कान बंद होणे - Blocked Ear in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 28, 2018

July 31, 2020

कान बंद होणे
कान बंद होणे

कान बंद होणे म्हणजे काय?

कानाचा मध्य भाग नाकाच्या मागच्या भागाला युटाचियन ट्युब नावाच्या नळीने जोडलेला असतो. या नळीमध्ये जर काही अडथळा आला तर कान बंद होतो. अशावेळी, कान भरल्यासारखा आणि कानावर दबाव आल्यासारखा वाटतो. ही नळी बंद होण्याची अनेक कारणं आहेत जसे की कानात संसर्ग झाल्यामुळे मळ तयार होणे किंवा इयर प्रेशर मध्ये अचानक बदल होणे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कान बंद झाल्यास खालील लक्षणे दिसून येतात:

  • चक्कर येणे.
  • खोकला.
  • कान दुखणे आणि कान भरल्यासारखे वाटणे.
  • जो कान बंद आहे तो खाजवणे.
  • कानातून डीसचार्ज होणे किंवा घाण वास येणे.
  • कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय कानात रिंग सारखा आवाज येणे (टिनिटस) किंवा पॉपिंगचा आवाज येणे.
  • जो कान बंद आहे त्याची ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा ऐकण्यास त्रास होणे आणि ही स्थिती अधिकच खराब होत जाणे.

जर एखादया व्यक्तीचा कान दुखत असेल किंवा कमी ऐकू येत असेल, तर डॉक्टर्स आधी कानाचा पडदा खराब होण्यासारखी इतर कारणे वगळतात ज्यांना त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कानाच्या बाहेरील भागावर त्वचेचे आवरण असते ज्यामध्ये मळ बनविणाऱ्या ग्रंथी असतात.आतील खोल भाग, जसे कि कानाचा पडदा, याचे संरक्षण या मळापासून तसेच बारीक केसांपासून होते जे धूळ आणि इतर बाहेरील कणांना आत जाऊ देत नाही. जेव्हा नवीन मळ तयार होतो तेव्हा आतील थोडासा मळ बाहेर म्हणजे कानाच्या छिद्राजवळ फेकला जातो. पण, जर खूप जास्त प्रमाणात मळ तयार झाला किंवा कान व्यवस्थित स्वच्छ नाही झाला, तर तो साठून राहतो. यामुळे कान बंद होतो. जी लोक बॉल पॉईंट पेन आणि पिना इ.च्या साहाय्याने कान साफ करतात त्या लोकांमध्ये ही समस्या दिसून येते. कान बंद होण्याचे इतर काही कारणं अशी आहेत:

  • सायनस संसर्ग, सर्दी किंवा ॲलर्जी मुळे युटाचियन ट्युब वर सूज येणे.
  • द्रव साचणे.
  • कानात संसर्ग होणे.
  • गाडी चालविताना किंवा विमानात प्रवास करताना दबावात बदल होणे.  

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ऑटोस्कॉप नावाच्या एका साधनांद्वारे कान बंद झाल्याचे निदान केले जाते. यात प्रकाशचा वापर होतो आणि आतला कान आकारात मोठा दिसतो, त्यामुळे डॉक्टरांना कान तपासणे सोपे होते.

कान बंद झाल्यावर हे उपचार केले जातात:

  • युटाचियन ट्युब जर सर्दीमुळे किंवा उंचावर गेल्यामुळे बंद झाली असेल, तर खालील उपाय करावेत:
    • शुगर-फ्री चुईंग गम खावे किंवा गिळावे, जांभई दिल्यामुळे सुद्धा युटाचियन ट्युब मोकळी होते.
    • जर वरील उपाय काम करत नसेल तर परत नाक बंद करा, तोंड बंद ठेवा आणि हळू हळू श्वास घेण्याचा प्रयत्न करा. पॉपिंग आवाज आला म्हणजे ट्युब मोकळी झाली आहे.
  • जर कान कॅनाल मधील मळामुळे बंद झाला असेल, तर खालील उपाय करावेत:
    • क्यूरेट नावाच्या एका लहान आणि वक्र साधनाच्या साहाय्याने डॉक्टर अतिरिक्त मळ काढतात.
    • सक्शन प्रेशर चा वापर करून सुद्धा अतिरिक्त मळ काढू शकतात.
    • पिक किंवा रबरी-बल्ब सिरिंज कोमट पाण्याने भरून डॉक्टर मळ काढू शकतात.
    • जर वारंवार मळ होत असेल, तर डॉक्टर मळ-काढणारी औषधे देतात, ज्याने मळ वितळतो आणि नंतर कॉटन इयर बड ने कान साफ केला जातो.
  • ज्या व्यक्तींना ॲलर्जी होते,त्यांना स्टिरॉइड औषधे नाकात टाकायला दिली जातात, किंवा डीकन्जेसटंट्स दिले जातात (पोटात घ्यायला किंवा नाकात टाकायला), त्यामुळे आपोआपच अडथळा कमी होतो.
  • संसर्ग झाला असेल तर, अँटीबायोटिक्स  दिली जातात.
  • कधी कधी युटाचियन ट्युब मोकळी करण्यासाठी शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ear - blocked at high altitudes
  2. HealthLink BC [Internet] British Columbia; Blocked Eustachian Tubes
  3. Baylor College of Medicine is a health sciences university. Eustachian Tube Dysfunction. Texas; [Internet]
  4. Llewellyn A, Norman G, Harden M, et al. Interventions for adult Eustachian tube dysfunction: a systematic review.. Southampton (UK): NIHR Journals Library; 2014 Jul. (Health Technology Assessment, No. 18.46.) Chapter 1, Background.
  5. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Middle ear infection: Overview. 2009 Jun 29 Middle ear infection: Overview.