अस्वस्थता - Restlessness in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

May 04, 2019

March 06, 2020

अस्वस्थता
अस्वस्थता

अस्वस्थता काय आहे?

अस्वस्थता म्हणजे एका ठिकाणी राहण्याची अक्षमता किंवा हलल्याशिवाय सातत्याने एक गोष्ट करू न शकणे. हा एक विस्तृत शब्द आहे. यामध्ये चिन्हे आणि लक्षणे अनेक आहेत आणि भिन्न लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे दिसू शकतात. याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रभाव पडतात.

याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?

  • सामान्यतः अस्वस्थता हाइपरॲक्टिव्हिटीसारखी असते. याचा अर्थ असा की एक व्यक्ती एकाच ठिकाणी किंवा एकाच स्थानावर बसू शकत नाही आणि सतत स्थानांतरित करण्याची किंवा जागा बदलण्याची आवश्यकता भासते.
  • अस्वस्थ व्यक्तीला संभाषणात किंवा कामात जास्त वेळ घालवणे कठीण जाते.
  • ज्या लोकांना अस्वस्थता आहे त्यांना बसताना पायांमध्ये वेदनादायक कॅम्स देखील येऊ शकतात.
  • झिणझिण्या येण्याच्या संवेदना, स्तब्धता आणि अवयवांमध्ये थरथराट ही काही इतर चिन्हे आहेत.
  • अस्वस्थ व्यक्तीला नेहमी चिंता आणि दिशाहीनतेच्या झटक्यासह झोपेत अडचणी येतात.
  • गंभीर प्रकरणात, एखाद्याला थरथराट आणि घाम येणे देखील शक्य आहे.  

याची मुख्य कारणे काय आहेत?

  • अस्वस्थतेचे सर्वात सामान्य कारण औषधाशी संबंधित आहे. हे अनेक औषधांचे दुष्परिणाम असू शकतात, काही स्थितीसाठी औषधे दिली जातात जसे अटेन्शन डेफिसिटी हाइपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) आणि दमा तसेच अनेक शांती देणारी औषधे आणि अँटी- एमेटिक्स यांचे दुष्परिणाम असू शकतात.
  • अस्वस्थतेचे आणखी एक सामान्य कारण कॅफेनचे व्यसन किंवा जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीसारखे कॅफेन असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन आहे.
  • स्कित्झोफ्रेनिया, एडीएचडी, डिमेंशिया आणि चिंता यासारख्या न्यूरोलॉजिकल परिस्थितीमुळे अस्वस्थता होते.
  • हायपरथायरॉयडिज्ममधील हार्मोनल असंतुलनमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये अस्वस्थता वाढू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • प्रत्येक व्यक्तीत अस्वस्थता संबंधित आहे. लक्षणे आणि मागील वैद्यकीय इतिहासावर आधारित तज्ञांद्वारे याचे निदान केले जाते.
  • अस्वस्थता प्रत्येक व्यकीत विविध प्रकारे दिसून येते. म्हणून डॉक्टर वैद्यकीय इतिहास आणि लक्षणांची सखोल माहिती घेतात.
  • निदानापर्यंत पोहचण्यासाठी, डॉक्टर जीवनशैलीविषयी आणि आपण काही औषधे घेत असल्यास त्याबद्दल विचारपूस करुन शारीरिक तपासणी करतात.
  • फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंटऐवजी, अस्वस्थतेच्या उपचारांमध्ये जीवनशैली आणि सवयींमध्ये बदल करणे गरजेचे असते.
  • डॉक्टर झोपण्याच्या वेळा पाळायचा आणि रात्री पुरेसे विश्रांती घेण्याचा सल्ला देतील.
  • अस्वस्थता दूर करायला कॅफेनचे सेवन कमी करणे सुचवले जाते.
  • जर अस्वस्थता औषधामुळे असेल तर औषधाचे डोज बंद किंवा सुधारित करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे, कारण शरीरावर अपरिहार्य साइड इफेक्ट्स होऊ शकतात.
  • एडीएचडीसारख्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये किंवा स्कित्झोफ्रेनिया साठी योग्य सिडेटिव्ह किंवा ट्रॅन्क्विलाइझर निर्धारित केले जाऊ शकतात.



संदर्भ

  1. Hire, J. N. (1978). Anxiety and Caffeine. Sage Publishing; Psychological Reports, 42(3), 833–834. Vol. 42 Issue 3.
  2. Van Vracem M et al. Nighttime restlessness in people with dementia in residential care: an explorative field study.. Tijdschr Gerontol Geriatr. 2016 Apr;47(2):78-85. PMID: 26886877
  3. Regier NG,Gitlin LN. Towards defining restlessness in individuals with dementia. Aging Ment Health. 2017 May;21(5):543-552. PMID: 26743166
  4. Healthdirect Australia. Feeling restless. Australian government: Department of Health
  5. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Treatment of Patients Suffering From Nervous Restlessness.

अस्वस्थता साठी औषधे

Medicines listed below are available for अस्वस्थता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.