न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर - Neuroendocrine Tumour in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 26, 2019

July 31, 2020

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर
न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर काय आहे?

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर ला कर्करोगक्षम असेही म्हणतात आणि हा अशा सेल्स चा ट्यूमर आहे जे हार्मोन्स ची निर्मिति करतात आणि मज्जातंतू चे पण कार्य करतात, त्याला न्यूरोएंडोक्राइन सेल्स म्हणतात. ह्या ट्यूमर ची वाढ नेहमी हळू होते. ते शरीराच्या कोणत्याही भागात वाढू शकतात. हे मॅलिग्नन्ट (कॅन्सरस ) किंवा बेनाइन (नॉन कॅन्सरस ) असतात.

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याचे मूख्य कारणे काय आहेत?

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर चे ठळक कारणे माहित नाही आहे. जर खालील अनुवांशिक गोष्टींचा समावेश असेल तर न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होण्याची शक्यता वाढते.

  • मल्टिपल एंडोक्राइन नेओप्लासिया प्रकार 1.
  • न्यूरोफायब्रोमॅटोसिस टाईप 1.
  • वोन हिप्पल -लिंडाऊ सिंड्रोम .

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

न्यूरोएंडोक्राइन रोगाचे निदान करण्यासाठी खालील टेस्ट दिल्या आहेत :

  • रक्त चाचणी.
  • टिशू ची बायोप्सी.
  • जेनेटिक टेस्टिंग आणि कौन्सलिंग .
  • खालील गोष्टींचे स्कॅन करणे:
    • अल्ट्रासाऊंड.
    • संगणकीय टोमोग्राफी.
    • मॅग्नेटिक रेजोनान्स इमेजिंग.
    • पोजिट्रॉन एमिशन टोमोग्राफी.
    • ऑक्टरिओटाइड स्कॅन - या स्कॅन मध्ये सौम्य रेडिओॲक्टिव्ह द्रव नसेमध्ये सोडले जाते आणि कॅमेरा मधून कर्करोगाच्या पेशीं आहे की नाही हे बघितले जाते.
    • लॅप्रोस्कोपी.
    • न्यूक्लिअर मेडिसिन इमेजिंग.

न्यूरोएंडोक्राइन रोगाचे उपचार त्याच्या जागेवर, ट्यूमर ची तीव्रता आणि रुग्णाची संपूर्ण आरोग्य क्षमतेवर अवलंबून असते. या रोगासाठी खालील उपचार उपलब्ध आहे.

  • शस्त्रक्रिया: लोकल ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढला जातो आणि ही प्राथमिक उपचार पद्धती समजली जाते.
  • गुंतागुंतीचा किंवा गंभीर न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर वर उपचार करायला  केमोथेरपी ,हार्मोन थेरपी आणि /किंवा टारगेटेड थेरपी चा उपयोग करतात.
  • औषधे: सोमॅटोस्टॅटिन ॲनालॉग (ऑक्त्रेओटाइड किंवा लँरीओटाइड) बऱ्याच हार्मोन ची वाढ थांबवते आणि लक्षणांची तीव्रता कमी करते आणि रोगाची वाढ हळू करते.
  • रेडिओथेरपी: ट्यूमर ला कमी करते किंवा एक्स-रे किंवा गॅमा किरणांचा वापर करून रक्त वाहिन्याला अटकाव करते त्यामुळे ट्यूमर ची वाढ थांबते.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Neuroendocrine tumours.
  2. Canadian Cancer Society [Internet]: Toronto,Canada; Neuroendocrine tumours.
  3. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Neuroendocrine tumor.
  4. National Organization for Rare Disorders [Internet]; Neuroendocrine tumor.
  5. Oronsky B, Ma PC, Morgensztern D, Carter CA. Nothing But NET: A Review of Neuroendocrine Tumors and Carcinomas. Neoplasia. 19(12):991-1002. doi: 10.1016/j.neo.2017.09.002. Epub 2017 Nov 5. PubMed PMID: 29091800; PubMed Central PMCID: PMC5678742.