पोषक तत्वाची कमतरता - Nutritional Deficiency in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 26, 2019

July 31, 2020

पोषक तत्वाची कमतरता
पोषक तत्वाची कमतरता

पोषक तत्वाची कमतरता म्हणजे काय?

चांगले आरोग्य व कार्यासाठी पुरेसा आहार आवश्यक असतो. तुम्हाला चांगला आहार हा फॅट्स कार्बोहायड्रेट्सप्रथिने सारख्या मोठ्या आहारद्रव्यातून मिळतो तसेच छोटी आहारद्रव्ये जसे व्हिटॅमिन, मिनरल्स, ॲमिनो ॲसिड्स सुद्धा चांगले आरोग्य कायम राखण्यासाठी महत्त्वाचे काम करतात. जेव्हा शरीराला आहारातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा त्याला पोषक तत्वाची कमतरता म्हणतात. ही पूर्ण जगभरातील समस्या असून त्यातील छोट्या आहारद्रव्याच्या कमतरतेची लोकसंख्या भारतात आहे.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

आहाराच्या कमतरतेमध्ये अनेक आहारद्रव्यांपैकी कोणत्याही आहारद्रव्याची कमतरता असू शकते; त्यामुळे लक्षणे ही विशिष्ट आहारद्रव्याच्या कमतरतेशी निगडित असतात. चिन्हे व लक्षणे ही दैनंदिन जीवनात दिसून येऊ शकतात. आहाराच्या कमतरतेशी निगडित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

याची प्रमुख कारणे काय आहेत?

आहारातील कमतरतेची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • पुरेसा आहार न घेणे, आहारात आवश्यक आहारद्रव्यांची कमतरता.
  • शरिराकडून कमी आहार द्रव्यांचे शोषण.
  • मोठ्या आतड्याचा कर्करोग.
  • क्रोन चा आजार.
  • आतड्यातील आहार द्रव्यांचा असंतुलित प्रवाह.
  • पोटातील संसर्ग.
  • पचन संस्थेमधील जळजळ.
  • औषधोपाचार.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

आहारद्रव्यांच्या कमतरतेमुळे विविध आजार होऊ शकतात, त्यामुळे निदान करणे गरजेचे असते. प्राथमिक पातळीवर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास विचारात घेतला जातो व खालील चाचण्या केल्या जातात:

  • शारीरिक तपासणी.
  • बॉडी मास इंडेक्स काढणे.
  • रक्तातील व्हिटॅमिन व मिनरलचे शोषण शोधण्यासाठी रक्त तपासणी.
  • अल्ट्रासाऊंड चाचणी.

उपचार पद्धती निदान झालेल्या आहार द्रव्यांच्या कमतरतेवर अवलंबुन असते. आहाराचे उपचार खालील प्रमाणे आहेत:

  • तोंडावाटे किंवा इंजेक्शन वाटे आहार द्रव्यांचा पुरवठा.
  • कमतरता व कमतरतेचे कारण यावर औषधांद्वारे उपचार.
  • भरपूर आहार द्रव्यांसह अन्न.

बऱ्याच आहारातील कमतरतेची लक्षणे लवकर कळत नाहीत व गंभीर झाल्यानंतर त्यांचे निदान होते, लवकर निदान करणे आवश्यक असते व कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. एक उत्तम आहार व आवश्यक आहार द्रव्यांच्या पुरवठ्यामुळे आहारातील कमतरता भरून येते व चांगले आरोग्य मिळते. सर्वशिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य योजनेद्वारे सरकार कष्ट घेत असून त्यामध्ये उत्तम अन्न पदार्थ व आहारातील कमतरता कमी करण्यासाठी संतुलित आहार पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.



संदर्भ

  1. Mrigen Kr. Deka et al. Dietary pattern and nutritional deficiencies among urban adolescents . J Family Med Prim Care. 2015 Jul-Sep; 4(3): 364–368. PMID: 26288775
  2. Jenkins DJA et al. Supplemental Vitamins and Minerals for CVD Prevention and Treatment. J Am Coll Cardiol. 2018 Jun 5;71(22):2570-2584. PMID: 29852980
  3. Bruins MJ et al. Considerations for Secondary Prevention of Nutritional Deficiencies in High-Risk Groups in High-Income Countries. Nutrients. 2018 Jan 5;10(1). pii: E47. PMID: 29304025
  4. National Health Portal [Internet] India; Healthy Nutrition and Nutritional Disorders
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Nutrition - women's extra needs
  6. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Vitamin and mineral supplements
  7. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; WHO estimates of vitamin and mineral deficiencies.

पोषक तत्वाची कमतरता चे डॉक्टर

Dr. Dhanamjaya D Dr. Dhanamjaya D Nutritionist
15 Years of Experience
Dt. Surbhi Upadhyay Dt. Surbhi Upadhyay Nutritionist
3 Years of Experience
Dt. Manjari Purwar Dt. Manjari Purwar Nutritionist
11 Years of Experience
Dt. Akanksha Mishra Dt. Akanksha Mishra Nutritionist
8 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

पोषक तत्वाची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for पोषक तत्वाची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.