रोसासिआ - Rosacea in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

रोसासिआ
रोसासिआ

रोसासिआ म्हणजे काय?

रोसासिआ किंवा ॲक्ने रोसासिआ हा एक त्वचेच्या आजाराचा प्रकार आहे जो विशेषतः चेहर्‍याच्या त्वचेला प्रभावित करतो. यात चेहर्‍याला कायमस्शरुपी फ्लश देण्यासाठी केशिका वाढतात. तसेच, कपाळ, गाल आणि हनुवटीवर ॲक्ने सारखे पिवळी मुरूमे होतात. काही ठिकाणी, याला चुकून ॲक्ने समजले जाते; तरी, रोसासिआ ॲक्नेसारखा डाग सोडत नाही याचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे.

ही स्थिती सामान्यतः 30-50 वर्षाच्या वयोगटातील स्त्रियांमध्ये आढळते आणि फ्लश्ड स्किनचे स्वरूप दर्शवते. कायमचा लालसरपणा जशा केशिका वाढतात त्यांच्यासोबत वाढतो. पुरुषांमध्ये, स्थिती नाकावर लालसरपणा देखील दाखवते.

याच्याशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

चेहर्‍यावरील लालसरपणा आणि वारंवार फ्लशिंगद्वारे ही स्थिती ओळखली जाते. काही प्रकरणात, डोळे प्रभावित होतात आणि ब्लडशाॅट आणि ग्रिटी बनतात. इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • कपाळ, गाल आणि हनुवटीवर लालसरपणा.
  • फ्लशिंग.
  • टेंगूळ आणि पसयुक्त मुरूमे.
  • गोरा वर्ण असलेल्यांमध्ये रक्त वाहिन्या दिसणे.
  • खरखरीत आणि असामान त्वचेचा टोन.
  • नाकाच्या त्वचेचा जाडपणा किंवा ऱ्हानोफायमा.
  • चेहर्‍यावर जळजळणारी संवेदना.
  • चेहर्‍यावर डाग.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

स्थिती सामान्यतः चेहर्‍यावर सापडणाऱ्या माइट्समुळे निर्माण होते. इतर घटक ज्यामुळे हा विकार होऊ शकतो ते खालीलप्रमाणे आहेत :

  • रक्तवाहिन्यातील विकृती.
  • कॅफिनेटेड किंवा चहा आणि सूप सारखे गरम पेय.
  • यूव्ही किरणांशी संपर्क.
  • तणाव.
  • रेड वाइन किंवा अल्कोहॉलिक ड्रिंक्स.
  • एक्सट्रिम तापमान.
  • खूप व्यायाम.
  • औषधे.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

शारीरिक तपासणी करून आणि तपशीलवार मेडिकल इतिहास घेऊन रोसासिआचे निदान केले जाऊ शकते. ल्युपस एरिथमॅटोसस यासारखी स्थिती रक्त चाचण्या मधून समजून पडते. म्हणून, डाॅक्टरांच्या भेटीमुळे स्थितीचे मुलभूत कारण ओळखण्यास मदत होऊ शकते.

सामान्य व्यक्ती याची लक्षणे आणि ॲक्ने, सेबोऱ्हैक डर्माटायटीस आणि पेरीओरल डर्माटायटीस च्या लक्षणांमध्ये गोंधळू शकतो

याच्या उपचारामध्ये खालील समाविष्ट आहे :

  • मुलभूत घटक टाळणे.
  • चेहरा नियमित साफ करणे.
  • सनस्क्रीन लोशनचा वापर.
  • फोटोथेरपी.
  • डाॅक्सिसिलिन किंवा मिनोसिलिन सारखे ॲन्टीबायोटीक्स.
  • क्रीम्स आणि लोशन्ससह विशिष्ट उपचार.
  • डायथर्मी.
  • लेझर ट्रीटमेंट.
  • आयसोट्रेटीनाॅइन ॲडमिनिस्ट्रेशन.
  • शस्त्रक्रिया.



संदर्भ

  1. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Rosacea
  2. National Rosacea Society [Internet] St. Barrington, IL; All About Rosacea
  3. National Health Service [Internet]. UK; Rosacea.
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rosacea
  5. Canadian Dermatology Association [Internet]; Rosacea
  6. American Osteopathic College of Dermatology [Internet] Kirksville, Missouri; ROSACEA

रोसासिआ साठी औषधे

Medicines listed below are available for रोसासिआ. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.