पेरिफेरियल न्यूरोपॅथी - Peripheral Neuropathy in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

May 09, 2019

March 06, 2020

पेरिफेरियल न्यूरोपॅथी
पेरिफेरियल न्यूरोपॅथी

पेरिफेरियल न्यूरोपॅथी काय आहे?

पेरिफेरियल मज्जासंस्था ही शरीरातील संदेश पोहोचवण्याची संस्था आहे जी सेंट्रल मज्जा संस्थेकडून येणारे संदेश मेंदू आणि पाठीचा कणा, आणि इतर शरीरातील भागाततून येणाऱ्या संदेशाच्या दळणवळणाचे काम करते. ह्या संदेशामध्ये इंद्रियांकडून येणारे संदेश जसे थंड हात, स्नायूंच्या आकुंचनाने संदेश जे शरीराच्या हालचालीला मदत करतात, आणि इतर. पेरिफेरियल मज्जासंस्थेला इजा होण्याला पेरिफेरियल न्यूरोपॅथी म्हणतात.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कोणत्या नर्व्हला इजा झाली आहे यावर त्यांचे लक्षणे आणि चिन्हे अवलंबून आहेत.

  • मोटर नर्व्ह ला इजा होणे
    स्नायूमध्ये क्रॅम्प्स येतात, स्नायू अशक्त होतात, स्नायूला लचक बसने किंवा आकुंचने .
  • सेन्सरी नर्व्ह ला इजा होणे
    यामुळे संवेदना जाणून घेण्यास जसे स्पर्श, वेदना आणि तापमानातील बदल असमर्थता येते, आणि मोटर कॉर्डीनेशन जसे चालणे, बटन लावणे, इत्यादी करणे कठीण जाते.
  • ऑटोनॉमिक नर्व्ह ला इजा होणे
    ह्यामुळे घाम येणे पलटते, गरमी सहन होत नाही, आणि आतील अवयवांशी संबधित प्रश्न निर्माण होते.

याचे मुख्य कारण काय आहे ?

पेरिफेरियल न्यूरोपॅथी चे जास्त प्रचलित असलेले कारण म्हणजे मधूमेह होय. आरोग्याशी संबंधित इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

पेरिफेरियल न्यूरोपॅथी च्या निदानामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • मधूमेह आणि व्हिटॅमिन्स च्या कमतरते च्या निदानासाठी रक्ताची चाचणी.
  • नर्व्ह कंडक्शन चाचणी.
  • एक्स-रे, सीटी स्कॅन आणि मॅग्नेटिक रिजोनान्स इमेजिंग (एमआरआय) सारख्या  इमेजिंग पद्धती .
  • इलेकट्रोमायोग्राफी.
  • नर्व्ह बायोप्सी.

पेरिफेरियल न्यूरोपॅथी चे उपचार कारणावर उपचार करून आणि लक्षणांना कमी करून केले जातात. खालील उपचारासाठी वापरण्यात  येणाऱ्या नेहमीच्या पद्धती आहे:

  • मधुमेहावर उपचार आणि तो कमी करणे.
  • व्हिटॅमिन्स चे इंजेकशन देणे किंवा तोंडावाटे सप्लिमेंट्स देणे.
  • एखाद्या औषधामुळे हा रोग होत असेल तर ते बंद करणे .
  • कॉर्टिकोस्टेरॉइड्स.
  • इम्युनोग्लोब्युलिन इंजेकशन.
  • इम्यूनोसप्रेसंट.
  • नर्व्ह च्या दुखण्यासाठी वेदनाशामक औषधे देणे.
  • संवेदना कमी झाल्यामूळे पायाला इजा होण्यापासून वाचवण्यापासून नेहमीच मोजे किंवा शुज घालून राहणे. 



संदर्भ

  1. National Institute of Neurological Disorders and Stroke [internet]. US Department of Health and Human Services; Peripheral Neuropathy Fact Sheet.
  2. National Health Service [Internet]. UK; Peripheral neuropathy.
  3. The Foundation for Peripheral Neuropathy [Internet]: Buffalo Grove, IL; What Is Peripheral Neuropathy?
  4. National Health Service [Internet]. UK; Causes.
  5. National Health Service [Internet]. UK; Diagnosis.

पेरिफेरियल न्यूरोपॅथी चे डॉक्टर

Dr. Vinayak Jatale Dr. Vinayak Jatale Neurology
3 Years of Experience
Dr. Sameer Arora Dr. Sameer Arora Neurology
10 Years of Experience
Dr. Khursheed Kazmi Dr. Khursheed Kazmi Neurology
10 Years of Experience
Dr. Muthukani S Dr. Muthukani S Neurology
4 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

पेरिफेरियल न्यूरोपॅथी साठी औषधे

Medicines listed below are available for पेरिफेरियल न्यूरोपॅथी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.