एओर्टिक स्टेनॉसिस - Aortic Stenosis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 27, 2018

March 06, 2020

एओर्टिक स्टेनॉसिस
एओर्टिक स्टेनॉसिस

एओर्टिक स्टेनॉसिस काय आहे?

एओर्टिक स्टेनॉसिस ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदयातील महाधमनी म्हणजेच सर्वात मोठी रक्तवाहिनी अरुंद होते. स्टेनॉज्ड ऑरोटा रक्त भिसरण कठिण करते आणि हृदयापासून रक्त प्रवाह रोखते. यामुळे हृदयाच्या स्नायूंचा जाडपणा वाढू शकतो आणि त्यावर अतिरिक्त भार येऊ शकतो यामुळे हृदय बंद पडू शकते. 65 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये स्टेनॉसिसचे अनुमानित प्रमाण 7% पर्यंत असू शकते आणि पुरुषांमध्ये (80%) अधिक सामान्य आहे. मुलींपेक्षा, मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. भारतामध्ये कोणताही व्हॉल्व विकार होण्याची शक्यता 2.8% आहे, ज्याच्यामध्ये एओर्टिक स्टेनॉसिसचे प्रमाण 0.4% आहे.

एओर्टिक स्टेनॉसिसची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वय आणि ब्लॉकेजच्या तीव्रतेनुसार लक्षणं वेगळी असू शकतात. आजाराची तीव्रता वाढल्यावर रुग्णांना काही लक्षणं जाणवू शकतात ज्यामध्ये रक्तप्रवाह थोडा मर्यादित होऊ शकतो जे चिंताजनक असू शकत.

गंभीर स्टेनॉसिस मध्ये खालील चिन्हं आणि लक्षणं असू शकतातः

लहान बाळांमध्ये जेवण्याची समस्या असू शकते किंवा त्यांचे वजन वाढू शकत नाही. त्यांना थकवा जाणवणे आणि श्वासोच्छवासाची समस्या देखील होऊ शकते, जी जन्मल्या पासून  किंवा काही आठवड्यात विकसित होते. ही स्थिती बाळाच्या वाढत्या वयासोबत सौम्य किंवा मध्यम स्टेनॉसिससह तीव्र होऊ शकते आणि त्यांना जीवाणूंच्या संसर्गाचा धोका देखील असू शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हा जन्मतः उद्भवू शकतो किंवा ते वाढू शकतो.

  • जन्मजात
    • एओर्टिक व्हॉल्वज मध्ये व्यंग्य हे बालपणातील एओर्टिक स्टेनॉसिस चे कारण असू शकते.
    • यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकत नाहीत, परंतु वाढत्या वयात व्हॉल्व अरुंद होऊ शकतात किंवा त्यातून गळती होऊ शकते, यामुळे यावर उपचार करणे किंवा बदल करणे कठिण होऊ शकते.
  • उपार्जित
    • प्रौढांमध्ये, हे स्ट्रेप्टोकोकल संक्रमणामुळे (संधिवातातील ताप) व्रण होऊन आणि शेवटी स्टेनॉसिस होऊ शकतं.
  • कॅल्शियम बिल्ड-अप
    • व्हाल्वच्या आजूबाजूला कॅल्शियमचे साचणे स्टेनॉसिसला कारणीभूत ठरू शकते.
    • हे बाहेरून सेवन केलेल्या कॅल्शियम शी संबंधित असू शकत नाही.
    • छातीचे रेडिएशन कॅल्शियमचे प्रमाण वाढवू शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

स्टेथोस्कोपने जाणवणारे हृदयाची घरघर, अंतःश्वास वर्ण किंवा असामान्य ध्वनी, मंदावलेले ठोके, मानेपासून ठोक्यांमध्ये झालेला बदल हे असामान्य रक्तवाहिन्यांचे मुख्य संकेत आहेत. रक्तदाब कमी असल्याचे आढळते.

आपल्या डॉक्टरांद्वारे खालील चाचण्या केल्या जाऊ शकतात:

  • छातीचा एक्स-रे.
  • इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी).
  • व्यायाम स्ट्रेस टेस्ट.
  • डाव्या हृदयाच्या कॅथीटेरायझेशन.
  • हृदयाचे चुंबकीय अनुकंपन इमेजिंग (एमआरआय).
  • ट्रान्सोसोफेजल इकोकार्डियोग्राम (टीईई).

आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून उपचार दिले जातात. हृदयाची विफलता किंवा हृदयाची अनियमित लय यावर उपचार करण्यासाठी प्रामुख्याने औषधं निर्धारित केली जातात. रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे. जर एखाद्याला दंत प्रक्रिया किंवा  कोलोनोस्कोपी करावी लागणार असेल, तर हेल्थकेअर तज्ञांकडून अँटीबायोटिकचा वापर करण्यापूर्वी तपासून घेणे चांगले आहे. रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर बॅक्टेरियल एंडोकार्डिटिस टाळण्यासाठी मुलांना अँटीबायोटिक्सचा सल्ला दिला जाऊ शकतो. सामान्यतः लक्षणं दिसणाऱ्या प्रौढ किंवा मुलांवर व्हाल्व उपचाराची  किंवा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते. यांत्रिक व्हाल्व बसवलेल्या रुग्णांना व्हाल्वमध्ये गुठळ्या तयार न होऊ देण्यासाठी रक्त पातळ करण्याची औषधं घेण्याची आवश्यकता असू शकते. शस्त्रक्रिया करण्याऐवजी किंवा त्यापूर्वी वाल्वुलोप्लास्टी नावाची कमी आक्रमक औषधं न वापरता आजार कमी करण्यासाठी हे करू शकता:

  • जिकरीचे किंवा स्पर्धात्मक खेळ टाळणे.
  • धूम्रपान सोडणे.
  • कोलेस्ट्रॉल चाचणी करणे.
  • रक्त गोठण्याच्या परिस्थितीचे परीक्षण करणे.
  • नियमित तपासणी करणे.

उपचारांसह जीवनशैलीतील बदलांनी एओर्टिक स्टेनॉसिसची तीव्रता कमी केली जाऊ शकते.



संदर्भ

  1. Open Access Publisher. Aortic Valve Stenosis. [internet]
  2. Nath, Kumar NN. Valvular Aortic Stenosis: An Update. (2015). J Vasc Med Surg 3: 195.
  3. American Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: Problem: Aortic Valve Stenosis
  4. niversity of Rochester Medical Center [Internet]. Rochester (NY): University of Rochester Medical Center; Aortic Stenosis in Children
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Aortic stenosis