मनोविकृती (सायकॉसिस) - Psychosis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 08, 2019

March 06, 2020

मनोविकृती
मनोविकृती

मनोविकृती (सायकॉसिस) काय आहे?

मनोविकृती (सायकॉसिस) ही गंभीर मानसिक स्थिती आहे ज्यात व्यक्ती भास आणि भ्रमिष्ठपणा ने ग्रासला जातो आणि त्याचा वास्तविकतेसह कालबाह्य संबंध असतो. मनोविकृती (सायकॉसिस) ही गंभीर स्थिती आहे ज्यात तात्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते कारण लोकं जे या रोगाने ग्रासलेले आहेत ते स्वतःला किंवा त्यांच्या सभोवतालच्या लोकांना हानी पोहोचवू शकतात.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मनोविकृती (सायकॉसिस) ची अनेक निर्णायक चिन्हे आणि लक्षणे आहेत. त्यापैकी काही आहेत:

  • झोपेची कमी किंवा नेहमीपेक्षा जास्त झोप घेणे (विचलित झालेले झोपेचे चक्र).
  • उदासीनता.
  • चिंता.
  • भ्रम.
  • गैरसमजूत.
  • लक्ष केंद्रित करणे कठीण होणे.
  • कुटुंब आणि मित्रांमधून बाहेर पडणे.
  • आत्महत्या करण्याचे विचार येणे किंवा तशी कृती करणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

मानसिक आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये मनोविकृती (सायकॉसिस) होण्याची शक्यता जास्त असते. काही क्रोमोसोमनल डिसऑर्डरमुळे मनोविकृती (सायकॉसिस) होऊ शकतो. इतर संभाव्य कारणं:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कोणत्याही प्रकारच्या मानसिक विकारांचे निदान हे व्यक्तीचे अवलोकन आणि ते उत्तेजनांना कसा प्रतिसाद देतात आधारित असते. स्थितीबद्दल पुढील मदतीसाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी व्यक्तीस डॉक्टर एक मानसशास्त्रज्ञाचा संदर्भ देऊ शकतात.

अँटीसायकॉटिक्स सारखी औषधे, व्यक्तींना भास आणि भ्रमिष्ठपणा कमी करण्यास मदत करतात आणि वास्तविकता आणि अवास्तविक गोष्टींमध्ये स्पष्ट फरक विकसित करण्यात मदत करतात.

समुपदेशन आणि मनोचिकित्सा देखील सुचविले जाऊ शकते जे स्थितींमध्ये मदतगार ठरू शकते, विशेषत: बायपोलर किंवा मानसिक परिस्थितींमध्ये जेथे मानसिक आरोग्य सल्लागाराची नियमित सत्रे व्यक्तीस आरामदायक ठरू शकतात आणि वास्तविकतेसोबत जुळवून आणू शकतात.

मनोविकृती (सायकॉसिस) सोबत लढा देणे हे एक आव्हान आहे आणि सतत मदत आणि सहकार्य पुरवतांना कुटुंबातील सदस्यांकळून निर्धार आणि सहकार्य आवश्यक असते कारण, अशा परिस्थितीत, लोक स्वतःला सहसा कुटुंब आणि मित्रांपासून दूर असल्याचे समजतात.

 



संदर्भ

  1. American Academy of Child and Adolescent Psychiatry [Internet] Washington, D.C; Psychosis
  2. national ins
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Psychosis
  4. Mental Health. Psychotic Disorders. U.S. Department of Health & Human Services, Washington, D.C. [Internet]
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Psychosis
  6. healthdirect Australia. Psychosis. Australian government: Department of Health

मनोविकृती (सायकॉसिस) साठी औषधे

Medicines listed below are available for मनोविकृती (सायकॉसिस). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.