पेलाग्रा - Pellagra in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 09, 2019

March 06, 2020

पेलाग्रा
पेलाग्रा

पेलाग्रा काय आहे ?

पेलाग्रा हे आहारसंबंधित विकार आहे जो नियासीन च्या कमतरतेमुळे होतो. हा व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स ग्रुप पैकी एक व्हिटॅमिन आहे.  कमी सेवन केल्याने किंवा पचनातून कमी शोषल्या गेल्याने याची कमतरता होऊ शकते. हा शरीरव्यापी विकार आहे जो त्वचेवर, पचन मार्गावर आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. हे स्नायूं जास्त कार्यरत असल्यामुळे, त्यातील पेशींवर याचा जास्त प्रादूर्भाव दिसून येतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पेलाग्रा चे सामान्य लक्षण साधारणपणे ३डी मध्ये सांगितले जाते, ते म्हणजे डायरिया, डेमेन्शिया आणि डरमिटायटिस. डरमिटायटिस  सनबर्न मूळे होतो आणि उन्हाच्या संपर्कात आल्याने अजून तीव्र होतो. त्वचा लाल होते आणि खाजवते. याचा शरीराच्या दोन्ही भागावर सारख्याच पद्धतीने परिणाम दिसतो. पोटाची लक्षण म्हणजे पोटात त्रास होणे, मळमळ आणि जुलाबा सोबत पाण्यासारखी शी,दुर्मिळ परिस्थितीत रक्त पडणे दिसून येतात.

मज्जातंतूच्या प्रादुर्भावामध्ये गोंधळ, स्मृती भ्रंशनैराश्य आणि कधीकधी भ्रम होतात. परिस्थिती जशी जशी वाढत जाते, व्यक्तीमध्ये बुद्धिभ्रम उन्मत्त होतात आणि उपचार झाले नाही तर तो मरू सुद्धा शकतो.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

पेलाग्रा आहारातील नियासीन च्या कमतरतेमुळे होतो. हे साधारणपणे हैद्राबादमधील गरीब कुटुंबामध्ये आढळून येते ज्यांच्या आहारात मुख्यतः ज्वारीचा उपयोग होतो. ज्वार किंवा मक्यासारखा आहार नियासिन च्या पचनाला विरोध करते. याशिवाय गॅस्ट्रिक परिस्थिती ज्यात पुरेसे सेवन करुनही नियासिन शरीरात शोषले जात नाही पण एक कारण असू शकते . तसेच,दारू पिणे ,काही औषधे आणि यकृताचा कर्करोग या विकारासाठी कारणीभूत असू शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

पेलाग्रासाठी विशिष्ट प्रयोगशाळेतील तपासणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे, निदान, इतिहासावर, भौगोलिक ठिकाण आणि व्यक्तीच्या राहणीमानावर अवलंबून असते. कधीकधी नियासीन च्या अधःपतनामुळे बनणाऱ्या निकामी पदार्थांच्या तपासणीसाठी मूत्राची चाचणी केली जाते.

पेलाग्रा चे उपचार त्याच्या कारणावर उपचार करून होतात.अपुऱ्या आहारामुळे होणाऱ्या पेलाग्राला योग्य आहार घेऊन आणि नियासीन सप्लिमेंट घेऊन बरे करता येते.रुग्णाला काही दिवसात किंवा आठवड्यात बरे वाटू लागते.तरीही, त्वचेच्या समस्यांना बरे व्हायला वेळ लागतो.रुग्णाला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे जसे त्वचेला नियमित मॉइस्चाइज्ड ठेवणे आणि बाहेर जातांना नेहमीच सनस्क्रीन चा वापर करणे. व्यक्तीला त्याच्या लक्षणांप्रमाणे उपचार दिले जातात, तरीही नियासीन शिरेतून दिल्याने काही फायदे दिसून येतात. 4-5 वर्षे जर उपचार मिळाले नाही तर मृत्यू होऊ शकतो.



संदर्भ

  1. Isaac S. The "gauntlet" of pellagra. Int. J. Dermatol. 1998 Aug;37(8):599. PMID: 9732006
  2. Park YK et al. Effectiveness of food fortification in the United States: the case of pellagra. Am J Public Health. 2000 May;90(5):727-38. PMID: 10800421
  3. Pownall HJ et al. Influence of an atherogenic diet on the structure of swine low density lipoproteins. J. Lipid Res. 1980 Nov;21(8):1108-15. PMID: 7462806
  4. Hegyi J, Schwartz RA, Hegyi V. Pellagra: dermatitis, dementia, and diarrhea. Int. J. Dermatol. 2004 Jan;43(1):1-5. PMID: 14693013
  5. Savvidou S. Pellagra: A Non-Eradicated Old Disease. Clin Pract. 2014 Apr 28;4(1):637. PMID: 24847436

पेलाग्रा साठी औषधे

Medicines listed below are available for पेलाग्रा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.