क्लॅमिडिया - Chlamydia in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 29, 2018

July 31, 2020

क्लॅमिडिया
क्लॅमिडिया

क्लॅमिडीया काय आहे?

क्लॅमिडीया हा लैंगिक संबंधातून संक्रमित होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. तो स्त्री आणि पुरूष दोघांमधे आढळतो. हा संसर्ग क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या जीवाणूमुळे होतो.

एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग एकदा झाला असेल तर त्या व्यक्तीला ह्या जिवाणूमुळे पुन:संक्रमणाचा धोका असतो.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

काही व्यक्तींना क्लॅमिडीया संसर्ग असू शकतो परंतु जोपर्यंत ती व्यक्ती दुसऱ्या एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत ह्या रोगाची लक्षणे दिसत नाहीत.

पुरूषांमधील सर्वसामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहे:

  • लघवी करताना जळजळ होणे.
  • शिस्नावाटे डिस्चार्ज होणे आणि तेव्हा जळजळ होणे.

स्त्रियांमधील लक्षणे:

लहान बाळामधील संसर्गाची लक्षणे तशीच असतात जी साधारणपणे डोळे आणि फुफ्फुसाच्या संसर्गामधे आढळून येतात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

  • क्लॅमॅडियाचा संसर्ग शारिरीक संबंधातून होऊ शकतो. संसर्गित व्यक्तीशी मौखिक, गुद किंवा योनी संबंधामुळे क्लॅमॅडिया संसर्गाचा धोका संभवतो.
  • एका संसर्गित आई मुळे जन्माच्या वेळी नवजात बाळाला होऊ शकते.
  • असुरक्षित संभोग, एकापेक्षा जास्त व्यक्तिंशी शारीरिक संबंध ठेवणे यामुळे फक्त क्लॅमिडीया संसर्गाचाच नाही तर इतर लैंगिक संसर्गांचा पण धोका संभवतो. (आणखी वाचा: सुरक्षित शारीरिक संबंध कसे बनवावे)

ह्याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

  • जर तुम्हाला क्लॅमिडिया संसर्गाची शंका असेल परंतु त्याची लक्षणे दिसत नसतील तर डॉक्टरला तुमच्या लैंगिक पूर्वेतिहासाची माहिती देणे महत्वाचे आहे.
  • संसर्ग तपासणीसाठी स्त्रियांच्या योनीस्त्रावाचा नमुना घेतला जातो.
  • पुरूषांची मूत्र तपासणी केली जाते.

उपचार खालीलप्रमाणे आहेत:

  • क्लॅमिडीया हा जीवाणू संसर्ग असल्याने प्रतिजैविके हा मानक उपचार दिला जातो.
  • प्रतिजैविकांच्या प्रकारानुसार औषधोपचार साधारणतः 10-14 दिवसांचा असतो. संपूर्णतः संसर्गमुक्त होण्यासाठी दिलेला औषधोपचार पूर्ण करावा.
  • स्त्रियांमधे संसर्गाचे प्रमाण खूप वाढल्यास गर्भाशय आणि गर्भाशय ग्रीवा संसर्ग ग्रस्त होऊ शकतात. परिणामी प्रजननक्षमता कमी होते किंवा संपून जाते.
  • पुरूषांमधील संसर्ग वाढल्यास तो पुरःस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्रंथी) किंवा मूत्राशयामधे पसरू शकतो.



संदर्भ

  1. Elwell C et al. Chlamydia cell biology and pathogenesis.. Nat Rev Microbiol. 2016 Jun;14(6):385-400. PMID: 27108705
  2. Marc O. Beem et al. Respiratory-Tract Colonization and a Distinctive Pneumonia Syndrome in Infants Infected with Chlamydia trachomatis. The New England Journal of Medicine; February 10, 1977
  3. Catherine M. O’Connell et al. Chlamydia trachomatis Genital Infections. Microb Cell. 2016 Sep 5; 3(9): 390–403. PMID: 28357377
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Chlamydia Infections
  5. Kalpana Betha et al. Prevalence of Chlamydia trachomatis among Childbearing Age Women in India: A Systematic Review. Infect Dis Obstet Gynecol. 2016; 2016: 8561645. PMID: 27672303