रुमेटॉइड हृदय रोग - Rheumatic Heart Disease in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

May 04, 2019

March 06, 2020

रुमेटॉइड हृदय रोग
रुमेटॉइड हृदय रोग

रुमेटॉइड हृदय रोग म्हणजे काय?

रुमेटॉइड हृदय रोग (आरएचडी) हा हृदयाचा विकार आहे. यामध्ये व्हॉल्वचे अपरिवर्तनीय नुकसान होते आणि हार्ट फेल होते.  शिवाय घशात स्ट्रेप्टोकोकल संसर्ग होतो आणि अवयव खराब होतात. अक्यूट रुमेटॉइड ताप (एआरएफ) यख रोगाच्या सुरवातीचे लक्षण आहे.

याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कधीकधी आरएचडी कोणत्याही चिन्हे आणि लक्षणांशिवाय होऊ शकतो. पण जर लक्षणे दिसून येत असतील तर ती खाली नमूद केल्यांपैकी असू शकतात:

  • खराब झालेले हृदय व्हॉल्व संसर्गित झाल्यास, ताप हेकपक एक संबंधित लक्षण आहे.
  • सूज (एडीमा).
  • लेटल्यावर श्वास घ्याला त्रास होणे (ऑर्थोपनोआ) आणि / किंवा परिश्रमांनंतर श्वास घेणे कठीण होणे.
  • छातीत दुखणे किंवा हृदय धडधडणे
  • बसण्याची किंवा उभे राहण्याची गरज वाटल्यामुळे झोपेतून उठणे(पॅरोक्सिझमल नॉक्टर्नल डिस्पोनिआ).
  • बेशुद्धावस्था (सिनकोप).
  • हृदयातून आवाज येणे
  • स्ट्रोक.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

आरएचडीचे मुख्य कारण गट ए स्ट्रेप्टोकोकीचा संसर्ग आहे, जे आनुवांशिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या यजमानामध्ये असामान्य ऑटोमिम्यून प्रतिसाद बनवते. या अतिवृद्ध प्रतिक्रियेमुळे शरीरातील एकाधिक ऊतकांवर सूज येते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संपूर्ण शारीरिक तपासणीसह डॉक्टर लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास (मागील एआरएफ किंवा स्ट्रेप्टोकोकल संसर्गाचा पुरावा) यांची तपशीलवार माहिती विचारतात. कधीकधी, या परीक्षेत हृदयतुन आवाज येतो, जे आरएचडी दर्शवू शकते. पण, आरएचडी असलेल्या काही रूग्णांमध्ये हृदयतुन आवाज ऐकू येत नाही. डॉक्टर खालील चाचण्या देखील करायला सांगू शकतात:

  • छातीचा एक्स-रे - हृदय वाढ किंवा फुफ्फुसामधील द्रवपदार्थची उपस्थिती तपासण्यासाठी.
  • इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) - हृदयाच्या कक्षेची वाढ किंवा हृदयरोधक असामान्यता तपासण्यासाठी  (अरिथिमिया).
  • इकोकार्डियोग्राम - हृदय व्हॉल्व तपासण्यासाठी (नुकसान, संसर्गासाठी).

आरएचडीचे व्यवस्थापन रोगाच्या तीव्रतेनुसार बदलते आणि त्यात खालील समाविष्ट आहे :

  • हृदय बंद पडल्यास, उपचारांसाठी रुग्णालयात प्रवेश आवश्यक आहे.
  • सामान्यतः हृदयाच्या व्हॉल्वमध्ये आढळणाऱ्या संसर्गासाठी, अँटीबायोटिक्स (प्रामुख्याने पेनिसिलिन) निर्धारित केले जातात.
  • स्ट्रोकच्या रक्षणासाठी किंवा व्हॉल्व बदलण्यासाठी रक्त पातळ करण्यासाठी आवश्यक असल्यास रक्त-पातळ करणारे औषधे निर्धारित केली जातात.
  • बंद झालेले व्हॉल्व उघडण्यासाठी, बुलून शस्त्रक्रियेने शिरेतून फुगा बसवला जातो.
  • खराब झालेले हृदयाचे व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी किंवा पुनर्स्थित करण्यासाठी हृदयाच्या व्हॉल्वची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.



संदर्भ

  1. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rheumatic heart disease.
  2. Liu M et al. Rheumatic Heart Disease: Causes, Symptoms, and Treatments.. Cell Biochem Biophys. 2015 Jul;72(3):861-3. PMID: 25638346
  3. National Health Portal [Internet] India; Rheumatic fever and rheumatic heart disease.
  4. Sika-Paotonu D, Beaton A, Raghu A, et al. Acute Rheumatic Fever and Rheumatic Heart Disease. 2017 Mar 10 [Updated 2017 Apr 3]. In: Ferretti JJ, Stevens DL, Fischetti VA, editors. Streptococcus pyogenes : Basic Biology to Clinical Manifestations [Internet]. Oklahoma City (OK): University of Oklahom
  5. Harris C,Croce B,Cao C. Rheumatic heart disease. Ann Cardiothorac Surg. 2015 Sep;4(5):492. PMID: 26539360

रुमेटॉइड हृदय रोग साठी औषधे

Medicines listed below are available for रुमेटॉइड हृदय रोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹100.0

₹400.0

Showing 1 to 0 of 2 entries