मेईज सिंड्रोम - Meige Syndrome in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

मेईज सिंड्रोम
मेईज सिंड्रोम

मेईज सिंड्रोम काय आहे ?

मेईज सिंड्रोम हा अवयवांच्या अनैच्छिक हालचालींचा विकार आहे, मज्जातंतूंच्या हालचालींचा विकार ज्यामध्ये जबडा, जीभ आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूं (ब्लेफारोस्पाज्म) ची अनैच्छिक आकुंचन किंवा हालचाल होत असते.

याचे मुख्य चिन्हं आणि कारणं काय आहे?

मेईज सिंड्रोम हे लक्षणावरून विभागले आहे जसे डिस्टोनिया (ओरोमँडीब्युलर) आणि  ब्लेफारोस्पाज्म, जे त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं सुद्धा आहे.

  • ओरोमँडीब्युलर डिस्टोनिया - या डिस्टोनिया च्या  प्रकारामध्ये अनैच्छिक आणि बळजबरीने जबड्याच्या स्नायूंचे आणि जिभेचे आकुंचन पावते, त्यामुळे या स्नायूंची ऐच्छिक हालचाल जसे बोलणे किंवा खाण्याची क्रिया करणे या क्रिया करणे कठीण होते.
  • ब्लेफारोस्पाज्म -  ब्लेफारोस्पाज्म हे डोळ्याची जबरदस्तीने आणि वारंवार उघडझाप किंवा बंद होणे होय आणि इतर बाहेरील घटकांमुळे जसे हवा, प्रखर लाईट, इत्यादी .मूळे  यात आणखी वाढ होते. ही परिस्थिती हळूहळू एवढी वाढत जाते की डोळ्यांचे आकुंचन पावणे आणि झटके वारंवार येऊ लागतात आणि त्यामुळे एक वेळ अशी येते की प्रभावित व्यक्तीला डोळे उघडे ठेवणे कठीण होऊ लागते.  ब्लेफारोस्पाज्म हे सुरवातीला एका डोळ्यामध्ये (युनिलॅटरल) होते आणि नंतर दोन्ही डोळ्यामध्ये (बायलॅटरल) होते.

याचे मुख्य कारणं काय?

मेईज सिंड्रोम होण्यामागे विशिष्ट कारण काहीही नाही आहे. या रोगाशी संबंधित काही गृहीत कारणं खालीलप्रमाणे आहे:

  • बेसल गॅन्गेलिया च्या जाळ्यामध्ये बिघाड होणे- मेंदूच्या एका जागेला बेसल गॅन्गेलिया म्हणतात ती डोळ्यांच्या मिचकावन्यासोबत इतर अनैच्छिक हालचालीवर नियंत्रण ठेवते या मेंदूच्या सेल्स मध्ये बिघाड झाल्यास त्याला मेईज सिन्ड्रोम म्हणतात.
  • दुष्परिणाम- पार्किन्सन रोगाच्या उपचारावर काही औषधे वापरली जाते त्याच्या दुष्परिणामांमुळे मेईज सिन्ड्रोम ची वाढ होऊ शकते .

याचे निदान आणि उपचार काय आहे ?

मेईज सिंड्रोम हा दुर्मिळ असल्यामुळे, त्यावर ठराविक निदान पद्धती नाही आहे. तरीही, न्यूरोतज्ञ लक्षणावरून आणि पॅटर्न वरून मेईज सिंड्रोम चे निदान करू शकतात .

झटके न येणाऱ्या गोळ्या घेतल्या तर परिस्थिती हळूहळू सुधारत जाते .

क्लोनझेपाम, ट्रायहॅक्सिफेनिडील, डायझेपाम, आणि बॅकलोफेन सारखी औषधे मेईज किंवा ब्लेफारोस्पाज्म च्या उपचारावर वापरली जाते, पण याचे परिणाम काही काळाकरिताच असते किंवा असमाधानी असते. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) नुकत्याच केलेल्या अभ्यासातून, बोटुलिनम हे औषध  ब्लेफारोस्पाज्म च्या उपचारासाठी ठरवले आहे आणि या रोगाच्या उपचारासाठी हे सगळ्यात जास्त कॉमन औषध आहे. तरीही काही रुग्ण बोटॉक्स च्या उपचाराला प्रतिसाद देत नाही.

 

 

 



संदर्भ

  1. National Organization for Rare Disorders. [Internet]. Danbury; Meige Syndrome.
  2. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Meige disease.
  3. Cleveland Clinic. [Internet]. Euclid Avenue, Cleveland, Ohio, United States; Meige Syndrome.
  4. National Center for Advancing and Translational Sciences. [Internet]. U.S. Department of Health and Human Services; Meige syndrome.
  5. Cleveland Clinic. [Internet]. Euclid Avenue, Cleveland, Ohio, United States; Meige Syndrome: Management and Treatment.