उष्माघात - Heat Stroke in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 05, 2018

July 31, 2020

उष्माघात
उष्माघात

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात ही एक वैद्यकीय गंभीर अवस्था आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, आणि सूर्याच्या गरमीमुळे शरीर स्वतः चे तापमान सामान्य पातळीवर टिकवून ठेवू  शकत नाही. सामान्यतः,आपले शरीर उच्च तापमानात घामाद्वारे थंड होते पण या परिस्थितीत असे होत नाही. उष्णतेसंबंधी आजार मुख्यतः उन्हाळ्यात होताना दिसून येतात आणि ते सुद्धा बराच वेळ उन्हात उभा  राहिल्याने होतो. याचा प्रभाव जास्तीत जास्त लहान मुले आणि वृद्धांवर होतो. जी व्यक्ती सतत बाहेर काम करते त्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. जर लवकरात लवकर उपचार केला नाही, तर यामुळे शरीरातील आतील अवयवांना नुकसान होऊ शकते त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

भारतीय डेटा हे दर्शवतो की वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढते.

याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?

उष्माघाताने प्रभावित असलेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसू शकतात:

याचे मुख्य कारण काय आहे?

याचे मुख्य कारण उन्हात जास्त वेळ राहणे आणि जे  लोकं उन्हात कष्टाची किंवा साधी कामे करतात त्यांना हा त्रास होऊ शकतो. उष्माघाताचा जास्त परिणाम ज्या व्यक्तींवर होतो ते म्हणजे:

  • लहान बाळ.
  • वृद्ध व्यक्ती.
  • बाहेर काम करणारे कामगार.
  • लठ्ठ व्यक्ती. (अधिक वाचा: लठ्ठपणावर उपचार)
  • मानसिक आजार असलेले व्यक्ती.
  • मद्याचे सेवन करणारे.
  • जे पाण्याचे/ द्रवाचे सेवन कमी करतात, त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते.

याचे  निदान आणि  उपचार काय आहे?

ज्या व्यक्तीला उष्माघात झाला आहे सर्वप्रथम त्याला एखाद्या सावलीच्या आणि थंड जागेत आणावे. नंतर, ओला टॉवेल वापरून किंवा हवा घालून शरीराचे तापमान कमी करावे. शक्य असल्यास काखेत आणि जांघेत आइस पॅक ठेवावा. या प्रथमोपचारानंतर  रुग्णाला दवाखान्यात घेऊन जावे.

दवाखान्यात, डॉक्टर रुग्णाची परिस्थिती बघून आवश्यक ते उपचार करतील, उदा. श्वास घ्यायला त्रास होत असेल तर, त्यावर आवश्यक उपचार करतील. डॉक्टर जोपर्यंत शरीराचं सामान्य तापमान ( 38 डिग्री सेल्सिअस) होत नाही तोपर्यंत ते कमी करत राहतील. इतर कारणे आहे का हे शोधण्यासाठी काही टेस्ट केल्या जातील. तूम्ही स्वतःला उष्माघात होण्यापासून वाचवू शकता जर तुम्ही:

  • भरपूर पाणी पिऊन योग्य हायड्रेशन ठेवा.
  • हलके आणि लूज फिटिंग चे कपडे घाला.
  • दुपारी 12  ते 3 च्या दरम्यान उन्हात जास्त वेळ थांबू नका.
  • टोपी किंवा रुमाल घाला किंवा छत्रीचा वापर करा. 



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Warning Signs and Symptoms of Heat-Related Illness
  2. Health Link. Emergency First Aid for Heatstroke. British Columbia. [internet].
  3. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood (KS); Management of Heatstroke and Heat Exhaustion
  4. University of Connecticut. Heat stroke prevention. Connecticut, USA. [internet].
  5. Australian Red Cross. Heatstroke and heat exhaustion. Melbourne, Australia. [internet].

उष्माघात साठी औषधे

Medicines listed below are available for उष्माघात. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.