पोटात सूज - Gastritis in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)

January 27, 2019

April 27, 2023

पोटात सूज
पोटात सूज

सारांश

जठरदाह हे सर्वात सामान्य चयापचयन तंत्राच्या विकारांपैकी एक असे आहे. पोटाच्या आतील भागाच्या रेषेवरील सूज आणि जळजळीमुळे हा दाह होतो.यात पोटाला सूज येते, वेदना होतात, पोटाच्या वरच्या भागात  जळजळ होते, सोबतच हृदयात होणारी जळजळ, ढेकर, खाल्लेल्या अन्नाचे विरुद्ध दिशेने प्रवाहित होणे,मळमळ आणि कधीकधी उलट्यामुळे होणारा त्रासही होऊ शकतो. दीर्घकालीन वेदनाशामक वापर (एनसेड्स), जीवाणूजन्य संसर्ग, धूम्रपान, दारू आणि काही स्वयंप्रतीकार अवस्थेमुळे जठरदाह होऊ शकतो. कधीकधी तो अनेक वर्षांपर्यंत टिकून राहतो.याचे निदान एंडोस्कोपी याद्वारे  केले  जाते. उपचार पर्यायांमध्ये अँटीऍसीड्स, सूक्ष्मजीवरोधक उपचार आणि आहारातील बदल यांचा समावेश आहे.

पोटात सूज ची लक्षणे - Symptoms of Gastritis in Marathi

या जठरदाहाच्या प्रकारावर आधारित लक्षणांमध्ये विविधता दिसून येते. पोटातील आणि छातीच्या मध्यभागी  जळजळ होणे (जळजळ) हे जठरदाहाचे एक सामान्य लक्षण आहे. बर्र्याच लोकांना काही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना अपचनांसारखा अनुभव येऊ शकतो.

जठरदाहच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट होते:

  • पोटाच्या किंवा उदराच्या वरच्या भागामध्ये जळजळीच्या संवेदना होणे.
  • हार्टबर्न (छातीच्या भागात जळणे).
  • अतीप्रमाणात ढेकर येणे.
  • खाल्ल्यानंतर अन्न विरुद्ध दिशेला जाऊन अन्ननलिका किंवा तोंडात येणे.
  • पोट फुगले असल्याची जाणीव होणें.
  • जेवणानंतर पोट पूर्ण भरलेले वाटणे किंवा भारी वाटणे.
  • मळमळ होणें
  • उलट्या होणें.
  • अपचन होणें.
  • भूक न लागणे किंवा कमी होणें.
  • उचक्या येणें.

जठरदाह याची कारणे आणि त्याच्या प्रकारावर अवलंबून असून लक्षणांची तीव्रता भिन्न असू शकते. तरी सुद्धा, जठरदाह याची काही धोकादायक अशीलक्षणे आहेत.आपल्याला खालीलपैकी कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

  • पोटाच्या वरच्या भागात किंवा उदराच्या भागामधे तीव्र वेदना (भोसकल्यासारख्या किंवा दाबून धरल्यासारख्या वेदना).
  • रक्ताच्या उलट्या होणे (हेमाटेमेसिस).
  • गडद किंवा काळे शौच येणें
  • चक्कर येणे किंवा गुंगी येणे.
  • धाप लागणे.
  • अशक्तपणा येणे
  • एकूण निस्तेजपणा येणें

ही लक्षणे गंभीर स्वरुपातील जठरदाह किंवा क्षोभयुक्त प्रकारचा जठरदाह दर्शवितात, ज्यांवर त्वरित उपचार आवश्यक आहे.

पोटात सूज चा उपचार - Treatment of Gastritis in Marathi

सुदैवाने, जठरदाहांच्या बहुतांशी प्रकारांमध्ये प्रभावी सेवा आणि उपचार आहेत. जेव्हा जठरदाह याचे कारण निश्चित केले जाते तेव्हा एक विशिष्ट उपचारपद्धती सामान्यपणे आजार बरा करते. जठरदाह याचा उपचार लक्षणांवर अवलंबून (अँटीऍसीड्स, प्रोटॉन-पंप इनहिबिटर, किंवा एच 2 अवरोधकांचा वापर) आहे आणि निश्चित उपचारांमध्ये प्रतिजैविके किंवा परजीवीरोधक औषधे  समाविष्ट आहेत.

  • आम्लरोधक
    औषधांच्या या प्रकारामधे मॅग्नेशिअम आणि अॅल्युमिनियम ग्लायकोकॉलेट समाविष्ट आहेत, जे पोटातील आम्लाचे निराकरण करते आणि वेदना आणि जळजळ कमी करते. तथापि, त्याने अतिसार किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.
  • प्रोटॉन पंप इनहिबिटर
    औषधांच्या या प्रकारामध्ये पोटाच्या आम्लाचे उत्पादन कमी होते, यामुळे लक्षणे दूर होतात आणि जळजळ किंवा दाह बरा होतो. काही अवरोधक आहेत पँटोप्राझोल, ओमेप्राजोल, रॅबेप्राराझोल आणि एसोमेप्राझोल.
  • एच 2 अवरोधक
    औषधांच्या या प्रकारामुळे पोटाच्या आम्लांचे उत्पादन कमी होते परंतु हे प्रोटोन पंप इनहिबिटरपेक्षा तुलनेने कमी प्रभावी असते. रॅनिटाइडिन, निझाटाइडिन आणि फेमोटाइडिन ही काही उदाहरणे आहेत.
  • प्रतिजैविके
    त्यांचा वापर जीवाणूंच्या वाढीस मारून कमी करणे किंवा थांबविणे यासाठी केला जातो.हे जीवाणू पोटाच्या रेषांना क्षती पोचवतात आणि विशेषतः एच. पिलोरीला नुकसान करतात. त्यात अॅमोक्सिसिलिन, मेट्रोनिडाझोल किंवा क्लॅरीथ्रोमायसीनचा समावेश आहे.

बहुतेक प्रकरणांमध्ये, जीवनशैलीतील बदलांसह संयुक्तपणे उपचार केल्यास जठरदाहाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते.

जीवनशैली व्यवस्थापन

सामान्य जीवनशैलीवर जठरदाह याचा प्रभाव असतो. विशेषतः, गंभीर प्रकारांमध्ये गुंतागुंती होणें टाळण्यासाठी व्यापक सुधारणा आवश्यक आहेत कारण तेव्हा औषधे पुरेशी नसतात. जठरदाहासाठी जीवनशैलीत सुधारणा पुढील प्रमाणें कराव्यातः

  • आहाराचे नियोजन
    आणि वारंवार जेवण घेणे अधिक उत्तम आहे, कारण अधिक जेवण अधिक आम्ल देखील तयार करते आणि पोटाची क्षमतादेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते (अन्नाचे विरुद्ध दिशेला वाहणे होऊ शकते). याव्यतिरिक्त, तुमच्या दोन आहारांदरम्यान अधिक अंतर असल्याने देखील  आम्लांचे उत्पादन होऊ शकते, जे तुमच्या पोटाच्या रेषांना नुकसान करते.
  • प्रोबिओटिक यांचा वापर
    प्रोबिओटिक यांचा वापर सामान्य आतड्यांतील,पचनास उपयुक्त द्रव्ये भरुन काढते आणि जठराचा अल्सर बरे करण्यास मदत करते, तथापि, ते पोटाच्या आम्ल स्रावांवर प्रभाव पाडत नाहीत. दही आणि ताक हे नैसर्गिक प्रोबिओटिक आहेत आणि आहारात त्यांना समाविष्ट केले पाहिजे.
  • मद्यपान टाळा
    मद्य पोटाच्या रेषांना त्रास देणारे म्हणून ओळखले जाते.
  • धूम्रपान टाळा
    धूम्रपान हे ज्ञात घटकांपैकी एक आहे जे पोटात आम्ल स्राव वाढवते.
  • मसालेदार पदार्थ टाळा
    मसालेदार किंवा इतर त्रासदायक आहारामुळे पोटातील आम्लांचा स्राव वाढू शकतो आणि आतील रेषा क्षतिग्रस्त होतात.
  • वेदना व्यवस्थापन
    वैकल्पिक किंवा इतर सुरक्षित वेदनाशामक उपाय किंवा औषधे पोटातील आम्ल स्राव कमी करण्यात मदत करतात.
  • वजन व्यवस्थापन
    वजन कमी करणे किंवा आपण आदर्श शरीर-भार सूचकांक(बीएमआय) प्राप्त करणे गंभीर जठरदाहाची तीव्रता कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्याने समृद्ध असलेले आहार फायद्याचे ठरू शकतात.
  • ताण व्यवस्थापन
    ताण हा आणखी एक घटक आहे जो पोटाचा आम्ल स्राव वाढवू शकतो. योगासनांसह श्वसनाचे योग्य तंत्र आणि ध्यान आपले ताण व्यवस्थापन करण्यात उपयुक्त ठरू शकते.
Kalpura Acidity Gastritis Ark
₹344  ₹492  30% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Gastritis.
  2. National Health Service [Internet]. UK; Gastritis.
  3. Kulnigg-Dabsch S. Autoimmune gastritis. Wiener Medizinische Wochenschrift (1946). 2016;166(13):424-430. PMID:27671008.
  4. Nimish Vakil; Erosive Gastritis. The Merck Manual Professional Version [internet]. US.
  5. Rugge M, Meggio A, Pennelli G, Piscioli F, Giacomelli L, De Pretis G, Graham DY. Gastritis staging in clinical practice: the OLGA staging system. . Gut. 2007 May;56(5):631-6. Epub 2006 Dec 1. PMID: 17142647.
  6. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Gastritis.
  7. Digestive Disease Center [Internet]; Medical University of South Carolina: Gastritis.
  8. Merck Manual Consumer Version [Internet]. Kenilworth (NJ): Merck & Co. Inc.; c2018. Gastritis.
  9. Genta RM. The gastritis connection: prevention and early detection of gastric neoplasms. J Clin Gastroenterol. 2003 May-Jun;36(5 Suppl):S44-9; discussion S61-2. PMID: 12702965.
  10. Nimish Vakil; Overview of Gastritis. The Merck Manual Professional Version [internet]. US.

पोटात सूज साठी औषधे

Medicines listed below are available for पोटात सूज. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.