गुडघेदुखी - Knee Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

January 26, 2019

March 06, 2020

गुडघेदुखी
गुडघेदुखी

सारांश

कोणत्याही व्यक्तीच्या उतारवयात किंवा इतर शब्दांत म्हटल्यास वाढत्या वयात, गुडघे दुखणें ही साधारण बाब आहे. गुडघे दुखणें म्हणजे विश्रांती करत असतांना, चालतांना किंवा दैनंदिन कृती करत असतांना गुडघ्याच्या सांध्यामध्ये जाणवणारी वेदना. बहुतांश वेळा, तिचे कारण तंतूच्या वाढीव अशक्ततेमुळे शेजारील तंतूंना झालेली हानी असे असते. या कारणाशिवाय, गुडघे दुखणें अपघातात्मक इजा किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या अतिशय वापरामुळेही होऊ शकते. गुडघे दुखण्याचे निदान व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहास, रक्तचाचणी आणि क्षकिरण आणि अल्ट्रासोनोग्राफी यांसारख्या काही रेडिओलॉजिकल चाचणींच्या आधारे डॉक्टरांद्वारे सहज केले जाऊ शकते. गुडघे दुखण्यावर उपचार या वेदनेमागील अंतर्निहित कारणाला हाताळून केले जाऊ शकतात उदा. लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करणें. सोबत लक्षणात्मक उपचार उदा. आइस पॅक लावणें आणि विश्रांती हे सुद्धा दिले जातात. यावरील इतर उपचार पर्यायांमध्ये फिझिओथेरपी आणि एक्युपंचराचाही सल्ला दिला जाऊ शकतात. गुडघे दुखणें या उपचारानंतरही टिकून राहत असल्यास, शस्त्रक्रियेची गरज देखील पडू शकते. गुडघे दुखण्यावरील उपचारात प्रगती झपाट्याने होते, पण यामागील कारणाचे निदान डॉक्टरांना वेळेवर न झाल्यास, वेदनेत बिघाड किंवा गुडघ्याचा सांधा पूर्णपणें खराब होणें असे होऊ शकते. गुडघ्याचा सांधा विविध शारीरिक हालचाली उदा. चालणें, पळणें, एखादा खेळ खेळणें आणि दैनंदिन कामांसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणून, गुडघ्याची कायमस्वरूपी क्षती टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घेणें हितावह आहे.

गुडघेदुखी ची कारणे - Causes of Knee Pain in Marathi

गुडघे दुखणें याच्या टिकाव धरण्यामागे अनेक कारणे आणि धोक्याची घटके असू शकतात. अधिकतर कारणे परिवर्तनीय असतात आणि बाकीची बरी होण्यासारखी असतात. म्हणून, तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचा पालन केले तर , गुडघे दुखणें पूर्णपणें बरी होणें शक्य आहे.

कारणे

गुडघे दुखण्याची कारणे आहेत:

  • शारीरिक इजा
    रस्त्यावरील एखादे अपघात किंवा कठोर प्रकारच्या व्यायामामुळे होणारी शारीरिक इजा गुडघ्याचा सांध्याभोवतीच्या मऊ तंतूची क्षती यामागील कारण असू शकते किंवा अशा इजेमुळे तेथील हाडांच्या ढाच्याला इजा घडवू शकते. अशा इजांमुळे गुडघे दुखणें सुरू होतात. खेळाडूंमध्ये, गुडघ्याचा सांध्याला समर्थन करणारी उशी फाटणें, जिला मेनिस्कल टिअर असे देखील म्हणतात, गुडघेदुखीचे सामान्य कारण आहे.
  • संक्रमण
    गुडघ्याचा सांध्यात संक्रमण झाल्यामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते.
  • बेकर्स सिस्ट
    गुडघ्याचा सांध्यामध्ये काही प्रमाणात तरळ पदार्थ असतो. याला सिनोव्हिअल तरळ पदार्थ देखील म्हणतात, ज्यामुळे खरड टळते आणि सांध्याची सहज हालचालही शक्य होते. कधीकधी सिनोव्हिल तरळ पदार्थाचे अती उत्पादन होते, ज्यामुळे तो तरळ पदार्थ तुमच्या गुडघ्याच्या मागील भागात जमा होतो. या तरळ पदार्थ संग्रहामुळे गुडघ्यांमध्ये बेकर्स सिस्ट नावाचे वळू तयार होऊ शकते. यामुळे देखील रुग्णाच्या गुडघ्याचा सांध्यामध्ये घट्टपणा किंवा वेदना होऊ शकते.
  • अस्थींचे आर्थरायटीस
    अस्थींचे आर्थरायटीस या वैद्यकीय अवस्थेमध्ये, तुमच्या गुडघ्याचा सांध्यातील तंतू जाड होतात आणि कार्टिलेजची क्षती होते, ज्यामुळे गुडघे दुखणें सुरू होतात.
  • संधिवातात्मक आर्थरायटीस
    संधिवातात्मक आर्थरायटीस ही एक स्वयं प्रतिरोध अवस्था आहे, ज्यामध्ये प्रतिरोध प्रणाली शरिराच्या स्वतंच्या तंतू नष्ट करते, ज्यामुळे संपूर्ण शरिरातील सांध्यांत वेदना व त्यांची क्षती होते. या अवस्थेत दोन्ही गुडघ्याचा सांध्यांची क्षती होते. बहुतांश प्रसंगांमध्ये, बोटांतील सांध्यांवर प्रभाव पहिले पडतो, आणि आजारात वाढ झाली की, गुडघे, टाच आणि मनगटाचे सांधे देखील प्रभावित होतात.
  • गाऊट
    गाऊट ही सांध्यांची एक वेदनामय अवस्था आहे, जी शरिरात युरिक एसिड वाढल्यामुळे होते.

गुडघेदुखी चा उपचार - Treatment of Knee Pain in Marathi

गुडघेदुखी वेळेत उपचार न केल्यास बळावू शकते, म्हणून तुमच्या गुडघेदुखीचे नेमक्या कारणाचे निदान करून योग्य उपचार सुरू करून घेण्यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांना भेट देण्यापूर्वी तुम्ही वेदनेत आराम मिळावा, म्हणून काही घरगुती उपाय करून पाहू शकता, पण त्याने वेदनेवर तोडगा निघणार नाही.

  • घरगुती
    सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या वेदने आराम मिळण्यासाठी काही तात्कालिक घरगुती उपाय वापरले जाऊ शकतात, उदा. राइस थेरपी जिच्यामध्ये विश्रांती, बरफ, दाब आणि उभारीचा समावेश असतो.
    • विश्रांती
      गुडघेदुखीत आराम मिळण्यासाठी, विश्रांती उपचाराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. कोणतीही हालचाल करत असतांना गुडघेदुखी जाणवल्यास, गुडघ्याचा सांध्यात अजून वेदना व क्षती टाळण्याकरिता ती हालचाल त्वरीत थांबवली पाहिजे.
    • आइस पॅक
      दिवसातून अधूनमधून व झोपायला जाण्यापूर्वी, आइस पॅक लावून गुडघ्याचा सांध्याभोवतीची वेदना व लालसरपणा कमी केला जाऊ शकतो.
    • कंप्रेशन बॅंडेज (दाबणारी पट्टी)
      गुडघ्याचा सांध्याभोवती एक पट्टी (अत्यधिक घट्ट किंवा अत्यधिक सैल नसलेली) गुंडाळली जाऊ शकते, म्हणजे लिगामेंट योग्य पवित्र्यात राहील व वेदनेत आराम मिळेल. ती संपूर्ण दिवस वापरली जाऊ शकते, पण रात्री काढून ठेवावी.
    • उभार
      गुडघ्याचा सांध्याखाली उश्या ठेवून गुडघ्याला उभार दिल्यास, वेदना कमी होऊन सांध्याला विसावा मिळेल.

घरगुती उपायांनी वेदनेत आराम न मिळाल्यास, डॉक्टर तुम्हाला पुढील सल्ला देऊ शकतात:

  • विश्रांती
    तुमचे डॉक्टर काही औषधांसह, तुम्हाला विश्रांतीचाही सल्ला देतील. गुडघ्याचा सांध्याला विश्रांती दिल्याने आराम मिळते आणि क्षती किंवा संक्रमण असल्यास, आपण लवकर बरे होता.
  • वेदनाशामक
    सहज मिळणारी औषधे उदा. बिगरस्टेरॉयड दाहशामके (एनसेड्स) , ज्यामध्ये पॅरासिटमॉल आणि आयबूप्रोफेनचाही समावेश असतो, तुम्हाला सौम्य ते मध्यम वेदनेत आराम देऊ शकतात, पण तीव्र वेदनेच्या प्रसंगी, तुमचे डॉक्टर इंजेक्शन घेण्याचा किंवा रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला देतील.
  • फिझिओथेरपी
    फिझिओथेरपिस्ट डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली फिझिओथेरपी घेतल्यानेही गुडघेदुखी कमी होते. तसेच, नियमित थेरपीने अधिकतर  प्रसंगांत पूर्णपणें वेदना बरी होऊ शकते.
  • एक्युपंक्चर
    एक्युपंक्चर नसांचे एक प्रकारचे संवेदनात्मक संप्रेरण आहे, ज्याने वेदनेत आराम मिळण्यास मदत होते. बहुतांशी घातक स्वरूपाच्या वेदनेत वापरली जाणारे ते एक प्रसिद्ध बिगरऔषधशास्त्रीय उपचारही आहे.
  • शस्त्रक्रिया
    फिझिओथेरपी किंवा औषधांमुळे वेदनेत आराम न मिळाल्यास, डॉक्टर अंतर्निहित कारणाप्रमाणें शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. गुडघेदुखीच्या उपचारातील काही प्रसिद्ध शस्त्रक्रिया पद्धती याप्रकारे आहेत:
    • लिगामेंटची दुरुस्ती
      गुडघ्याचा सांध्याला लिंगामेट नावाच्या जाड पट्टीमय ढाच्यांचा आधार असतो. इजेमुळे, हे ढाचे क्षतीग्रस्त होऊन गुडघ्याचा सांध्यात वेदना होऊ शकते. या लिगामेंटना शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम आधार देऊन दुरुस्त केले जाते.
    • संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण
      गुडघ्याचा सांध्याला झालेली क्षती उपचारयोग्य नसल्यास किंवा लिगामेंटची दुरुस्ती शक्य नसल्यास, डॉक्टर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला देतात , ज्यामध्ये गुडघ्याच्या क्षतीग्रस्त भागांना धातू व प्लास्टिकच्या भागांनी बदलले जाते. शस्त्रक्रिया पद्धत असल्यामुळे, शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी 2-3 महिने पर्याप्त पूर्ण विश्रांती घेणें आणि पूर्ण बरे होईपर्यंत कृत्रिम गुडघ्याचे कमीत कमी वापर करणें यांद्वारे संपूर्णपणें बरा होता येते. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपणामुळे वेदनेत व हालचालीतही सुधार होतो.
    • डिब्राइडमेंट
      या पद्धतीमध्ये, एका छोट्या एपर्चरद्वारे, गुडघ्याच्या सांध्यामध्ये आर्थ्रोस्कोप नावाचे उपकरण प्रविष्ट केले जाते आणि गुडघ्याच्या सांध्यामधील काही जोडी आणि लहान निकामी तंतू काढले जातात. या जोडी म्हणजे तंतूमय बुरसाद्वारे काही संयोजक तंतू, हाडे किंवा टेंडन एकामेकाशी जोडल्याने (एखादे अपघात किंवा धक्क्याचे परिणाम म्हणून) होतात. याद्वारे गुडघ्याच्या सांध्याचे कार्य सुधारते.

जीवनशैली व्यवस्थापन

जीवनशैली व्यवस्थापनाची गुडघेदुखी निवारणामध्ये काहीशी मदत होते, पण उतारवयासारखी घटके परिवर्तनीय नाहीत. म्हणून, अशा प्रसंगी, डॉक्टरांचा सल्ला घेऊ फायद्याचे ठरेल. गुडघेदुखी कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनातील खालील बाबींचा समावेश तुम्ही करू शकता:

  • वजन कमी करणें
    लठ्ठपण्याच्या प्रसंगी, वजन कमी करणें गुडघेदुखी कमी करण्यात खूप मदतीचे असू शकते. वजन कमी करण्यासाठी, तुम्ही कमी कार्बोदके आणि अधिक प्रथिने असलेल्या  निरोगी आहारयोजनेचे पालन केले पाहिजे. तसेच, कमीत कमी 8-10 पेले पाणी घ्या व कमीत कमी 5 दिवस कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. (अधिक वाचा - वजनघट आहार तक्ता)
  • सबलीकरण व्यायाम
    कठोर व्यायाम करण्याऐवजी शरिराच्या खालच्या भाग सबळ करण्यासाठी काही व्यायाम करून पहा, ज्याने वेदना कमी होऊन तुमच्या गुडघ्याच्या सांध्याची शक्तीही वाढेल. योग्य व्यायामतंत्र अवलंबण्यासाठी नेहमी तज्ञ प्रशिक्षकाचा सल्ला घ्यावा.


संदर्भ

  1. Neogi T. The Epidemiology and Impact of Pain in Osteoarthritis. Osteoarthritis and cartilage / OARS, Osteoarthritis Research Society. 2013; 21(9):1145-1153. PMID: 23973124
  2. Grime J, Richardson JC, Ong BN. Perceptions of joint pain and feeling well in older people who reported being healthy: a qualitative study. The British Journal of General Practice. 2010; 60(577):597-603. PMID: 20822692
  3. Heidari B. Knee osteoarthritis prevalence, risk factors, pathogenesis and features: Part I. Caspian Journal of Internal Medicine. 2011; 2(2):205-212. PMID: 24024017
  4. Hochman JR, Gagliese L, Davis A.M.,Hawker G.A. Neuropathic pain symptoms in a community knee OA cohort. Osteoarthritis Cartilage.2011; 19: 647-654. PMID: 21440077
  5. Ciszkiewicz, A., Lorkowski, J., & Milewski, G. (2018). A novel planning solution for semi-autonomous aspiration of Baker’s cysts. The International Journal of Medical Robotics and Computer Assisted Surgery, 14(2), e1882.
  6. Hill C.L.,Gale D.G.,Chaisson C.E.,Skinner K., Kazis L.,Gale M.E., Felson D.T. Knee effusions, popliteal cysts, and synovial thickening: association with knee pain in osteoarthritis. The Journal of Rheumatology. June 2001; 28 (6):1330-1337. PMID: 11409127
  7. Felson DT, Lawrence RC, Dieppe PA, Hirsch R, Helmick CG, Jordan JM, et al. Osteoarthritis: new insights. Part 1: the disease and its risk factors. Ann Intern Med. 2000; 133:635–46. PMID: 11033593
  8. Webb R, Brammah T, Lunt M, Urwin M, Allison T, & Symmons D. Opportunities for prevention of ‘clinically significant’ knee pain: results from a population-based cross-sectional survey. J Public Health (Oxf). 2004; 26:277–84. PMID: 15454597
  9. Calmbach WL, Hutchens M. American Family Physician [01 Sep 2003, 68(5):907-912.
  10. Peat G, McCarney R, & Croft P. Knee pain and osteoarthritis in older adults: a review of community burden and current use of primary health care. Annals of the Rheumatic Diseases 2001; 60:91-97. PMID: 11156538
  11. Bjordal JM, Ljunggren AE, Klovning A, Slørdal L. Non-steroidal anti-inflammatory drugs, including cyclo-oxygenase-2 inhibitors, in osteoarthritic knee pain: meta-analysis of randomised placebo controlled trials. Bmj. 2004 Dec 2;329(7478):1317. PMID: 15561731
  12. White A, Foster NE, Cummings M, Barlas P. Acupuncture treatment for chronic knee pain: a systematic review. Rheumatology. 2007 Jan 10;46(3):384-90. PMID: 17215263
  13. Bennell K.L., Hinman R.S. A review of the clinical evidence for exercise in osteoarthritis of the hip and knee. Journal of Science and Medicine in Sport.2011; 14: 4-9. PMID: 20851051
  14. Iwamoto, M., Ohta, Y., Larmour, C., & Enomoto-Iwamoto, M. (2013). Toward regeneration of articular cartilage. Birth Defects Research Part C: Embryo Today: Reviews, 99(3), 192–202. PMID: 24078496

गुडघेदुखी साठी औषधे

Medicines listed below are available for गुडघेदुखी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for गुडघेदुखी

Number of tests are available for गुडघेदुखी. We have listed commonly prescribed tests below: