गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव (ॲब्नॉर्मल यूटेरिन ब्लीडिंग) - Abnormal Uterine Bleeding in Marathi

Dr. Ayush Pandey

November 27, 2018

October 28, 2020

गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव
गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव

गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव(ॲब्नॉर्मल यूटेरिन ब्लीडिंग)म्हणजे काय?

नियमित मासिक पाळीच्या व्यतरिक्त स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव होणे,मासिक पाळी मधील अंतर कमी होणे आणि पाळी दरम्यान दीर्घ रक्तस्त्राव हे सर्व गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्रावाचे लक्षणं आहेत.

सर्व स्त्रियांचा अचूक तारखेला मासिक धर्म येत नसल्यामुळे, दोन पाळ्यांच्या दरम्यान 21ते 35 दिवसांचे मर्यादित अंतर नॉर्मल मानले जाते . जर ही मर्यादा ओलांडली गेली किंवा मर्यादेच्या आधीच जर रक्तस्राव  झाला तर रक्तस्त्राव होण्याची कारणे शोधणे आवश्यक असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?

डॉक्टरांच्या मते पाळीच्या तारखेत थोडेफार बदल सामान्य आहेत, पण काही स्पष्ट चिन्हे आहेत जे  गर्भाशयाचा असामान्य रक्तस्त्राव दर्शवतात, जे असे आहेत:

  • जर पाळी आठवड्यांच्या आत येत असेल किंवा 5 आठवड्यांनंतर ही आली नसेल.
  • पाळी जर एक आठवड्यापेक्षा जास्त किंवा दोन दिवसांपेक्षा कमी वेळ राहत असेल.
  • एका तासामध्ये बरेचदा वेळा टँपून्स किंवा पॅड बदलणे.
  • संभोगानंतर किंवा दोन पाळ्यांमध्ये रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

ह्या स्थितीसाठी सर्वात कॉमन कारण हार्मोन्समधील असमतोल आहे. इतर काही ह्या खालील गोष्टी कारणीभूत असू शकतात:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तत्काळ निदान शक्य नसतात कारण डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि पुढील सायकल आणि पाळीचे निरीक्षण करतात. गर्भधारणा चाचणी आणि वैद्यकीय इतिहास ही प्राथमिक पायरी असते ज्यामुळे प्राथमिक निदान होते. त्यानंतर हार्मोनल असंतुलन, आयर्न ची कमतरता किंवा रक्त-संबंधित विकारांकरिता रक्त तपासणी केली जाते. गर्भाशयाचे परीक्षण करण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाऊंडचा किंवा हिस्टरोस्कोपीचा वापर करतात. कर्करोग किंवा इतर विकारांबद्दल शंका असल्यास बायोप्सी केली जाऊ शकते.

निदान दर्शवितात त्यानुसार, या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि त्वरित आराम मिळावा म्हणून उपचारांचा एक मार्ग निवडला जातो. उपचारांचे काही उदाहरण खालीलप्रमाणे आहेत,

  • पाळी नियमित करण्यासाठी आणि रक्त प्रवाह कमी करण्यासाठी हार्मोनल औषधे गोनाडोट्रोपिन-रिलीज करणारे हार्मोन प्रचालक. (अधिक वाचा: अनियमित पाळीसाठी  उपचार)
  • रक्त प्रवाह कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी औषधे.
  • रक्त गोठण्याची समस्या आणि रक्तस्त्राव कमी करण्यासाठी ट्रॅनेक्सॅमिक ॲसिड.
  • एंडोमेट्रियल पृथक्करण जे गर्भाशयाचे अस्तर नष्ट करते पण त्यानंतर पाळी  आपोआपबंद होते.
  • मायोमेक्टॉमी - हे फायब्रोइड्स काढून टाकते किंवा त्यांना रक्त पुरवठा बंद करते.
  • मोठ्या फायब्रोइड्स किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी हिस्टरेक्टॉमी.



संदर्भ

  1. American College of Obstetricians and Gynecologists. Management of Acute Abnormal Uterine Bleeding in Nonpregnant Reproductive-Aged Women. Washington, DC; USA
  2. American Society for Reproductive Medicine. Abnormal Uterine Bleeding. The American Fertility Society; U.S. state of Alabama
  3. Ministry of Health and Family Welfare. Abnormal uterine bleeding. Government of India
  4. Lucy Whitaker, Hilary O.D. Critchley. Abnormal uterine bleeding. Best Pract Res Clin Obstet Gynaecol. 2016 Jul; 34: 54–65. PMID: 26803558
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Abnormal uterine bleeding

गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव (ॲब्नॉर्मल यूटेरिन ब्लीडिंग) चे डॉक्टर

Dr. Bhuvnesh kumar Ramakant Chaturvedi Dr. Bhuvnesh kumar Ramakant Chaturvedi General Physician
14 Years of Experience
Dr. Ravinder Kaur Dr. Ravinder Kaur General Physician
15 Years of Experience
Dr. Avijoy saha roy Dr. Avijoy saha roy General Physician
7 Years of Experience
Dr. Pallavi Patharwat Dr. Pallavi Patharwat General Physician
2 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव (ॲब्नॉर्मल यूटेरिन ब्लीडिंग) साठी औषधे

Medicines listed below are available for गर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव (ॲब्नॉर्मल यूटेरिन ब्लीडिंग). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.