नाक तुटणे - Fractured Nose in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 30, 2018

March 06, 2020

नाक तुटणे
नाक तुटणे

नाक तुटणे म्हणजे  काय ?

नाक तुटणे म्हणजे नाकातील हाड किंवा दोन्ही बाजूला तुटणे होय. नाकाच्या हाडाचा अस्थिभंग हा चेहऱ्याच्या  इतर भागातील अस्थिभंगासोबत होतो. नाकाच्या हाडाच्या अस्थिभंगामुळे नाकातून रक्त बाहेर येऊ शकते, जे नाकामध्ये जमा झाल्यामुळे नाकामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

डोक्याला किंवा बाजूला मार लागल्यामुळे नाकाचे हाड तुटू शकते. बाजूला आघात झाल्यास, नाक आपल्या जागेवरून बाजूला सरकते. डोक्याला आघात झाल्यास, नाकाचे हाड वरती ओढले जाते आणि बाजूला पसरते, त्यामुळे नाकाचा आकार रुंद होतो.

याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?

नाकाच्या अस्थिभंगाची लक्षणे खालील प्रमाणे आहे:

याचे मुख्य कारणे काय? 

नाकाचे हाड आणि कार्टिलेज हे चेहऱ्यावर ठळक भागात असल्यामुळे अस्थिभंगासाठी जास्त संवेदनशील असते.

नाकाच्या हाडाचा अस्थिभंग हा सामान्यपणे आघातामुळे होऊ शकतो, त्याची सामान्य कारणे खालील प्रमाणे आहे:

  • मारामारी, अपघात आणि खेळ.
  • मोटरसायकल चा अपघात.
  • नाकावर पडणे.

नाकाच्या अस्थिभंगामुळे खालील गुंतागुंत होऊ शकते:

  • चेहऱ्याची ठेवण बदलते/ खराब होते.
  • दीर्घकाळापासून असणाऱ्या नाकाच्या जागेची ठेवणं बिघडते.
  • सेरेब्रोस्पायनल फ्लुईड (सीएसएफ) बाहेर पडते.
  • डोळ्याजवळ सूज येणे.
  • नाकात  अडथळा निर्माण  होते.

याचे उपचार  आणि निदान कसे  होते?

नाकाच्या हाडाच्या अस्थिभंगाची लक्षणे दिसल्यावर, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर नाकाची आतून आणि बाहेरून पूर्ण तपासणी करतील. ही तपासणी करताना कदाचित त्रास होऊ शकतो. डॉक्टर अस्थिभंगाची जागा आणि तीव्रता लक्षात घेण्यासाठी एक्स- रे काढायला सांगू शकतील. गंभीर स्वरूपाच्या अस्थिभंगाच्या केसेस मध्ये सिटी स्कॅन ची गरज पडू शकते.

तुम्हाला वैद्यकीय मदत मिळे पर्यंत तुम्ही 15 मिनिटे थंड पॅकने शेका आणि प्रत्येक 1-2 तासाने हीच प्रक्रिया परत करा. वेदना घरगुती/ सामान्य औषधाने कमी होऊ शकते. इजा किती गंभीर आहे यावरून,  नाक बंद झाले आहे की उघडे आहे हे ठरवता येते. जर यावर उपचार केले नाही तर, नाकाच्या हाडाच्या तुटण्यामुळे नाकाच्या अखंड रचनेत बदल होईल आणि त्यामुळे चेहरा खराब दिसेल आणि श्वास घ्यायला त्रास होईल.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Nose fracture
  2. British Association of Oral & Maxillofacial Surgeons. Nasal Fracture. Royal College of Surgeons of England. [internet].
  3. Otolaryngology Online Journal. Fracture Nasal Bones. An International Journal of Medical Sciences. [internet].
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Nasal fracture: aftercare
  5. Health Link. Broken Nose (Nasal Fracture). British Columbia. [internet].