श्वासाची दुर्गंधी - Bad Breath in Marathi

Dr Razi AhsanBDS,MDS

January 27, 2019

March 06, 2020

श्वासाची दुर्गंधी
श्वासाची दुर्गंधी

सारांश

तोंडाची दुर्गंधी म्हणजे श्वासोच्छवासाच्या वेळी तोंडातून बाहेर पडणारा तीव्र दुर्गंध आहे.वैद्यकीय परिभाषेत तोंडाच्या दुर्गंधीला हेलिटोसिस किंवा ओरल मालोडर म्हणून ओळखतात.कुठल्याही स्रोतापासून का असेना ,शरीरातून(तोंडातून किंवा शरीरातून) येणाऱ्या दुर्गंधीला हेलिटोसिस म्हणतात.परंतु ओरल मालोडर म्हणजे तोंडावाटे श्वासोच्छवासाची दुर्गंधी येणे होय. संशोधकांचा असा अनुमान आहे की तोंडाची दुर्गंधी जगभरात मोठ्या प्रमाणातील लोकांना प्रभावित करते.दुर्गंधी बर्र्याचदा दुर्लक्षित केली जाते आणि त्यामुळे पीडित लोक लक्षणीय रीत्या मानसिक आणि सामाजिक अंपंगत्वाला सामोरे जातात. तोंडाच्या दुर्गंधीचे सर्वात सामान्य कारण जींजीवलसारखे सूक्ष्मजीव आहेत जे सामान्यत: आपल्या हिरड्यांवर व जिभेवर एक थर बनवतात. सुदैवाने, तोंडाची योग्य स्वच्छता आणि डॉक्टरांनी विहित केलेली विशिष्ट औषधे बहुतांश वेळा ओरल मालाडोरपासून पूर्णपणे बरे करण्यात यशस्वीपणे मदत करतात.

तुम्हाला ही माहिती आहे काय?

पुरुष आणि महिलांना समान प्रमाणांमध्ये तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होतो,परंतु अभ्यासांवरून दिसून येते की स्त्रिया पुरुषांपेक्षा आधी मदत आणि उपचार घेतात.डॉक्टरांनी असा दावा केला आहे की दुर्गंधी कमीत कमी वैद्यकीय सेवा घेऊन ही बरी होते. तथापि काही अंतर्भूत वैद्यकीय आजारांमुळे देखील शरीर आणि तोंडाला दुर्गंध येऊ शकतो.म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, जर 15 दिवसांपेक्षा जास्त काळापूर्वी पासून सतत तोंडाला दुर्गंध येत असेल,तर कृपया तत्काळ दंतचिकित्सक किंवा नाक-कान-घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

श्वासाची दुर्गंधी (तोंडाची दुर्गंधी) काय आहे - What is Halitosis (bad breath) in Marathi

तोंडाचा दुर्गंध ही एक सर्वसामान्य स्थिती आहे जी मुख्यत्त्वे जीवाणू आणि इतर वैद्यकीय कारणांमुळे होते. त्यामुळे  बोलताना किंवा हवा बाहेर निघताना मौखिक पोकळीतून (तोंडातून) दुर्गंधी येते. असे दिसून आले आहे की दुर्गंधीची तीव्रता दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, सकाळी दुर्गंधी होऊ शकते परंतु संध्याकाळी दुर्गंध निष्प्रभ होऊ शकतो. संशोधकांचा असा दावा आहे की, तोंडाच्या विकारांची अनेक थेट कारणे आहेत.तणाव, उपवास, विशिष्ट पदार्थांचे सेवन (लसूण, कांदे, मांस, मासे आणि चीझ) ही ती कारणे आहेत ज्याने दुर्गंध निर्माण होतो. याव्यतिरिक्त, धूम्रपान आणि मद्यपानसुद्धा त्यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. सामान्यतः, आपल्या सकाळच्या श्वसनात दुर्गंधी असते कारण,तोंड रात्री कोरडे आणि निष्क्रिय असते ज्याने सूक्ष्म जीव वाढतात व आपले कार्य सिद्धीस नेतात. परंतु मौखिक विकार एक दीर्घकालीन आजार आहे,ज्याची काळजी करणे व दंतोपचार करणे आवश्यक आहे.

श्वासाची दुर्गंधी (तोंडाची दुर्गंधी) ची लक्षणे - Symptoms of Halitosis (bad breath) in Marathi

या विकाराचे लक्षण म्हणजे दुर्गंधी ही ओळखता येण्याइतकी वेगळी असते. दुर्गंधीचे भिन्न स्त्रोत आहेत ज्यात सडलेले मांस, कुजलेले अन्न,किंवा इतर अप्रिय गंध यांचा समावेश आहे. व्यक्ती हवा आत घेत असताना किंवा बाहेर टाकत असताना गंध जणवतो. जवळ उभी असलेली व्यक्ती तुम्ही बोलताना, शिंकताना किंवा खोकताना दुर्गंधी अनुभवते.

डॉक्टरांना कधी भेटावे?

तुम्हाला खाली दिलेली चिन्हे वा लक्षणे दिसत असल्यास दंतचिकित्सकाला भेटा. पेरीओडेंटिस्टला प्राथमिकता द्यावी, कारण ते हिरड्यांच्या समस्या, तोंडाच्या श्लेष्माच्या समस्या आणि तोंडाच्या सौम्य तंतूंच्या समस्या हाताळतात.

जर आपल्याला खलीलपैकी अनुभव आला असेल तर पेरीओडेंटिस्टला भेटा:

 • तीव्र घाणेरड्या दुर्गंधीचा श्वास..
 • आपल्या दात किंवा हिरड्यांवर दृश्यमान पांढरे कोटिंग.
 • धातूचा स्वाद.
 • हिरड्यांमधे रक्तस्त्राव.
 • तोंडात कमी प्रमाणातील लाळ असणें.

श्वासाची दुर्गंधी (तोंडाची दुर्गंधी) चा उपचार - Treatment of Halitosis (bad breath) in Marathi

मुखवासाचे उपचार म्हणजे टप्प्या टप्प्याने अडचणींवर उपाय करून निराकरण करण्याची प्रक्रिया आहे.मुखवासाचे उपचार सुरू करण्यापूर्वी दंतचिकित्सकाने मुखवासाचे स्रोत काळजीपूर्वक शोधण्याकडे लक्ष दिले पाहिजे.तोंडातून आणि नाकातून येणार्र्या गंधाची तुलना करून दुर्गंधीचे स्त्रोत तोंडात आहे की नाही हे लगेच कळते. स्त्रोत,नाक किंवा इतर अवयवात असल्यास तातडीने संबंधित अवयवांच्या तज्ञ डॉक्टरला भेटा.तोंडातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीवर दंतचिकित्सा आवश्यक असते. तोंडातील दुर्गंधीच्या उपचारांसाठी मानक आणि नेमकी उपचारपद्धत नाही.तथापि, संभाव्य पद्धतींमध्ये मान्यताप्राप्त दंतोपचार आणि कवळीचे उपचार समाविष्ट असतात.

तोंडाचा दुर्गंधखालील प्रमाणे हाताळता येईल;

 • तोंडाची स्वच्छता आणि कवळीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूलभूत दंत स्वास्थ्य पद्धतींद्वारे सूक्ष्मजीव (जीवाणू) कमी करा. मौखिक सिंचन, सोनिक आणि अल्ट्रासोनिक टूथब्रशसारख्या प्रगत स्वच्छता पद्धतींचा समावेश करा.
 • तोंडाची उत्तम स्वच्छता राखल्यावरही दुर्गंध कायम राहिल्यास, आपली जीभ स्वच्छ केली पाहिजे.
 • 0.2% क्लोरीएक्सिडाइन असलेले, तोंड धुण्याचे द्रव्य,उदाहरणार्थ लिस्टरिनचा वापर तोंडातील जंतूचा थर कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तथापि त्यांच्या दीर्घकालीन वापर केल्यास परिणाम अनिश्चित असतात आणि दातांवर डाग पडण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
 • तोंडाच्या दुर्गंधीसाठी आणखी एक उपचारयोजना म्हणजे विविध धातूंच्या आयनचा वापर करुन व्हीएससीमध्ये रुपांतर करणे ही आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी 'जस्त' हे अधीक वापरण्यात येणारे आयन आहे. हलीता, 0.05% क्लोर्हेक्सीडिन असलेले नवे औषधीद्रव्य आहे जे अल्कोहोलरहित आहे व वर उल्लेख केलेल्या तोंड धुण्याच्या द्रव्यांपेक्षा अधिक प्रभावी आहे.


संदर्भ

 1. Yaegaki K1, Coil JM. Genuine halitosis, pseudo-halitosis, and halitophobia: classification, diagnosis, and treatment. Compend Contin Educ Dent. 2000 Oct;21(10A):880-6, 888-9; quiz 890. PMID: 11908365.
 2. Touyz LZ1. Oral malodor--a review. J Can Dent Assoc. 1993 Jul;59(7):607-10. PMID: 8334555.
 3. Bahadır Uğur Aylıkcı, Hakan Çolak. Halitosis: From diagnosis to management. J Nat Sci Biol Med. 2013 Jan-Jun; 4(1): 14–23. PMID: 23633830.
 4. National Health Service [Internet]. UK; Bad breath.
 5. Walter J. Loesche, Christopher Kazor. Microbiology and treatment of halitosis. First published: 09 July 2002; periodontology 2000, vol. 28, 2002, 256-279 [Internet].

श्वासाची दुर्गंधी साठी औषधे

Medicines listed below are available for श्वासाची दुर्गंधी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.