें बरा होतो, पण श्वासहीनतेच्या लक्षणांमध्ये पूर्ण आराम मिळत नाही. काही औषधोपचारांचे सहप्रभाव असू शकतात, म्हणून त्याचे धोके व फायद्यांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणें उपयुक्त असतो. उपचाराच्या पद्धती याप्रमाणे आहेत:

  • नेब्युलीकरण, इन्हेलर आणि प्राणवायू पद्धत
    एक यंत्र जो ब्रोंकोडिलेटर (हवेची वाट उघडून देणारे औषध) चे एरोझोल बनवतो, तो वापरला जातो. सूचनांप्रमाणे वापरले जाणारे होम नेब्युलीकरण किट उपलब्ध आहेत. श्वासहीनतेत साहाय्य करण्यासाठी रुग्णालयात सिलिंडरद्वारे प्राणवायू दिला जातो. तीव्र दम्याच्या झटक्यांमध्ये, औषध असलेले इन्हेलर हवेची वाट उघडतो आणि त्वरीत श्वासहीनता कमी करतो.
  • औषधोपचार
    खोकला व छातीदुखीची कारणे ठरणार्या कोणत्याही संक्रमणांवर उपचार म्हणून प्रतिजैविइक विहित केली जातात. एक्स्पेक्टोरेंट म्युकस बाहेत काढण्यात साहाय्य करतात. काही अफू-आधारित वेदनाशामके श्वासाला आराम देण्यात सहाय्यक असतात. त्याने श्वासाचा दर कमी होतो आणि झोपही चांगली लागते. काही औषधे गळती कमी करण्यात व हवेची वाट उघडून देण्यात साहाय्य करतात. डॉक्टरांच्या अनुमतीशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
  • द्रव्यांची निकासी
    प्ल्युरल आणि पेरिकार्डिअल एफ्यूझंसारख्या परिस्थितींमध्ये, श्वासात आराम देण्यासाठी साठवलेले द्रव्य शरिरातून निकासी करून द्यावे लागते.
  • रेडिओथेरपी
    डायस्प्निआचे कारण असलेली हवेच्या वाटामधील एखादी गाठ असल्यास, रेडिओथेरपी हवेची वाट अडवणार्र्या वस्तूचे आकार कमी करण्यास मदत करेल.
  • लेझर
    फुफ्फुसांच्या प्रगत कर्करोगांमध्ये, हवेची वाट अडवणार्र्या गाठीला कापण्यासाठी लेझर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.

जीवनशैली व्यवस्थापन

श्वासहीनता अनुभव करणारे लोक आरोग्य सुधारण्यासाठी खालील पावले उचलू शकतात:

  • धूम्रपान सोडणें
    फुफ्फुसांचे व हृदयाच्या आजारांचा व  कर्करोगांचा धोका धूम्रपान सोडल्याने बर्र्यापैकी कमी होतो. धूम्रपान रहितीकरण दवाखान्यांमध्ये गेल्यास, तीव्र त्यागात्मक लक्षणे आल्याशिवायच ही सवय मोडू शकते. निकोटिन गम आणि पॅच वापरल्यानेसुद्धा ही सवय सोडण्यात साहाय्य मिळालेले आहे.
  • हानीकारक प्रदूषकांचे संसर्ग टाळणें
    श्वासहीनतेचा झटका आणणार्र्या घटकांना टाळलेलेच बरे. परागणच्या मोसमात बाहेर पडणें किंवा डायस्प्निआचे कारण असलेले अलर्जीकारक पदार्थ, वायू, विषारी पदार्थ, पर्यावरणातील विषारी पदार्थ टाळावेत.
  • वजन कमी करणें
    लठ्ठपणाही हालचालीचे अभाव असल्यामुळे श्वासहीनतेचा कारक असू शकतो. थोडी मशागत केल्यानेच माणसाचा श्वास जाऊ शकतो. हायपरथायरॉयडिझ्मसारख्या वैद्यकीय परिस्थितींमुळे वजन वाढून डायस्प्निआचे कारण होऊ शकते.  म्हणून नियमित व्यायाम केल्याने वजन आणि श्वासहीनतेवर ताबा मिळवता येतो.
  • उंच ठिकाणी जाणें टाळणें
     5000 फीटपेक्षा उंच ठिकाणांमध्ये, वातावरणातील प्राणवायू कमी असतो, ज्यामुळे सामान्य लोकांना श्वास घेण्यासाठीही कष्ट करावा लागतो. अश्वा व्यक्तींमधील श्वासहीनता शिगेला पोचू शकते, म्हणून उंच ठिकाणी प्रवास करणें टाळावे.
  • पूरक प्राणवायू
    व्यक्ती नियमित पूरक प्राणवायूवर अवलंबून असल्यास, आवश्यक तेव्हा सिलिंडर बदली करण्याची व उपकरण नीट काम करत असल्याची खात्री करून घ्यावी.

धाप लागणे काय आहे - What is Shortness of Breath in Marathi

श्वासहीनता किंवा डायस्प्निआ सामान्य परिस्थिती असून अंदाजे 25% लोक त्यापासून प्रभावित असतात. व्यक्तीने वैद्यकीय साहाय्य मागण्याच्या किंवा आपत्कालीन चाचणी करून घेण्याच्या काही कारणांपैकी हेसुद्धा एक आहे. कारणाशी अनेक अंतर्निहित परिस्थिती असतात व काही वेळा प्राणघातक आजारांचे ते लक्षण असू शकते. सांप्रत, श्वासहीनतेसाठी रुग्णालयाच्या सेवा मागणार्र्या लोकांबद्दल वास्तविक झटके व परिणामासंबंधी खूप मर्यादित माहिती उपलब्ध आहे. निरोगी लोकांमध्ये, व्यायाम, उंच ठिकाणावर जाणे, तीव्र तापमानांचे अनावरण किंवा लठ्ठपण्यामुळे होणारी किंवा जाणवणारी श्वासहीनता सामान्य असते. यापेक्षा इतर कारणे असल्यास, सामान्य चिकित्सक किंवा तज्ञाला भेट दिलेले बरे राहील.

डायस्प्निआ म्हणजे काय?

अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या संस्थेने केलेल्या संशोधनांनुसार, डायस्प्निआ म्हणजे गहनतेत अंतर असलेल्या विविध संवेदनांसह श्वास घेण्यात गैरसोयीची जाणीव असणें. डायस्प्निआ किंवा श्वसनहीनता किंवा श्वासहीनता  श्वसनाशी संबंध नसलेली परिस्थिती उदा. ब्रॉंकिअल एस्थमा आणि श्वसनसंबंधी परिस्थिती उदा. डायबॅटिक केटोएसिडोसिस यांसारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. दम्याच्या झटका आलेली व्यक्ती किंवा श्वसनघात झालेली व्यक्ती विविध कारणांमुळे श्वासहीनतेची तक्रार करू शकते. त्यांच्य डायस्प्निआचे नेमके कारण ओळखणें वेळखपाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. विशेष करून जेव्हा अनेक अवयव प्रणाली संबंधित असतात, तेव्हा ही प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची होऊन बसते.



संदर्भ

  1. Dominik Berliner, Nils Schneider,Tobias Welte, Johann Bauersachs. [link]. Dtsch Arztebl Int. 2016 Dec; 113(49): 834–845. PMID: 28098068
  2. Mukerji V. Dyspnea, Orthopnea, and Paroxysmal Nocturnal Dyspnea. In: Walker HK, Hall WD, Hurst JW, editors. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 11.
  3. Am Fam Physician. 2012 Jul 15;86(2):173-180. [Internet] American Academy of Family Physicians; Causes and Evaluation of Chronic Dyspnea.
  4. Berliner D, Schneider N, Welte T, Bauersachs J. The differential diagnosis of dyspnea. Deutsches Ärzteblatt International. 2016 Dec;113(49):834. PMID: 28098068
  5. Merck Manual Professional Version [Internet]. Kenilworth (NJ): Merck & Co. Dyspnea
  6. Abernethy AP, Currow DC, Frith P, Fazekas BS, McHugh A, Bui C. Randomised, double blind, placebo controlled crossover trial of sustained release morphine for the management of refractory dyspnoea. . Bmj. 2003 Sep 4;327(7414):523-8. PMID: 12958109

धाप लागणे साठी औषधे

Medicines listed below are available for धाप लागणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for धाप लागणे

Number of tests are available for धाप लागणे. We have listed commonly prescribed tests below: