स्कार्व्ही - Scurvy in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

December 24, 2018

October 23, 2020

स्कार्व्ही
स्कार्व्ही

स्कार्व्ही काय आहे?

स्कार्व्ही ही एस्कॉर्बिक ॲसिड, ज्याला सामान्यतः व्हिटॅमिन सी म्हणतात च्या दीर्घकालीन कमतरतेमुळे होणारी एक समस्या आहे. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक आहे, जे रक्तवाहिन्या आणि शरीराच्या इतर टिश्यूना आधार देण्याचे आणि संरचनात्मक महत्त्वपूर्ण कार्य करते. आज ही समस्या असामान्य असली तरी ही कमतरता अशक्तपणा,ॲनिमिया, हिरड्यांचा विकार आणि त्वचेचा स्त्राव या रूपात दिसून येते. व्हिटॅमिन सी हा एक महत्वाचा अँटीऑक्सीडेंट देखील आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

स्कार्व्हीची लक्षणे वैयक्तिकरित्या भिन्न असू शकतात.

प्रारंभिक लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:

उशीरा दिसणाऱ्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहेतः

  • ॲनिमिया.
  • हिरड्याचे विकार.
  • डोळ्यांची आग होणे.  
  • खवल्यांसारखा, कोरडी आणि तपकिरी त्वचा.
  • जखमा संथपणे ठिक होणे.
  • त्वचेवर स्त्राव.
  • केस कोरडे आणि खराब होऊन खूप केस गळणे.
  • सांधे आणि स्नायूंमधील रक्तस्त्रावामुळे हात व पायांवर सूज होण्याची शक्यता असते.
  • हाडांची वाढ मंदावणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अविकसित देशांमध्ये जिथे कुपोषण ही एक मोठी समस्या स्कार्व्हीची समस्या अधिक सामान्यपणे आढळते आहे.

स्कार्व्ही हा आहारात मूलबुक प्रमाणात व्हिटॅमिन सी नसल्याने होतो.

रिस्क फॅक्टर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • निवडक आणि अपूर्ण आहार घेणारे, एनोरेक्झिया नर्वोसा असलेले  व्यक्ती , वृद्ध, मुले, मानसिक आणि शारीरिक अपंग असलेले लोक, विशिष्ट आहार किंवा फूड फॅड किंवा ॲलर्जीक आहार घेणारे लोक.
  • ज्या लोकांमध्ये काही अंतर्गत वैद्यकीय स्थिती आहे जसे की मॅलाबॉर्स्प्शन डिसऑर्डर, गंभीर अपचन, डायलिसिसवर असलेले, प्रदाहक आन्त्र रोग आणि इतर.
  • धूम्रपान आणि मद्यपान.  
  • कुपोषण.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि लक्षणांच्या आधारावर स्कार्व्हीचे निदान केले जाते.

आहारात व्हिटॅमिन सीच्या कमरतेचे देखील मूल्यांकन केले जाते.

तपासणी मध्ये खालील समाविष्ट असतात:

  • व्हिटॅमिन सी आणि आयर्नची पातळी मोजण्यासाठी रक्त चाचणी.
  • हात आणि पायाच्या सांध्यांचे एक्स-रे.

जेव्हा एखादी व्यक्तीचे लक्षणं कमी होऊन व्हिटॅमिन सी-समृध्द आहारालख चांगला प्रतिसाद मिळतो तेव्हा निदानाची पुष्टी होते.

उपचारांमध्ये व्हिटॅमिन सी प्रतिस्थापित केले जाते. तुमचे डॉक्टर व्हिटॅमिन सी चे पूरक सूचवू शकतात. आहारातील बदलांमध्ये तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी-समृद्ध खाद्य पदार्थांचा समावेश केला जातो.

ज्यामुळे लक्षणे कमी होऊ शकतात. पपई, लिंबू आणि संत्री व्हिटॅमिन सी ने भरपूर आहेत.

अंतर्गत वैद्यकीय परिस्थिती आणि वाढत्या घटकांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.



संदर्भ

  1. Daniel Léger. Scurvy: Reemergence of nutritional deficiencies. Can Fam Physician. 2008 Oct; 54(10): 1403–1406. PMID: 18854467
  2. Rian A.A. Wijkmans, Koen Talsma. Modern scurvy . J Surg Case Rep. 2016 Jan; 2016(1): rjv168. PMID: 26755528
  3. National Health Portal [Internet] India; Scurvy
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Scurvy
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Scurvy
  6. National Center for Advancing and Translational Sciences. Scurvy. Genetic and Rare Diseases Information Center
  7. healthdirect Australia. Scurvy. Australian government: Department of Health

स्कार्व्ही चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

स्कार्व्ही साठी औषधे

Medicines listed below are available for स्कार्व्ही. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.