अर्जुन साल काय आहे?

अर्जुन हरड (टर्मिनॅलिआ चेबुला) आणि बहेडा (टर्मिनॅलिआ बॅलॅरिका) सारख्या औषधीय चमत्कारांबरोबर जीनस टर्मिनॅलिआमधील सदाबहार झाड आहे. या आभूषणिक वृक्षाचे औषधीय संदर्भ हृदयासाठी एक टॉनिक समजले जाते. वास्तविक पाहता, या झाडाचे उल्लेख ऋग्वेदामध्येही सापडते. आयुर्वेदिक वैद्य सर्वांगीण हृदयारोगाला चालना देण्यासाठी अर्जुन झाडाचा सल्ला देतात. औषधीच्या दृष्टीने, अर्जुन झाडाचे साल विविध हृदयरोग उदा. स्ट्रोक, हृदयाघात आणि हृदय निकामी होण्यावरील त्याच्या उपचारक लाभांसाठी अभ्यास केला जातो. तुम्हाला जाणून आनंद होईल की अर्जुन झाड हृदयचक्राला ( मानवी शरीराचे ऊर्जाचक्र) सुदृढ करण्याचे समजले जाते आणि त्याच्या औषधीय गुणधर्मांची तुलना पश्चिमी वनस्पतीशास्त्राती हॉथॉर्नशी केली जाते.

मूळ भारतातील स्थानिक वृक्ष असलेले अर्जुन वृक्ष नदी आणि धारांजवळ सामान्यपणें आढळते आणि 25 ते 30 मी. उंचीपर्यंत वाढू शकते. अर्जुनाचे झाड सपाट आणि राखाडी असते, पण त्याच्यामध्ये काही हिरवे आणि लाल चट्टे असतात. अर्जुनाची पाने जवळपास आयताकार असतात आणि एकामेकासमोर शाखांवर वाढतात. या झाडाच्या पांढर्र्या क्रीम रंगाचे फूल मे ते जुलै महिन्यात समूहात वाढतात. अर्जुन झाड ताजेतवाणे असतांना हिरवेगार असते आणि परिपक्वतेवर लाकडी तपकिरी होते. या फळाचे वैशिष्ट्यपूर्ण पंख असतात, जे अर्जुनाची ओळख देणार्र्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

तुम्हाला माहीत होते का?

टर्मिनॅलिआचे मूळ एका लॅटिन शब्दामध्ये आहे, ज्याचे अर्थ टर्मिनल किंवा टोक असे आहे. हे अर्जुन झाडाच्या पानांच्या संदर्भात असू शकते, जे त्याच्या शाखांच्या शेवटी वाढते. अर्जुन शब्दाचे अर्थ पांढरे किंवा चकाकदार असते, जे त्याच्या चकाकदार पांढरे साल किंवा पांढर्र्या फुलांबद्दल असू शकते.

अर्जुन झाडाबद्दल काही मूळभूत तथ्य.

  • जीवशास्त्रीय नांवटर्मिनॅलिआ अर्जुना
  • कुटुंब: कॉंब्रेटॅसॅस
  • सामान्य नांवअर्जुन, श्वेत मरुदा
  • संस्कृत नांवअर्जुन, धवल, नदिसर्ज
  • वापरले जाणारे भाग: साल
  • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: अर्जुन झाड भारत आणि श्रीलंकातील स्थानिक आहे, पण ते बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान, इंडोनेशिआ, थायलॅंड आणि मलेशिया येथेही आढळते.
  • तासीर: अर्जुनाचे साल पित्त आणि कफ यांचे शमन करते आणि वात वाढवते, आणि त्याचे शरिरावर थंड करणार प्रभाव असते. 
  1. अर्जुन झाडाच्या सालीचे आरोग्य फायदे - Arjuna tree bark health benefits in Marathi
  2. अर्जुनाचे साल कसे वापरावे - How to use arjuna bark in Marathi
  3. अर्जुन सालीची मात्रा - Arjuna bark dosage in Marathi
  4. अर्जुन झाडाच्या सालीचे सहप्रभाव - Arjuna tree bark side effects in Marathi

अर्जुन सालीचे अनेक आरोग्य फायदे असतात, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हृदयारोग्याचा पुरस्कर्ता आहे. अनेक आरोग्य फायद्यांबद्दल आपण जाणून घ्या.

  • रक्तदाबाचे नियामन करते: अर्जुन साल इतर वनस्पतींबरोबर समायोजनात दिल्यास रक्तदाबाचे नियामन होते. कंजॅस्टिव्ह हार्ट फेल्युअर रुग्णांमध्ये श्वसनहीनता आणि सिस्टॉलिक रक्तदाब कमी करत असल्याचे आढळले आहे.
  • एथेरोस्क्लेरोसिस टळते: विज्ञानाच्या दृष्टीने सिद्ध झाले आहे की अर्जुन साल, दुधाबरोबर घेतल्याने कॉलेस्टरॉल स्तर कमी होण्यास मदत होते. एंटीऑक्सिडेंट असल्याने, लिपिड पॅरॉक्साइडेशन टळते, ज्याच्या परिणामी एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होतो.
  • हृदयासाठी चांगले: अर्जुनाचे साल कॉलेस्टरॉल आणि रक्तदाब कमी करते, जे हृदयरोगासाठीच्या दोन प्रमुख धोक्याचे घटक आहे. एंटीऑक्सिडेंट आणि रक्ताचा थक्का जमणारे एजेंट असल्यने, ते स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि वयसंबंधी कार्डिओव्हॅस्कुलर समस्या टाळतात.
  • सूक्ष्मजीवरोधी: अर्जुन सालीचे सार एमआरएसए आणि व्हीआरएसएविरुद्ध प्रतिजैविक कार्याचे प्रदर्शन करते. जे शरिराच्या रोगकारक पदार्थांच्या सर्वांत सामान्य प्रतिजैविक प्रतिरोधी स्ट्रेन्स असतात. त्याची प्रतिजैविक गतिविधी केवळ ग्रॅम सकारात्मक जिवाणूंपर्यंत मर्यादित आहे.

वरील फायद्यांशिवाय, अर्जुन साल रक्तशर्करा कमी करण्यात, खोकला टाळण्यात आणि अतिरिक्त आम्लीयतेच्या हानिकारक प्रभावांपासून पोटाच्या किनारीचे रक्षण करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापी, वैद्यकीय अभ्यासांच्या अभावामध्ये, अर्जुन सालीच्या या लाभांबद्दल बरेच काही पुष्टी केली जाऊ शकत नाही. 

हृदयासाठी अर्जुन वनस्पती - Arjuna herb for heart in Marathi

आयुर्वेदिक वैद्य मायोकार्डिअल संक्रमण, कॉरॉनरी हृदयरोग आणि इस्कॅलिक झटक्यांसारख्या कार्डिओव्हॅस्कुलर परिस्थितींवरील उपचारासाठी अर्जुन झाडाच्या सालीच्या पुडाचा सल्ला देतात. ते न केवळ धोका कमी करण्यात सहायक असते, तर नियमित घेतल्याने सर्वांगीण हृदयारोग्य आणि कार्य सुधारण्यात मदत करू शकते.

हृदय निकामी पडणे आणि हृदयसंबंधी रोगांना हाताळण्यात अर्जुन झाडाच्या सालीची कार्यक्षमतेची चाचणी करण्यासाठी अनेक प्राणिसंबंधी आणि वैद्यकीय अभ्यास करण्यात आलेले आहेत. अभ्यास सुचवतात की अर्जुन झाडाच्या सालीमध्ये अनेक सक्रिय जीवशास्त्रीय यौगिके असतात, ज्यामध्ये फ्लॅव्हॅनॉयड, टॅनिन आणि खनिजे एकत्र येऊन या झाडाला हृदयाला सर्वोत्तम उपलब्ध सुरक्षा देणारे बनवतात.

वैद्यकीय अभ्यासामध्ये, 10 हृदयरोग्यांना अर्जुन झाडाच्या सालीच्या पुडासह पारंपरिक औषधे तीन महिन्याच्या काळावधीसाठी दिले गेले, जिथे एका नियंत्रण गटाला केवळ हृदयसुरक्षा आणि उपचारक औषधे दिली गेली. 3 महिन्यांच्या काळावधीनंतर, असे आढळले की अर्जुनच्या सालीचे पूड दिलेल्या गटाच्या हृदयरोगामध्ये लक्षणीय सुधार दिसले, जे विशेष करून लेफ्ट वेंट्रिकल ( हृदयाचे भाग) बळकट करणारे होते.

अजून एका अभ्यासामध्ये, अर्जुन साल आणि अश्वगंधा कॅप्स्युल 8 आठवड्यांच्या काळावधीसाठी  40 निरोगी लोकांच्या गटाला दिले गेले. 8 आठवड्यानंतर हे पाहिले गेले की अश्वगंधेमुळे सामान्य हृदय अशक्तता कमी झाली, तर अर्जुनाची साल कार्डिओव्हॅस्कुलर क्षमता सुधारण्यात प्रभावी होती. तसेच, अर्जुनाची साल उत्कृष्ट एंटीऑक्सिडेंट आणि दाहशामक आहे, जी हृदयाचे तंतूंवरील तणाव कमी करते आणि हृदयाच्या स्नायूंशी संबंधित कोणतेही वय किंवा जीवनशैलीसंबंधी ह्रासाची गती मंदावते. तरीही, तुमच्यासाठी अर्जुन सालीच्या पुडाची योग्य मात्रा जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याशी बोलण्याचा सल्ला दिला जाईल.

 (अधिक वाचा: हृदयरोगाचे प्रकार व कारणे)

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

कॉलेस्टरॉलसाठी अर्जुन वनस्पती - Arjuna herb for cholesterol in Marathi

अर्जुन झाडीच्या सालीच्य हायपोलिपिडेमिक (कॉलेस्टरॉल कमी करणारे) गुणधर्म चाचणी करण्यासाठी अनेक चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. प्राणिजनित आणि वैद्यकीय अभ्यास पुष्टी करतात की अर्जुन झाडीचे साल शरिरातील लिपिड (वसा) प्रोफाइल संतुलित करण्यासाठी एक उत्कृष्ट पदार्थ आहे.

एका अभ्यासामध्ये, कॉरॉनरी हृदयरोग असलेल्या 21 लोकांना 1ग्रॅम अर्जुन सालीचे पूड दुधासह 4 महिन्याच्या काळावधीसाठी दिले गेले आणि असे आढळले की अर्जुन साल देण्याचे शरिरातील लिपिड घटक राखून ठेवण्यात सकारात्मक प्रभाव होते.

पुढील अभ्यास सुचवतात की अर्जुन साल एलडीएल (खराब कॉलेस्टरॉल) चे प्रमाण कमी करते, जे एथेरोस्क्लेरोसिस ( रक्तनलिकांमध्ये वसा जमा होणें) आणि कार्डिओव्हॅस्कुलर रोग उदा. स्ट्रोक आणि हृदयाघाता चा धोका कमी करतो, म्हणून हायपोलिपिडॅमिक म्हणून अर्जुन सालीचे उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगितले, तर ते सुरक्षित राहील.

 (अधिक पहा: उच्च कॉलेस्टरॉल उपचार )

रक्तदाबासाठी अर्जुन साल - Arjuna bark for blood pressure in Marathi

आयुर्वेदिक वैद्यांनुसार, अर्जुन साल अन्य वनस्पतींबरोबर समायोजन उपचार म्हणून दिल्यास रक्तदाब राखून ठेवण्यात खूप उपयोगी आहे. रक्तदाब कमी करण्यात अर्जुन सालीची उपयोगितेची चाचणी करण्यासाठी अनेक संशोधन करण्यात आलेले आहेत आणि ते सूचित करतात की आयुर्वेदिक दावा शेवटी सत्यच असेल.

वैद्यकीय अभ्यासामध्ये, सीएचएफ ( कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युर, उत्कृष्टपणें रक्त पंप करण्यास हृदयाची अक्षमता) असलेल्या 10 रुग्णांना 4 ग्रॅम अर्जुन सालीचे पूड, एका महिन्याच्या काळावधीतून दिवसातून दोनदा दिले गेले. एका महिन्याच्या शेवटी, श्वसनहीनता तसेच सिस्टॉलिक व डायस्टोलिक रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय घट आले होते.

तुमच्या शरीरप्रकाराप्रमाणें अर्जुन सालीचे पुडीची योग्य मात्रा जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टराशी तपासून घेणें आवश्यक आहे.

 (अधिक पहा: उच्च रक्तदाबावर उपचार)

मधुमेहासाठी अर्जुनाचे साल - Arjuna bark for diabetes in Marathi

प्राणीजनित आणि प्रयोगशाळा अभ्यासांचा दावा आहे की अर्जुन साल एक उत्कृष्ट हायपोग्लायसीमिक (रक्तशर्करा कमी करणारे) पदार्थ आहे. अभ्यास सुचवतात की अर्जुनाचे साल रक्तात ग्लूकोझ घेण्याचे प्रमाण वाढवते आणि ग्लूकोझ उत्पादनात निरत काही एंझायम्सना नियंत्रित करते. अशाप्रकारे रक्तातील ग्लुकोझ कमी होते.

तरीही, मानवी अभ्यासांच्या अभावामध्ये, माणसांवर मधुमेहरोधी प्रभावांबद्दल अधिक पुष्टी केली जाऊ शकत नाही.

 (अधिक पहा: मधुमेह उपचार)

खोकल्यासाठी अर्जुनाचे साल - Arjuna bark for cough in Marathi

प्राणिजनित अभ्यास दाखवतात की एरॅबिनोगॅलॅक्टॅन, अर्जुन झाडीच्या सालीमध्ये असलेले एक रासायनिक यौगिक खोकल्याच्या लक्षणांतून आराम मिळण्यात खूप प्रभावी आहे. पण, मानवी अभ्यासांच्या अभावामुळे, अर्जुन सालीच्या खोकल्यापासून आराम मिळणारे प्रभाव समजण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणें सर्वोत्तम आहे

एंटी कॉएगुलेंट म्हणून अर्जुनाचे साल - Arjuna bark as an anti-coagulant in Marathi

अर्जुन सालीवरील संशोधन एंटी कॉएगुलॅंट ( रक्ताचा थक्का बनण्यास थांबवणारे) म्हणून उपयोगी असू शकते. पुढे हे सुचवले गेले की हे साल प्लॅटलॅट जमा होणें ( शरिरात थक्का बनणार्र्या कोशिका जमणें) टाळू शकते किंवा काही चिन्हांबरोबर हस्तक्षेप करते, ज्याने रक्ताचा थक्का जमणें सुरू होते. तरीही, अर्जुन सालीच्या एंटीकॉएगुलॅंट प्रभावांची पुष्टी करण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे

रक्तस्राव विकारांसाठी अर्जुनाचे साल - Arjuna bark for bleeding disorders in Marathi

आयुर्वेदामध्ये, हॅमोफीलिआ, वॉन विलेब्रॅंड रोग, असामान्य आणि आंतरिक झीज व रक्तस्राव नियमित होणारे, अत्यधिक मासिक धर्म आणि हॅमरेजसारख्या विकारांमध्ये खूप प्रभावी आहे.

आयुर्वेदिक वैद्यांनुसार, अर्जुनाचे साल एक उत्कृष्ट व्हॅसोकंस्ट्रिक्टर ( रक्तवाहिन्या संकृत करणारे) आहे, ज्यामुळे हेमरेजच्या वेळेस रक्ताच्या क्षतीमध्ये घट होते. तरीही, माणसांवर अर्जुन सालीच्या या प्रभावांना सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रमाणजन्य संशोधन नव्हे. 

पोटातील अल्सरसाठी अर्जुनाचे साल - Arjuna bark for stomach ulcers in Marathi

प्राणिजनित अभ्यास दर्शवतात की अर्जुन सालीचे मॅथॅनॉल सार पोटातील म्युकस बॅरिअर बळकट करून गॅस्ट्रिक अल्सरचे गांभीर्य कमी करते. पण, माणसावर तत्सम प्रभावांची पुष्टी करण्यासाठी कोणतेही मानवी अभ्यास झालेले नाहीत. म्हणून, तुम्हाला पोटातील अल्सरचा त्रास असल्यास, कोणत्याही रूपात अर्जुनाचे साल घेण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याला विचारणें बेहतर राहील

अस्थिभंगासाठी अर्जुनाचे साल - Arjuna bark for fractures in Marathi

इजा किंवा ऑस्टिओपोरोसिससारख्या परिस्थितींमुळे अचानक बळ किंवा तणाव यामुळे हाडांत अस्थिभंग होऊ शकते. सामान्य उपचारविधेमध्ये हाडांचे पर्याय (तुटलेले हाड बरे करण्यासाठी वापरले जाणारे जैविक किंवा कृत्रिम पदार्थ) आणि विकास घटकांचा समावेश आहे. पण, विकास घटक खूप महाग असतात आणि त्याचे सहप्रभाव नसतात. आयुर्वेदिक वैद्य अस्थिभंग बरे करण्यासाठी अर्जुनाच्या सालीचे पेस्ट वापरतात. प्रयोगशाळा अभ्यासांचा दावा आहे की अर्जुन सालीचे सार हाडातील तंतू पुनर्निर्मित करण्यात खूप प्रभावी असतात. पण, मानवआधारित अभ्यासांच्या अभावामुळे, अर्जुन सालीचे उपचारक फायद्यांची पुष्टी करणें खूप अवघड आहे

अर्जुन साल एंटीऑक्सिडेंट - Arjuna bark antioxidant in Marathi

अर्जुन सालीच्या एंटीऑक्सिडेंट क्षमतेची चाचणी करण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आलेले आहेत. प्रयोगशाळा आणि प्राणिजनित अभ्यास सुचवतात की अर्जुन साल दिल्याने यकृतातील सुपरऑक्साइड डिस्म्युटॅस, कॅटॅलेस, विटामिन ए, सी आणि ई  यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते.

तरीही, मानवी शरिरावर अर्जुन झाडाच्या सालीची एंटीऑक्सिडेंट क्षमतेची चाचणी करण्यासाठी कोणतेही मानवी भ्यास झालेले नाहीत. 

सूक्ष्मजीवरोधी म्हणून अर्जुनाचे साल - Arjuna bark as an antimicrobial in Marathi

स्टॅफिलोकॉकस ऑरस ( एक प्रकारचे जिवाणू)च्या विविध स्ट्रेंसविरोधात अर्जुन सालीचे एक्विअस आणि एसेटोन सार प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, ज्यामध्ये सूक्ष्मजीवरोधी प्रतिरोधक व्हीआरएसए आणी एमआरएसए स्टॅफिलोकॉकस सामील आहे.

अजून एक अभ्यास सुचवते की विविध सूक्ष्मजीवरोधी असल्याऐवजी, अर्जुन सालीचे सार काही विशिष्ट जिवाणू ( ग्रॅम नॅगॅटिव्ह) विरुद्ध खूप शक्तिशाली असू शकते. मानवी अभ्यासांच्या अभावामध्ये, कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीसाठी अर्जुन साल वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याशी तपासलेले बरे असते. 

अर्जुनाचे साल सामान्यपणें पुडाच्या रूपात वापरले जाते. पण आयुर्वेदिक वैद्य त्याच्य अनेक आरोग्य फायद्यांसाठी कॅप्स्युल, टॅबलेट आणि अर्जुन चहासारख्या उत्पादनांचाही सल्ला देतात.

तुम्ही आयुर्वेदिक वैद्य असल्यास, तुम्हाला अर्जुन दूध किंवा क्षीरपाकाबद्दल माहिती असेल. ते एक प्रख्यात आयुर्वेदिक उपाय आहे, जे अर्जुन सालाची पूड किंवा दुधापासून बनवले जाते. आयुर्वेदिक वैद्यांनुसार, क्षीरपाक एक उत्कृष्ट आरोग्य टॉनिक आहे. हे उपाय घरी बनवण्यासाठी दिलेली एक त्वरित पद्धती याप्रमाणें आहे:

  1. पाणी, दूध आणि अर्जुनाची साल 32:8:1 अनुपातात घ्या.
  2. हे मिश्रण कमी तापावर तापवून सर्व पाणीचे वाष्पीकरण करा.
  3. मिश्रणाची छाननी करा आणि काढा/अर्जुन दुधाचा आनंद घ्या.

त्याच्या औषधीय वापरांशिवाय, अर्जुन झाड इमारती लाकूड, इंधन आणि आभूषणमय झाड म्हणून वापरले जाते. अर्जुन झाडाच्या शाखा एक रुंद मंडपासारख्या दिसतात, म्हणून ते छाया म्हणून रस्त्याच्या किनारी लावल्या जातात. हे झाड विहिरीसारख्या जलस्त्रोतांजवळ लावले गेल्याने वायुप्रदूषणाचे प्रभाव कमी करण्यात व पाणी ताजे ठेवण्यात मदत केल्याचे समजते. 

500 मिलीग्रॅम अर्जुन सालीचे पूड आठवडाभर अधिक सहप्रभाव होता घेतल्या जाऊ शकतात. पण, आदर्श मात्रा व्यक्तीच्या विविध शारीरिक आणि शरीरशास्त्रीय घटकांप्रमाणें वेगवेगळे राहील. म्हणून, तुमच्या आहारामध्ये कोणत्याही स्वरूपात अर्जुन साल घेण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेतलेले बरे राहील

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹599  ₹850  29% OFF
BUY NOW
  1. गरोदर आणि स्तनपान करणार्र्या महिलांवर अर्जुनाच्या प्रभावाबद्दल कसलेच संशोधन नव्हे. म्हणून, वैज्ञानिक प्रमाणाच्या अभावामध्ये, असे सुचवले जाते की तुम्ही एकतर गरोदर किंवा बालसंगोपन करणारे असल्यास, तुम्ही अर्जुन साल वापरणें टाळावे.
  2. टर्मिनॅलिआ रक्ताचा थक्का जमणें कमी करते, म्हणून तुम्ही रक्तस्राव विकारापासून त्रास असल्यास किंवा शस्त्रक्रिया करणार असल्यास, अर्जुनाचे साल वापरणें टाळणेंच बरे राहील.
  3. अर्जुनाच्या सालीचे काही शक्तिशाली हायपोग्लायसेमिक प्रभाव असतात, म्हणून तुमचे नैसर्गिक कमी रक्तशर्करा असल्यास किंवा औषध घेणारे मधुमेहग्रस्त व्यक्ती असल्यास, कोणत्याही रूपात अर्जुनाचे साल घेण्यापूर्वी डॉक्टराशी बोलणें सर्वोत्तम राहील.
  4. अर्जुन सालीच्या काही अज्ञात औषध प्रभाव नाहीत, पण तुम्ही एखाद्या विहित औषधीवर असल्यास, अर्जुन सालीचे पूरक तत्त्व वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेतलेले सर्वोत्तम राहील. 

Medicines / Products that contain Arjuna

संदर्भ

  1. Dwivedi S, Jauhari R. Beneficial effects of Terminalia arjuna in coronary artery disease. Indian Heart J. 1997 Sep-Oct;49(5):507-10. PMID: 9505018
  2. Shridhar Dwivedi, Deepti Chopra. J Tradit Complement Med. 2014 Oct-Dec; 4(4): 224–231. PMID: 25379463
  3. Maulik SK, Talwar KK. Therapeutic potential of Terminalia arjuna in cardiovascular disorders. Am J Cardiovasc Drugs. 2012 Jun 1;12(3):157-63. PMID: 22583146
  4. Maulik SK, Katiyar CK. Terminalia arjuna in cardiovascular diseases: making the transition from traditional to modern medicine in India. Curr Pharm Biotechnol. 2010 Dec;11(8):855-60. PMID: 20874682
  5. Sandhu JS et al. Effects of Withania somnifera (Ashwagandha) and Terminalia arjuna (Arjuna) on physical performance and cardiorespiratory endurance in healthy young adults. Int J Ayurveda Res. 2010 Jul;1(3):144-9. PMID: 21170205
  6. B. Ragavan, S. Krishnakumari. Antidiabetic effect ofT. arjuna bark extract in alloxan induced diabetic rats. Indian J Clin Biochem. 2006 Sep; 21(2): 123–128. PMID: 23105628
  7. Sivová V, Bera K, Ray B, Nosáľ S, Nosáľová G. Cough and Arabinogalactan Polysaccharide from the Bark of Terminalia Arjuna. Adv Exp Med Biol. 2016;935:43-52. PMID: 27334729
  8. Malik N, Dhawan V, Bahl A, Kaul D. Inhibitory effects of Terminalia arjuna on platelet activation in vitro in healthy subjects and patients with coronary artery disease. Platelets. 2009 May;20(3):183-90. PMID: 19437336
  9. Devi RS, Narayan S, Vani G, Shyamala Devi CS. Gastroprotective effect of Terminalia arjuna bark on diclofenac sodium induced gastric ulcer. Chem Biol Interact. 2007 Apr 5;167(1):71-83. Epub 2007 Feb 2. PMID: 17327128
  10. Devi RS et al. Ulcer protective effect of Terminalia arjuna on gastric mucosal defensive mechanism in experimental rats. Phytother Res. 2007 Aug;21(8):762-7. PMID: 17471603
  11. Shreya Mandal et al. Analysis of phytochemical profile of Terminalia arjuna bark extract with antioxidative and antimicrobial properties. Asian Pac J Trop Biomed. 2013 Dec; 3(12): 960–966. PMID: 24093787
Read on app