स्मृती भ्रंश - Memory Loss in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

December 08, 2018

March 06, 2020

स्मृती भ्रंश
स्मृती भ्रंश

स्मृती भ्रंश म्हणजे काय?

स्मृती भ्रंश, ज्याला ॲम्नेशिया देखील म्हणतात, विसरण्याचा एक असामान्य प्रकार आहे. एक ॲम्नेसिक व्यक्ती आगामी नवीन कार्यक्रम विसरू शकतात किंवा भूतकाळातील एखादी गोष्ट किंवा कधीकधी दोन्ही विसरतात. वया-संबंधित स्मृती भ्रंश सामान्य आहे आणि तो गंभीर नसतो. याला सेनाइल डिमेंशिया म्हणतात. आपण आपल्या किल्ल्या किंवा छत्री किंवा घड्याळ कुठे ठेवले आहे ते विसरणे म्हणजे स्मृती भ्रंश नसते. जेव्हा तुमची स्मरणशक्ती तुमच्या तर्क, निर्णय, भाषा आणि इतर विचारांच्या कौशल्यांमध्ये व्यत्यय आणते तेव्हा, त्याला डिमेंशिया म्हणून ओळखले जाते. आणि यासाठी डॉक्टरांच्या तपशीलवार अभ्यासाची आवश्यकता असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

स्मृती भ्रंशशी संबंधित सर्वात सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • जुन्या किंवा अगदी अलीकडील गोष्टी विसरणे.
  • विचार करण्याची  क्षमता कमी होणे.
  • निर्णय घेण्यात अडचण.
  • जटिल कार्यात चरणांचे अनुसरण करण्यात अडचण.

याची मुख्य कारणं काय आहेत?

काही प्रमाणात विसरून जाणे ही वयासंबंधित नैसर्गिक घटना आहे. वयासंबंधित नसलेले स्मृती भ्रंशचे कारणे खालील प्रमाणे आहेत:

  • मेंदूच्या कोणत्याही भागास हानी, जे खालील कोणत्याही कारणांमुळे होऊ शकते:
    • ब्रेन ट्यूमर.
    • मेंदूचा संसर्ग.
    • किमोथेरेपी.
    • हायपोक्सिया (मेंदूला कमी ऑक्सिजन पुरवठा होणे).
    • दुखापतीमुळे मेंदूला जबरदस्त धक्का लागणे.
    • स्ट्रोक.
  • मानसिक विकारांमुळे स्मृती भ्रंश जसे की:
    • खूप  तणाव.
    • बायपोलर विकार.
    • नैराश्य.
  • स्मृती भ्रंश डिमेंशियाचे लक्षणे ही देखील असू शकतात:
    • अल्झायमर रोग.
    • फ्रंटोटेंपोरल डिमेंशिया.
    • लेवी बॉडी डिमेंशिया.
  • इतर कारणे जसे :
    • मद्य किंवा अमली पदार्थांचे व्यसन.
    • अपस्मार/ एपिलेप्सी.
    • थायमिनच्या कमतरतेमुळे पोषणाच्या कमतरतेचा विकार कोर्साकॉफ सिंड्रोम होणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

स्मृती भ्रंशाचे निदान करण्यासाठी, डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील. या प्रश्नांची उत्तरे तुमची विचार करण्याची क्षमता आणि स्मृती निर्धारित करतील. पुढील काही चाचण्या स्मृतीच्या हानीचे बरे न होण्यासारखी कारणे ओळखण्यात मदत करतील:

  • विशिष्ट तपासणी किंवा पोषक तत्वांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी.
  • सीटी स्कॅन आणि एमआरआय सारखे ब्रेन इमेजिंग तंत्र.
  • संज्ञानात्मक चाचण्या.
  • लंबर पंचर.
  • सेरेब्रल अँजियोग्राफी.

स्मृती भ्रंशाचे उपचार स्थितीच्या कारणांवर अवलंबून असतात. पौष्टिक कमतरतेच्या बाबतीत पूरकताने  स्मृती भ्रंश नष्ट ठीक करण्याचा प्रयत्न केला जातो. वया-संबंधित आणि अल्झाइमर रोगासारख्या विशिष्ट परिस्थितीमुळे होणारा स्मृती भ्रंश पूर्णपणे ठीक केला जाऊ शकत नाही. संसर्ग असल्यास अॅन्टिमायक्रोबियलच्या मदतीने उपचार केला जाऊ शकतो. तर, व्यसनावर मात करण्याकरिता कौटुंबिक आधार, व्यावसायिक सल्ला आणि मजबूत इच्छाशक्तीची  आवश्यकता असते.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Memory loss (amnesia).
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Memory loss.
  3. Alzheimer's Association [Internet]: Chicago (IL); Mild Cognitive Impairment (MCI).
  4. Small GW. What we need to know about age related memory loss. BMJ. 2002 Jun 22;324(7352):1502-5. PMID: 12077041
  5. U. S Food and Drug Association. [Internet]. Coping With Memory Loss.

स्मृती भ्रंश साठी औषधे

Medicines listed below are available for स्मृती भ्रंश. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.