झिंकची कमतरता - Zinc Deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

April 26, 2019

March 06, 2020

झिंकची कमतरता
झिंकची कमतरता

झिंकची कमतरता म्हणजे काय?

झिंक हा एक महत्वाचा खनिज आहे जो आपल्याला अन्न आणि आहाराच्या पूरकांमधून मिळतो. हा शरीराचे प्रोटीन आणि डीएनए संश्लेषण, गर्भधारणा आणि बाल्यावस्थेत वाढ आणि विकास, गंध आणि चवीची योग्य जाण, जखम भरून येणे आणि प्रतिकारशक्ती यासारख्या विविध कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. शरीरात झिंक साठवून ठेवण्याची प्रणाली नसल्यामुळे पुरेशा प्रमाणात झिंक नियमितपणे घेणे आवश्यक आहे. शरीरात झिंकची कमी झालेली मात्रा आणि ते कमी प्रमाणात घेतले जाणे यालाच झिंकची कमतरता असे म्हटले जाते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

झिंकच्या कमतरतेची सामान्य लक्षणं खालील प्रमाणे आहेत:

दुर्मिळ आणि गंभीर कमतरतेत ही लक्षणं दिसून येतात:

  • अतिसार.
  • केसांची गळती.
  • वंधत्व.
  • उशिरा तारुण्य येणे.
  • त्वचा आणि डोळ्यात दोष.
  • पुरुषांमध्ये हायपोगोनॅडिझम.

इतर लक्षणे जसे की जखम बरी होण्यास उशीर लागणे, वजन कमी होणे, सुस्तपणा आणि चवीचे ज्ञान कमी होणे हे देखील झिंकच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

झिंकची कमतरता असण्याची ही मुख्य कारणे आहेत :

  • झिंकचे अपूर्ण सेवन.
  • अयोग्य शोषण.
  • शरीराची वाढलेली झिंकची गरज.
  • खूप प्रमाणात शरीरातून होणारी झिंकची हानी.

खालील घटक झिंकची कमतरता वाढवितात:

  • योग्य आहार न घेणे.
  • मद्यपान.
  • गॅस्ट्रोइंटेस्टीनल रोग जसे क्रॉन्स रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, आतड्यात जळजळीची लक्षणे, उष्णकटिबंधीय स्प्रू, ज्यात अन्नातील झिंकचे शोषण कमी होते.
  • गर्भधारणा आणि स्तनपान यादरम्यान झिंकची गरज वाढलेली असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

झिंकची गंभीर कमतरता ओळखण्यासाठी रक्त तपासणीत रक्तातील झिंकचा स्तर पाहिला जातो. क्षारीय फॉस्फेटेस एंझाइम आणि अल्ब्युमिनचा स्तर देखील झिंकच्या कमतरतेचे निदान करण्यात मदत करतात.

झिंकच्या कमतरतेला झिंकची पुनर्स्थापना हा मुख्य उपचार आहे. झिंकच्या पुरकाचा डोज अंतर्निहित कारणांवर अवलंबून असतो.

झिंकच्या कमतरतामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या विकृतींचा उपचार मॉइस्चरायझर आणि टोपिकल स्टेरॉईड्सचा वापर करुन केला जाऊ शकत नाही.

आहारात झिंकची मात्रा वाढविणे देखील स्थितीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकते. कालव/शिंपला, लाल मांस, चिकन, दाणे, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यात शरीराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे झिंक असते.



संदर्भ

  1. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Zinc.
  2. Ananda S Prasad. Zinc deficiency. BMJ. 2003 Feb 22; 326(7386): 409–410. PMID: 12595353
  3. Australasian College of Dermatologists. Zinc Deficiency and the Skin. [Internet]
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Zinc
  5. healthdirect Australia. Zinc. Australian government: Department of Health
  6. United States Department of Agriculture Agricultural Research Service. NUTRIENTS AND HEALTH BENEFITS. National Nutrient Database for Standard Reference Legacy Release [Internet]

झिंकची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

झिंकची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for झिंकची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.