शुक्राणूंची संख्या कमी - Low Sperm Count in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 14, 2018

March 06, 2020

शुक्राणूंची संख्या कमी
शुक्राणूंची संख्या कमी

सारांश

शुक्राणूंची संख्या वीर्य विश्लेषण चाचणीमध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या निकषांपैकी असते. शुक्राणू विश्लेषण चाचणी एखाद्या पुरुषाच्या प्रजननक्षमतेचे निदान करण्यासाठी एक महत्त्वाची चाचणी असते.त्याचे मोजमाप एक परीक्षण नमुन्यामध्ये (वीर्य) आढळणार्र्या शूक्राणूंच्या औसत संख्येमध्ये केले जाते. शुक्राणू कमी असणें म्हणजे, वीर्याच्या नमुनामधील अपेक्षित किंमतीपेक्षा शुक्राणू कमी असणें. शूक्राणूंच्या संख्या कमी असलेल्या व्यक्तीला लक्षणे नसतात किंवा अंडकोषामध्ये सूज अथवा इतर लक्षणे असतात. शुक्राणू कमी असण्याचे कारण जननेंद्रियाशी निगडीत असू शकतात अगर उच्च तापमानाला अनावरणासारखी बाह्य कारणेही असू शकतात  . प्रयोगशाळेमध्ये वीर्याच्या तपासणीद्वारे निदानाची निश्चिती केली जाते. शुक्राणूंची संख्या कारणीभूत घटक असल्यास त्याला अनावरण टाळून, निरोगी जीवनशैली अवलंबून आणि डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध घेऊन वाढवली जाऊ शकते.

शुक्राणूंची संख्या कमी ची लक्षणे - Symptoms of Low Sperm Count in Marathi

साधारणपणें काहीही लक्षणे नसतील, पण काही लोकांमध्ये पुढील लक्षणे आढळतात:

  • कमीत कमी वर्षभराच्या असुरक्षित संभोगाद्वारेही गर्भधारणेस अपयश.
  • संभोग करण्याच्या इच्छेत घट
  • जननेंद्रियांमध्ये सूज

शुक्राणूंची संख्या कमी चा उपचार - Treatment of Low Sperm Count in Marathi

शुक्राणूंच्या कमी संख्येवर उपचार अंतर्निहित कारणावर आधारित असते. अंतर्निहित कारण उपचारयोग्य असल्यास, शुक्राणूंच्या कमी संख्येवर उपचार करता येते, जे पुढीलप्रमाणें आहे:

  • इतिहासाची सखोल माहिती
    याद्वारे पुढील माहिती मिळू शकते
    • व्यवस्थासंबंधी वैद्यकीय आजार(उदा. डायबेटीस मेलिटस आणि श्वसनसंबंधी आजार).
    • पहिले एखादी शस्त्रक्रिया झाली आहे का.
    • लैंगिक पूर्वसूत्र उदा. लैंगिक संबंधातून पसरणारी संक्रमणे.
    • ऊष्मा, कोणतेही विषारी पदार्थ किंवा कीटनाशकाला अनावरण.
    • व्यवसायाचे इतिहास उदा. कामाच्या वेळी कशाचे अनावरण.
       
  • समादेश
    तुमचे डॉक्टर तुमच्या परिस्थितीचे अधिक चांगले स्पष्टीकरण देऊ शकतात. आपल्या समस्या आणि वैय्यक्तिक पूर्वसूत्रे सांगण्यास लाजू नये, कारण ते कारणाची माहिती व उपचारात मदत करू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर तणाव हाताळण्यामध्ये तुमची मदत करू शकतात, जे शुक्राणूंची संख्या कमी असण्याचे कारण असू शकते.
  • उच्च तापमान, विकिरण आणि विषारी पदार्थांना अनावरण टाळल्याने शुक्राणूंची संख्या वाढू शकतात.
     
  • अवजड धातूंचे कारखान्यांमध्ये काम करत असतांना आणि कीटनाशक वापरतांना योग्य काळजी व सुरक्षा वापरणें.
     
  • तंबाखू खाणे आणि सिगारेट ओढणे टाळणें हितावह असू शकते. 
  • मद्यपान टाळणें, कारण अल्कोहल शुक्राणू परिपक्व होण्यात अडसर निर्माण करू शकतो.
  • योग्य आहार व व्यायामासह पोषक तत्त्वे घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात येईल आणि शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
  • शुक्राणूंची संख्या व्हॅरिओसिलमुळे कमी असल्यास, शस्त्रक्रिया त्याला बरे करू शकते.
  • जनुकीय समस्या असल्यास, आजारावर आधारून योग्य मूल्यमापन व पर्यायी पद्धतींद्वारे वीर्य काढून मदत होऊ शकते.
  • तुम्ही घेत असलेल्या विशिष्ट औषधांमुळे शुक्राणूंची संख्या कमी असल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला मात्रा कमी करण्यास किंवा ते औषध वापरणें थांबवण्यासही सांगू शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

शुक्राणूंची संख्या कमी असण्यात जीवनशैली परिवर्तनांचीही मदत होते. उदा.:

  • डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणें निरोगी व पोषक आहारासह पोषक पूरक तत्त्वे घेणें.
  • ध्यान, प्राणायाम आणि योगासनांसारखे तणावनाशक कृतींद्वारे तणाव कमी करणें
  • दिनक्रमामध्ये 30-45 मिनिटे दैनिक व्यायाम करणें.
  • सिगारेट ओढणें सोडणें आणि मद्यपान मर्यादित करणें
  • तंबाखूचे वापर टाळणें
  • अतिशय गरम पाण्याने आंघोळ टाळणें


संदर्भ

  1. Agarwal A, Mulgund A, Hamada A, Chyatte MR. A unique view on male infertility around the globe.. Reprod Biol Endocrinol. 2015 Apr 26;13:37.PMID: 25928197.
  2. Vasan S S. Semen analysis and sperm function tests: How much to test?. Indian J Urol 2011;27:41-8
  3. N. Sermondade, C. Faure, L. Fezeu, A.G. Shayeb, J.P. Bonde, T.K. Jensen, M. Van Wely, J. Cao, A.C. Martini, M. Eskandar, J.E. Chavarro, S. Koloszar, J.M. Twigt, C.H. Ramlau-Hansen, E. Borges, F. Lotti, R.P.M. Steegers-Theunissen, B. Zorn, A.J. Polotsky, S
  4. Science Direct (Elsevier) [Internet]; Azoospermia due to Spermatogenic Failure
  5. Health Sciences Research Commons [internet]:The George Washington University; Occupational exposure to Organophosphate Pesticides and its Effects on Human Sperm Parameters: A systematic Review
  6. Santiago Brugo-Olmedo, Claudio Chillik, Susana Kopelma. Definition and causes of infertility.CEGYR, Center for Gynecology and Reproduction Studies ,Argentina.
  7. National institute of child health and human development [internet]. US Department of Health and Human Services; What are some possible causes of male infertility?
  8. Tsao CW, Liu CY, Chou YC, Cha TL, Chen SC, Hsu CY. Exploration of the association between obesity and semen quality in a 7630 male population..PLoS One. 2015 Mar 30;10(3):e0119458. PMID: 25822490
  9. World Health Organization, Department of Reproductive Health and Research. WHO laboratory manual for the Examination and processing of human semen. Fifth edition; World Health Organization; 2010.
  10. McGrady AV. Effects of psychological stress on male reproduction: a review.. Arch Androl. 1984;13(1):1-7. PMID: 6152527
  11. Mostafa T, Tawadrous G, Roaia MM, Amer MK, Kader RA, Aziz A. Effect of smoking on seminal plasma ascorbic acid in infertile and fertile males.. Andrologia. 2006 Dec;38(6):221-4. PMID: 17081174
  12. Emanuele MA, Emanuele NV. Alcohol's effects on male reproduction. Department of Medicine, Division of Research on Drugs of Abuse, Loyola University Stritch School of Medicine, Maywood, Illinois, USA.Alcohol Health Res World. 1998;22(3):195-201. PMID: 15706796.
  13. Lafuente R, González-Comadrán M, Solà I, López G, Brassesco M, Carreras R, Checa MA. Coenzyme Q10 and male infertility: a meta-analysis..J Assist Reprod Genet. 2013 Sep;30(9):1147-56.PMID: 23912751.

शुक्राणूंची संख्या कमी साठी औषधे

Medicines listed below are available for शुक्राणूंची संख्या कमी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for शुक्राणूंची संख्या कमी

Number of tests are available for शुक्राणूंची संख्या कमी. We have listed commonly prescribed tests below: