गुदाशयाचा कर्करोग (गुदाशयाचा कॅन्सर) - Anal Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 21, 2018

March 06, 2020

गुदाशयाचा कर्करोग
गुदाशयाचा कर्करोग

गुदाशयाचा कॅन्सर म्हणजे काय?

गुदाशयाचा कर्करोग हा गॅस्ट्रोइंटेस्टेनल सिस्टिमचा दुर्मिळ आजार आहे. गॅस्ट्रोइंटेस्टेनल कर्करोगा त याची टक्केवारी (1.5%) कमी आहे, परंतु ही वाढण्याची शक्यता आहे. गुदाशयाचा कर्करोग हा गुदा किंवा गुदा कॅनल, किंवा रेक्टमच्या शेवटच्या भागाला होतो.

गुदशयाच्या कॅन्सरची मुख्य लक्षणे व चिन्हे काय आहेत?

  • सर्वसामान्य लक्षणे आणि चिन्हे :
    • गुदाशयातून रक्त येणे आणि वेदना होणे.
    • फिस्ट्युला असणे(गुदा कॅनल आणि नितंब च्या त्वचे च्या मध्ये असामान्य अरुंद टनल असणे) किंवा ल्यूकोप्लाकिआ असणे (पांढरा, जाड, नॉन-स्क्रॅपेबल पॅच).
    • शारीरिक तपासणी दरम्यान सहज लक्षात येणारे सुजलेले लिम्फ नोड्स.
    • गुदाशयाच्या मार्जिन चा कर्करोग ज्यामध्ये एक विशिष्ट अल्सर जो उलटा, कठोर (कडक झालेला) आणि त्याच्या कडा वाढलेल्या दिसून येतो.
  • असामान्य लक्षणं आणि चिन्हं:
    • गुदाशयाच्या क्षेत्रात मास असणे.
    • स्त्रावासोबत प्रुरायट्स किंवा खाज येणे.
    • मल विसर्जण नियंत्रित करणार्‍या वर्तुळाकार स्नायू (स्फिंक्टर) चे नीट कार्य न करणे, ज्यामुळे गुदाशय असंतुलित होते.
    • यकृत मोठे होणे.
    • प्राथमिक गुदाशयाचा कर्करोग इतर ठिकाणी पसरणे.

गुदाशयाच्या कर्करोगाची मुख्य करणं काय आहेत?

  • सर्वात सामान्य कारणं
    ह्युमन पॅपिलोमाव्हायरस चा संसर्ग, एक लैंगिक संसर्ग रोग, जो गुदाशयाच्या कॅन्सरशी जास्त निगडित असतो.
  • रिस्क फॅक्टर्स खालील प्रमाणे आहेत:
    • कमकुवत प्रतिकार शक्ती
    • वय आणि लिंग
      वयस्कर लोकांमध्ये आणि महिलांमध्ये हे जास्त सामान्य आहे.
    • वैद्यकीय स्थिती
    • जीवनशैली
      • धुम्रपान.
      • एकापेक्षा अधिक जोडीदाराशी संभोग करणे.
      • समलैंगिकता, विशेषत: पुरुषांमध्ये.

गुदाशयाच्या कॅन्सरचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • निदान
    गुदशयाच्या कॅन्सरचे निदान फक्त क्लिनिकल तपासण्या आणि लक्षणांवर होऊ शकत नाही.ट्यूमर च्या चाचणी साठी भूल देऊन शारीरिक तपासणी सोबत डॉक्टर कॅन्सर चे निदान करण्यासाठी खालील काही टेस्टस सुद्धा करायला सांगू शकतात:
    • एन्डो-ॲनल अल्ट्रासाउंड इमेजिंग
    • मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (एमआरआय).
    • कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन /पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन.
  • उपचार
    • गुदाशय कॅन्सरच्या बहुतेक रुग्णांसाठी प्राथमिक उपचार हा किमोथेरपीसह किंवा त्याशिवाय रेडिओथेरपी असू शकतो. वयस्कर आणि अशक्त रुग्णांसाठी, किमोथेरपी आणि अँटीबायोटिक प्रोफीलॅक्सिस मध्ये सुधारणा करणे आवश्यक असते.
    • रेडिओथेरपी चे नुकसान म्हणजे रेडिओनेक्रोसिस (रेडिएशन मुळे ऊतकाचे नुकसान किंवा मृत होते) ज्यामुळे उपचारासाठी शस्त्रक्रिया करणे जास्त सुरक्षित ठरु शकते.अग्रेसिव्ह कॅन्सर साठी ॲब्डॉमिनोपेरिनियल एक्सीशन (गुदशय ,किंवा कोलन किंवा रेक्टम चा भाग काढणे) किंवा पुनरावृत्ती च्या अधिक शक्यता असलेल्या किंवा छोट्या ट्युमरसाठी लोकल एक्सीशन करून गुदशयाच्ता कॅन्सरचा उपचार करु शकतात.
    • इंग्विनल लिम्फ नोड्स चा उपचार करण्यासाठी रेडिएशन थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. जर रेडिएशन थेरपी अयशस्वी झाली तर लिम्फ नोडस् साठी शस्त्रक्रिया करावी लागते.
    • पुनरावृत्ती होणाऱ्या गुदशयाच्या कॅन्सर साठी कॉलॉस्टोमी(कोलन काढणे) सोबत ॲब्डोमिनोपेरिनियल रिसेक्शन करावे लागू शकते.
    • इंट्रा-ऑपरेटिव्ह रेडिओथेरपी आणि ब्रॅकीथेरपी (रेडिओएक्टिव्ह इम्प्लांट्स टाकणे) गुदशयाच्या कॅन्सर च्या पुनरावृत्तीची शक्यता कमी करते.
    • इतर उपचारांमध्ये फोटोडायनॅमिक (एखाद्या विशिष्ट वेव्हलेंथ चा लाईट वापरणे) आणि इम्युनोथेरपी चा वापर केला जाऊ शकतो.

 



संदर्भ

  1. Dr. Sajad Ahmad Salat, Dr. Azzam Al Kadi. Anal cancer – a review. Int J Health Sci (Qassim). 2012 Jun; 6(2): 206–230. PMID: 23580899
  2. Americas: OMICS International. Anal Cancer . [internet]
  3. Robin K.S Phillips,Sue Clark. Colorectal Surgery. Elsevier Health Sciences, 2013;346 pages
  4. Mayo Foundation for Medical Education and Research. Anal cancer.[internet]
  5. Cancer Reserch UK. [internet];Risks and causes of anal cancer

गुदाशयाचा कर्करोग (गुदाशयाचा कॅन्सर) चे डॉक्टर

Dr. Anil Heroor Dr. Anil Heroor Oncology
22 Years of Experience
Dr. Kumar Gubbala Dr. Kumar Gubbala Oncology
7 Years of Experience
Dr. Patil C N Dr. Patil C N Oncology
11 Years of Experience
Dr. Vinod Kumar Mudgal Dr. Vinod Kumar Mudgal Oncology
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या